होळी

होळी पौर्णिमा ...

आपल्या संस्कृतीने जे आपल्याला सणवार साजरे करायला शिकवते त्या मध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. तो आपण ज्यावेळी समजावून घेतो त्यावेळी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.

सर्वजण एकत्र येऊन गाव स्वच्छ करावा व शेणाच्या गव-यांचा धूर करावा जेणे करुन वातावरणातील विषारी जीव जंतू मरून गाव आरोग्य संपन्न व्हावा, हा उद्दात हेतू आपल्या संस्कृतीचा आहे.

त्याचप्रमाणे जीवनात जगताना हा होळी सण आपल्याला आनंदी जीवनाचा मार्ग देतो.

शारिरीक आरोग्याबरोबर मनाच्या ही आरोग्याचेही महत्त्व ही होळी पौर्णिमा शिकवते. मनामध्ये खूप घाण व कचरा साठलेला असतो.

अज्ञान, अंधश्रद्धा, जातियता, धर्मांधता, अस्पृश्यता, भ्रष्टाचार, प्रदूषण, पर्यावरणाचा -हास, स्त्री भ्रूणहत्या, घाणरेड्या व वाईट सवयी आणि व्यसन असा समाज मनाच्या ठायी साठलेला कचरा व

त्याच बरोबर द्वेष, मत्सर, तिरस्कार, हेवे-दावे, वैर भाव इ. सामजिक कच-याचे एकत्र येऊन ऐक्याच्या अग्नीच्या ज्वाळेत दहन करणे व राष्ट्र प्रगतीचा प्रकाश नविन पिढ्यांना देणे ही आहे होळीची उपासना.

संत सांगतात, भगवन्नाम ही ज्वाळा म्हणजेच अग्नी आहे. जी सर्व पातकांना भस्म करते.

त्याच बरोबर चिंता, काळजी, भयगंड, अनिष्ट व नकारात्मक विचार यांची सुद्धा आहूती मनचित्तात नामाग्नी प्रज्वलीत करून देणे म्हणजे ख-या अर्थाने होळी.

पोर्णिमा म्हणजे सुर्याचा संपुर्ण प्रकाश आपल्या अंगावर घेऊन विश्वाला देणारा चंद्र.

जसा कलेकलेने चंद्र वाढत जातो त्याप्रमाणे माणसाने सदगुरूंकडून मिळालेला  ज्ञानप्रकाश इतरांना देत देत एक दिवस पूर्ण पणे प्रकाश मान होणे म्हणजे पोर्णिमा.

जीवनात ख-या अर्थाने तनाचे, मनाचे व जनाचे आरोग्य राखणे व हाच आनंदाचा ज्ञानप्रकाश इतरांना देणे म्हणजेच होळी पौर्णिमा .

पोळीच्या पोटात जसे गोड पुरणाचे सारण असते त्याच प्रमाणे आपल्या पोटात म्हणजेच हृदयात आनंद रुपी गोविंद असतो.

ज्यावेळी साधक नामाग्नी व ज्ञानाग्नी चित्तात प्रज्वलीत करून अहंकार व अज्ञानाची आहूती देणे, आनंदाचा  प्रकाश इतरांना देणे म्हणजे होळी.

 अशा होळी पोर्णिमेच्या आपणास कोटी कोटी शुभेच्छा!!!

संकलित माहिती


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

No comments:

Post a Comment