✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९११:दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.**१९०१:जी.मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.**१७५५:डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:रमेश मच्छिंद्रनाथ वाघ -- लेखक* *१९८१:युवराजसिंग – प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९७७:डॉ.योगिता श्याम पिंजरकर -- लेखिका* *१९६९:बंडोपंत राजेश्वरजी बोढेकर -- प्रसिद्ध लेखक* *१९६६:भरत जाधव-- मराठी चित्रपट,थिएटर आणि टीव्ही शोमधील भारतीय अभिनेता आणि निर्माता**१९६४:दीपक तांबोळी -- कथाकार* *१९५९:डॉ.चंद्रकांत लेनगुरे --कवी,कथाकार* *१९५६:प्रभू राजगडकर-- कवी, लेखक**१९५०:रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते**१९५०:संध्या प्रकाश देशपांडे-- कवयित्री* *१९४९:गोपीनाथ पांडुरंग मुंडे माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री(मृत्यू:३ जुन १९१४)**१९४७:शिवाजी धर्माजी साळुंके --कवी**१९४२:प्रा.मंदा विजय टेंबे-- लेखिका* *१९४०:शरद पवार – माजी केंद्रीय कृषी मंत्री, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री**१९२२:कमल बाळकृष्ण आपटे-- लेखिका*@*१९२१:यशवंत कानिटकर -- मराठी भाषातज्‍ज्ञ ,पूर्व भाषासंचालक (मृत्यू:२२ जुलै २०१५)**१९१६:पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर-- स्वतंत्रता सेनानी,गोवा विधानसभेचे अध्यक्ष, लेखक (मृत्यू:५ सप्टेंबर २०००)* *१९१५:फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू:१४ मे १९९८)**१९१२:यशवंत भीमराव आंबेडकर (भैय्यासाहेब)-- भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते (मृत्यू:१७ सप्टेंबर १९७७)**१९०७:खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू:१०ऑगस्ट १९५०)**१९०५:डॉ.मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू:२८ सप्टेंबर २००४)**१८९२:गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (मृत्यू:११ मार्च १९६५)**१८९३:गोविंद सदाशिव घुर्ये--मानववंश समाज,लेखक,अभ्यासक (मृत्यु:२८ डिसेंबर १९८३)**१८७२:डॉ.बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते,नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू:३ मार्च १९४८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:पण्डित रवी शंकर – सतार वादक, *'भारतरत्‍न’ (जन्म:७ एप्रिल १९२०)**२००५:रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म:२९ डिसेंबर १९१७)**२००५:त्र्यंबक विनायक सरदेशमुख-- कादंबरीकार,समीक्षक (जन्म:२२ नोव्हेंबर १९१९)**२००४:निरंजन हरिश्चंद्र उजगरे--कवी, संपादक (जन्म:६ ऑक्टोबर १९४९)**२०००:जयदेवप्पा हलप्पा तथा जे.एच.पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (जन्म:१ आक्टोबर १९३०)**१९९२:पं.महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म:१२ जानेवारी १९०६)**१९६४:मैथिलिशरण गुप्त –हिन्दी कवी. ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.(जन्म:३ ऑगस्ट १८८६)**१९३०:परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: १९०८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - साहस*सातव्‍या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्‍न मोठ्या थाटामाटात झालं.  अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्‍या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ......ही लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.          ~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एक कोटी हुन अधिक निवृत्तीवेतन धारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेशचा तिढा सुटला, मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड, शिवराजसिंह चौहानानंतर पदभार सांभाळणार, दोन उपमुख्यमंत्रीही मोहन यादवांच्या दिमतीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जम्मू काश्मीर स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग, कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मेळघाटातील बहुतेक गावांत स्थलांतर,कुपोषणाचा प्रश्न कायम; एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्याचे आश्वासन, तर इथेनॉल बंदीविरोधात अमित शाहांची भेट घेणार, अजित पवारांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, नाशिकच्या चांदवडमध्ये निर्यातबंदीविरोधात आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतमाता ज्ञानपीठातर्फे 42 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन:डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यात होणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *भौतिकशास्त्र* 📙 **********************विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र.यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले.आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात.उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते.उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात.रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या समाजसुधारकास *'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस'* म्हणून ओळखले जाते ?२) भारताच्या पहिल्या महिला आमदार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?३) 'Why didn't you come sooner ?' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?५) महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे ? *उत्तरे :-* १) म.गो. रानडे २) डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी ३) कैलास सत्यार्थी ४) कोपर्निकस ५) पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कृष्णजीत केरबा उमाटे, मुखेड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर👤 शुभानन गांगल, पुणे👤 अशोक पाटील कदम👤 समीर मुल्ला👤 वतनदार पवनकुमार नारायण👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 महेश शिवशेट्टी👤 माधव पाटील शिंदे👤 राजकुमार इंगळे👤 कु. योगेश्वरी बालाजी पेटेकर👤 विपीन कासलीवाल👤 डॉ. सुभाष नामदेव पाटील👤 शुद्धधोन पवार, डोणगावकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारूनि बोले विवंचूनि चाले। तयाचेनि संतप्त तेही निवाले॥ बरें शोधल्यावीण बोलो नको हो। जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचे भले व्हावे या उद्देशाने ‌त्या व्यक्तीला कितीही सांगून सुद्धा ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर ते त्याचे दुर्दैव आहे. कारण, या समाजात चांगल्यासाठी सांगणारे फार कमी असतात व वाईट मार्गाने नेणारे असंख्य असतात. शेवटी चांगले ऐकणाऱ्याचे भले होत असते आणि वाईट सांगणाऱ्यांमुळे वाईटच परिणाम झालेले बघायला मिळत असतात. सोबत इतरांना त्यामुळे अपमानित व्हावे लागते म्हणतात ना की, शेवटी कुठेतरी कर्माचा हिशोब होत असतो. म्हणून चांगले काय व वाईट काय असते या विषयी विचार करणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अति तेथे माती*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही.त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.*तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच..*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment