✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/UukUSPnwJHZsek1z/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस_*🌼•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••🌼 *_ या वर्षातील २६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: ’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.**१९८४: जळगाव येथे जगू शकतील दूरदर्शन केंद्र स्थापन**१९८३: ’सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९८२: जयंत श्रीधर टिळक महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती बनले**१९०८: कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना**१९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी 'कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.**१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.**१८४६: अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: डॉ. अमित अच्युत बन -- वैद्यकीय तज्ञ तथा लेखक* *१९७९: रवींद्र सीताराम कानडजे -- लेखक**१९७८: प्रवीण शेषराव वानखेडे -- कवी* *१९७१: अर्जुन तुकाराम ताकाटे -- लेखक* *१९६८: रवींद्र जवादे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९६७:;प्रशांत वैद्य -- पूर्व भारतीय क्रिकेटर**१९६७: डॉ. सुजाता शेणई -- लेखिका, संपादिका* *१९६५: अलका कुबल (आठल्ये) -- मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री**१९६४: रघुनाथ तुळशीराम पाटील -- कवी, गझलकार**१९६४: विठ्ठल रामभाऊ कुलट -- प्रसिद्ध कवी, लेखक, संस्थापक अध्यक्ष,प्रतिभा साहित्य संघ* *१९६३: सुरेश यशवंत कुलकर्णी --- कवी**१९५७:कूमार सानू– पार्श्वगायक**१९५६: प्रा. डॉ. ईसादास भडके -- कवी, लेखक* *१९५३: मुकुंद वामन कांत -- कवी* *१९५३: विवेक कृष्णाजी घळसासी -- सुप्रसिद्ध विचारवंत, वक्ते, कवी, लेखक, ज्येष्ठ निरुपणकार**१९५२: प्रा. डॉ. रोहिणी केतकर -- लेखिका संस्कृत विषयाच्या तज्ज्ञ* *१९५२: अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू (मृत्यू: ३१ जुलै २०२४ )**१९५०: डॉ. अभय बंग-- महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, सर्च सेवाभावी संस्थेचे संस्थापक,लेखक**१९४३: तनुजा मुखर्जी -- पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ,तनुजा --- चित्रपट अभिनेत्री**१९४३: रा. सू. बच्चेवार निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक महा.रा. (मृत्यू: १७ एप्रिल २०२० )**१९४१: प्राचार्य योगानंद वासुदेव काळे -- प्रसिद्ध लेखक* *१९३५: प्रेम चोप्रा -- हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९३५: चित्रा हरी वझे -- लेखिका* *१९३४: चिंतामण शंकर जोशी -- कादंबरीकार कथाकार* *१९३३: रघुनाथ माधव पाटील (कवी आरेम) -- कवी, लेखक* *१९२१: पंडित बलवंत राय भट्ट -- हिंदुस्थानी गायन संगीताचे प्रसिद्ध भारतीय संगीतकार (मृत्यू: २ मे २०१६ )**१९२०: प्रा.भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७ )**१९१९: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१० )**१९१८: पंढरीनाथ बलवंत रेगे – साहित्यिक, बाल / कुमार कथा लेखक (मृत्यू: १९९९ )**१९१५: राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी,लेखक आणि चित्रपट गीतकार(मृत्यू: २९ जुलै १९६६ )**१९०८: रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (मृत्यू: २४ एप्रिल १९७४ )**१९०३: युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (मृत्यू: २ जुलै १९५० )**१९०३: शंकर धोंडो क्षीरसागर (मामा क्षीरसागर) -- संस्थापक, विचारवंत (मृत्यू: ६ एप्रिल १९८१ )**१८६१: रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (मृत्यू: १२ मार्च १९४२ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: कल्पना लाजमी -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (जन्म: ३१ मे १९५४ )**२०१४: शंकर वैद्य -- प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक(जन्म: १५ जून १९२८ )**२०१२: मुलराज राजदा -- ( भारतीय लेखक, अभिनेता ( जन्म: १३ नोव्हेंबर २०३१ )**२०१२: कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के.लाल – जादूगार (जन्म: १९२४ )**२०११: वसंत पुरुषोत्तम साठे -- माजी केंद्रीय मंत्री तथा लेखक ( जन्म: ५ मार्च १९२५ )**२००४: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १९२५ )**१९८७: राजेंद्र कृष्ण दुग्गल -- राजेंद्र कृष्णन म्हणून ओळखले जाणारे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म: ६ जून १९१९ )**१९६४: भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर – नाटककार (जन्म: २७ एप्रिल १८८३ )**१९३९: सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ,आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म: ६ मे १८५६ )**१८८२: फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १८०० )**१८७०: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३ )**१८५८: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशाच्या सेवेसाठी माझे योगदान काय ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आदिवासींची बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय पोषण महा अभियान अंतर्गत मेळघाटातील जैतापूर गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यपालांच्या उपस्थितीत जैन संघ रथ यात्रेला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदी शैलेश बापट यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करा - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी केला पराभव, लोकल बॉय आर. आश्विन ठरला सामनावीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गाईच्या दुधाचे महत्व..*दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीनं समावेश करतात. कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. साधारणतः शहरी भागामध्ये लोक डेअरीतील दुधाचे सेवन करतात. तर काही जण आपल्या घराशेजारी असणाऱ्या गायीचा गोठ्यातील दूध किंवा दूध विक्रेत्याकडून दुधाची पिशवी विकत घेतात. हे दूध गाय किंवा म्हशीचे असते. बहुतांश लोकांना गाईचे दूध पिणं अधिक पसंत असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.गायीच्या दुधाचे फायदे१) गायीच्या दुधामुळे हृदय, मधुमेह, कर्करोग, टीबी, कॉलरासारखे आजार दूर राहतात.२) गायीचे दूध मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते.३) गाईच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ कॅरोटीन आहे, यामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो.४) गायीच्या दुधाला गोडपणा आल्याने पित्त आणि वायूचा त्रासही दूर होतो आणि गायीचं दूध सहज पचते.५) टीबीच्या रूग्णांना दररोज गायीचे दूध पिऊन फायदा होतो.६) मूत्राशयाशी संबंधित आजार असल्यास गायीच्या दुधात गूळ टाकून पिणे फायद्याचे आहे.७) कच्च्या गायीच्या दुधाने चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा गोरे आणि चमकदार बनते.८) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*N. T. S. E. - National Talent Search Examination*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती ?२) छत्रपती शिवरायांच्या कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होणार आहे ?३) लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?४) 'प्राचीन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत कोणती ? *उत्तरे :-* १) शांघाय मॅग्लेव्ह, चीन ( नियमित वेग तासी - ४६० किमी ) २) सुवर्णदुर्ग ३) के. सी. वेणुगोपाल ४) पूर्वीचा, पुरातन, जुनाट ५) मर्देका 118, क्वालालंपूर, मलेशिया ( २२२७ फूट )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश येवतीकर, सेवानिवृत्त बँक अधिकारी, नांदेड👤 रवींद्र जवादे, साहित्यिक, अकोला👤 कल्पना बोधने, शिक्षिका, बिलोली👤 संगीता क्षीरसागर, शिक्षिका, नाशिक👤 विशाल मनवर, यवतमाळ👤 विना खानविलकर, पुणे👤 प्रदीप माळगे, धर्माबाद 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अडचण कशाप्रकारची असते. ज्याची अडचण, त्यालाच माहीत असते. ज्याचे जळते त्यालाच कळते. म्हणून उगाचच कोणाच्या विषयी पूर्ण माहिती किंवा अडचण जाणून न, घेता त्याला नाव ठेवून आपल्या शब्दांना खर्च करून त्यात आनंद घेण्यात समाधान मानू नये.कारण अडचणी ह्या, कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेसाठी मुकेशचे चित्र*मुकेश साधारण सहा-सात वर्षांचा असेल. त्याला चित्रकला आणि क्रिकेट खेळण्याची आवड आहे. मोकळ्या वेळात तो क्रिकेट खेळायचा आणि रंगरंगोटी करत असे. शाळेत कुठलीही चित्रकला स्पर्धा असली की त्यात तो प्रथम क्रमांक मिळवायचा. मुकेशच्या चित्रकलेचे शाळेतही कौतुक झाले. मुकेश जेव्हा कधी शाळेत जायचे तेव्हा त्याला वाटेत डस्टबिनमधून जावे लागत असे. लोक रुळांवर कचरा टाकायचे आणि भिंतीसमोर लघवीही करायचे, त्यामुळे प्रचंड दुर्गंधी येत होती. मुकेशला हे सर्व आवडले नाही. एकेकाळी पंतप्रधान सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यास सांगत होते. मुकेशला कल्पना आली, त्याने डस्टबीनजवळ जाऊन भिंतीवर बरीच पेंटिंग्ज काढली. ते पेंटिंग इतके सुंदर होते की तिथून जाणारा माणूस. त्या चित्रकलेचे कौतुक करायचे. हळू हळू लोकांनी तिथून कचरा फेकणे बंद केले आणि भिंतीवर इतके सुंदर पेंटिंग होते की आता तिथे उभे राहून कोणीही लघवी करत नव्हते. काही वेळातच मार्ग मोकळा झाला. मुकेशला आता शाळा आणि घर यांच्यामध्ये कोणतीही घाण दिसली नाही. हे पाहून त्याला खूप आनंद झाला.नैतिक – काहीतरी मोठं करून पार करण्याचं वय नसतं. तुमच्या प्रतिभेने समाजही बदलता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment