कथा क्रमांक १७३

अभ्यास कथा क्रमांक १७३  

      *सज्जनपणा*  

                     महात्मा गांधी एकदा आगगाडीतून प्रवास करत होते. त्यांच्या शेजारी बसलेला माणूस गाडीत पचकन थुंकला .गांधीजींनी त्यांच्या जवळ असलेला कागदाचा कपटा घेऊन ती थुंकी पुसून टाकली. त्या प्रवासाला राग आला. थोडया वेळाने तो पुन्हा मुद्दाम थुंकला. पुन्हा गांधीजींनी ती जागा पुसून स्वच्छ केली. असं ब-याचदा झालं .दरवेळी काहीही न बोलता गांधीजी ती जागा स्वच्छ करत होते. आणि दरवेळी त्या उतारूच्या रागाचा पारा मात्र चढत होता. शेवटी तो उतारू थुंकून -थुंकून थकला  , ओशाळला. त्याने गांधीजीची माफी मागितलीआणि त्यांना विचारलं  , " मी पुन्हा पुन : थुंकत होतो  , तरी तुम्ही दरवेळी स्वच्छता करत राहिलात  , असं का केलंत  ? " यावर गांधीजी म्हणाले , तू तुझं काम करत होतास आणि मी माझं  ! "

✍ तात्पर्य  - जे चांगले वागतात  , ते नेहमी सज्जन असतात. त्यांच्यावर कितीही संकटं आली  , तरीही आपला सज्जनपणा ते कधीही सोडत नाही. पुण्य करीत राहणं  , हा त्यांचा स्वभाव गुणच असतो .

No comments:

Post a Comment