✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oHndJ4zrP5JF9C7A/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••🟣 *_ या वर्षातील २७४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे ’हॉल ऑफ फेम’ हा विशेष पुरस्कार जाहीर**१९९८: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना 'शांतिस्वरुप भटनागर' पुरस्कार जाहीर**१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’दादासाहेबफाळके पुरस्कार’ प्रदान**१९९३: लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.**१९६१: दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्‍नई) येथे खेळला गेला.**१९३२: महात्मा गांधीच्या प्रेरणेने हरिजन सेवा संघाची स्थापना**१८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: ह. भ. प. शिवाजी महाराज दाते -- लेखक**१९८०: मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू**१९७२: शंतनु मुकर्जी ऊर्फ ’शान’ – पार्श्वगायक**१९७०: प्रमोद कोयंडे -- लेखक, पत्रकार* *१९६७: दीप्ती भटनागर -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९६५: डॉ. ज्योती जनार्दन नागपुरकर -- कवयित्री* *१९६४: सायमन मार्टिन -- प्रसिद्ध मराठी कवी**१९६१: चंद्रकांत पंडित – क्रिकेटपटू**१९६०: प्रा. डॉ. श्रीकांत तारे -- प्रसिद्ध स्तंभलेखक, कवी, व्याख्याते, कथाकार**१९५९: प्रमोद कर्नाड -- प्रसिद्ध मराठी लेखक कवी**१९५६: अंजली दीपक कोनकर -- कवयित्री, लेखिका**१९५५: अनंत वसंत पळशीकर -- नाट्य निर्माते**१९५१: नारायण कुलकर्णी-कवठेकर -- विदर्भातील आघाडीचे कवी व संपादक* *१९४३: निळू दामले -- मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक**१९४२: भास्कर लक्ष्मण भोळे -- लेखक तत्त्वचिंतक व विचारवंत (मृत्यू: २४ डिसेंबर २००९ )**१९४०: राजाराम पिराजी ढाले -- आंबेडकरी चळवळीतील नेते, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी (मृत्यू: १६ जुलै २०१९ )**१९३३: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (मृत्यू: २८ डिसेंबर २००६ )**१९२२: ऋषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६ )**१९१९: फिरोज दस्तूर -- भारतीय अभिनेता आणि किराणा घराण्याचे (गायन शैली) भारतीय शास्त्रीय गायक (मृत्यू: ९ मे २००८ )**१९१५: मदन पुरी -- चित्रपट अभिनेते (मृत्यू: १३ जानेवारी १९८५ )**१९१३: शशिकांत पुनर्वसू तथा मोरेश्वर शंकर भडभडे -- कथाकार, प्रवासवर्णनकार (मृत्यू: २३ जुलै १९५५ )**१९००: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१ )**१८९३: वासुदेव वामन भोळे -- कथाकार, नाटककार,नाट्यसमीक्षक (मृत्यू:४ आक्टोबर १९७६)* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: विजू खोटे -- हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली (जन्म: १७ डिसेंबर १९४१ )**२०१३: राजीव पाटील -- मराठी चित्रपट दिग्दर्शक (जन्म: २७ मार्च, १९७३ )* *२००७: मच्छिंद्र कांबळी -- ज्येष्ठ मराठी थिएटर अभिनेता,दिग्दर्शक आणि निर्माता(जन्म: ४ एप्रिल १९४७ )**२००४: कुलवंत जानी -- चित्रपट गीतकार (जन्म: १४ जुलै १९४०)**२००१: माधवराव शिवाजीराव शिंदे-- माजीकेन्द्रीय रेल्वे मंत्री,काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज,उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन (जन्म: १० मार्च १९४५ )**१९९८: चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदान’ चळवळीतील कार्यकर्त्या**१९९२: गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार,‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३ )**१९८५: चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक (जन्म: २६ एप्रिल १९०० )**१६९४: मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर (जन्म: १० मार्च १६२८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आधारकार्डचा इतिहास*महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंबली या गावातून दिनांक 29 सप्टेंबर 2010 रोजी आधारकार्ड योजनेला सुरुवात करण्यात आली. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; पीएम मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, बैठकीत झाली घोषणा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; योग्य उमेदवार ठरवण्यासाठी शरद पवारांची व्यूहरचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *चंद्रपूरमधील शाळा अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आली,  महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव; संजय राऊतांचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नेपाळमध्ये महापुरात 60 जणांचा मृत्यू, दुसरीकडे, अमेरिकेत हेलन चक्रीवादळामुळे 52 मृत्यूमुखी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कानपुर - पावसामुळे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ ही रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 फुलं रंगीबेरंगी का असतात ? 🌺अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्‍या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*R. T. O. - Regional Transport Office*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे ?२) भारत देशाची जमीन हद्द किती देशाच्या हद्दीस लागून आहे ?३) चौथे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन ७ व ८ नोव्हेंबर २०२४ ला कोठे होत आहे ?४) 'बाप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली ? *उत्तरे :-* १) जगतगुरू संत तुकाराम महाराज २) ७ देश ३) दुबई ४) वडील, पिता, जनक, जन्मदाता, तात ५) हरिणी अमरसूर्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रमोद रत्नाळीकर, उच्च श्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, किनवट👤 सतिश दमकोंडवार, विष्णू नगर, नांदेड👤 अमोल रवीकुमार वानरे👤 विशाल गणेशराव जारे पाटील👤 संतोष भालके👤 महेश घुगरे👤 पोतन्ना डेबेकर👤 देवन भोयर👤 आकाश आंबोरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची।। न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण।। ठायीचं बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा।। रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ।। याविण आणिक असता साधन । वाहतसे आन विठोबाची।। तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी । शहाणा तो धनी घेतो येथे।। ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••झोपेत दिसणाऱ्या भयानक स्वप्नांवर तसेच निरनिराळ्या स्वप्नांवर जर आपण विश्वास करत राहिलो तर ते, स्वप्न आपल्याला सुखाने जगू देणार नाही. त्यासाठी त्या स्वप्नांना विसरून आपण बघितले असणारे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. झोपेत दिसणारे स्वप्न हे, कधीच नवी दिशा देत नाही तर उलट ते आपल्याला भ्रमात पाडत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तुलना*एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले. तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती. अचानक तिला वेदना व्हायला लागल्या. तिला बाळाचा जन्म व्हायची वेळ झाली आहे हे लक्षात आले. ती एका झाडाच्या आडोशाला गेली. तिला मदतीला कोणी नव्हते. तिने एकटीने स्वतःच बाळाला जन्म दिला. तलावातले पाणी घेऊन बाळाला स्वच्छ केले. झोळीतले सामान रिकामे केले, झोळी थोडी झटकून त्याच कपड्यात बाळाला गुंडाळले. बाळाला एका कडेवर घेतले, हातात येईल तितके सामान घेतले आणि आपल्या घरी निघाली. अकबर बिरबल दोघेही हे पाहुन थक्क झाले. अकबर बिरबलाला म्हणाला. “कमाल आहे या बाईची. गर्भवती असताना इतके काम करत होती. आणि इतक्या कठीण वेळी कोणीही सोबत नसताना, वैद्य नसताना तिने स्वतःच सर्व काही निभावले. नाही तर आमची बेगम. हजार नखरे असतात तिचे. आणि साधं सर्दी पडसं झालं तरी सगळं सोडून आराम करत बसते.” दोघे शिकार करून परत आल्यावरही अकबराच्या डोक्यातुन हा विषय गेला नव्हता. ते दोघे परत आल्यावर त्याने आपल्या बेगमशी थोडे तुसडेपणाने वागायला सुरु केले. गोडीगुलाबीने वागणे, तिच्या इच्छा पुरवणे बंद केले. बेगम दुःखी झाली. तिने बिरबलाला भेटून आपले दुःख सांगितले. ह्याचे कारण बिरबलाच्या लक्षात आले. त्याने बेगमला निश्चित राहायला सांगितले आणि तो अकबराला समजावण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. बिरबलाने अकबराच्या माळ्याला बोलावुन घेतले. त्याला सांगितले कि काही दिवस बागेतल्या फुलझाडांची काळजी घेऊ नकोस. बागेत फेरफटका मारणे हा अकबराचा आवडता छंद होता. छान बहरलेली फुलझाडे बघुन तो खुश व्हायचा. त्या बागेची काळजी नाही घ्यायला सांगितल्याने माळी घाबरला, पण बिरबलाने त्याला अभय दिले. त्याला कोणी जाब विचारल्यावर बिरबलाच्या आदेशाने असे केल्याचे सांग म्हणुन सांगितले. काही दिवसातच बागेतली फुलझाडे थोडी कोमेजली. त्यांना चांगली फुले येत नव्हती. अकबर बागेत फिरायला गेल्यावर बागेची ही दशा पाहुन संतापला आणि माळ्याला बोलावून फैलावर घेतले. माळ्याने घाबरत घाबरत असे बिरबलाने करायला सांगितल्याचे अकबराला सांगितले. अकबराने त्याला जायला सांगितले आणि फुलझाडे नीट राहिली पाहिजेत असा दम दिला. तो गेल्यावर अकबराने बिरबलाला बोलावुन त्याला जाब विचारला. बिरबल म्हणाला “हुजूर, ही फुलझाडे फारच नाजुक असतात. त्यांचे किती नखरे असतात. एका माळ्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला ठेवावे लागते. जंगलातली झाडे पहा. कोणी त्यांच्याकडे बघत नाही तरी किती छान वाढतात, सावली देतात, फळे देतात. ह्या झाडांनी त्यांच्यासारखे व्हावे म्हणुन मी माळ्याला सांगितले कि ह्यांचे लाड पुरवू नकोस.” “बिरबल अरे ती जंगलात वाढणारी मजबूत झाडे कुठे, ही नाजूक फुलझाडे कुठे ? ह्यांची काळजी घ्यावीच लागते. नाही तर त्यांची वाढ कशी होणार ? दोन्ही झाडांचे प्रकारच वेगळे आहेत, त्यांना एकसारखे कसे वाढवता येईल?”“अगदी बरोबर बोललात खाविंद. जंगलात स्वतःच वाढणाऱ्या मजबूत झाडे आणि महालात वाढणारी सुंदर आणि नाजूक झाडे यांची तुलना करण्यात काही अर्थ नाही.” अकबराला बिरबलाच्या इशाऱ्याचा अर्थ समजला. त्याने बिरबलाला सांगितले कि “मी तुला काय म्हणायचे ते समजलो. महालात लाडाकोडात वाढणाऱ्या, सर्व सुविधांची सवय असणाऱ्या बेगमेची, जंगलात लहानपणापासून अवघड परिस्थितीत राहण्याची सवय असणाऱ्या भिल्ल स्त्रीची तुलना होऊ शकत नाही. माझ्या हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.”अकबर आपल्या बेगमेशी पुन्हा नेहमीसारखे वागायला लागला. बेगम परत प्रसन्न झाली आणि तिनेही बिरबलचे आभार मानले. लेखक : आकाश खोत यांच्या ब्लॉग वरून साभार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment