✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 सप्टेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/Hwea4hNGbVk5JryZ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_ या वर्षातील २६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.**१९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.**१९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु.एस.एस.आर.ला पाठिंबा जाहीर केला.**१९५०: इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९७८: समीर धर्माधिकारी -- मराठी चित्रपट अभिनेते**१९७४: प्रा. डॉ. गजानन अरुण वाघ -- लेखक**१९७३: सरिता सातारडे -- कवयित्री, लेखिका**१९७३: फरहीन -- अभिनेत्री**१९७१: प्रा. डॉ. केशव तुपे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२: अर्चना पुरण सिंग -- भारतीय अभिनेत्री आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व* *१९६२: एकनाथ बडवाईक -- कवी**१९६२: चंकी पांडे -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९६१: चंद्रकांत महादेव चितळे -- कथाकार, कवी**१९६०: विद्यालंकार विनायक घारपुरे -- लेखक* *१९४९: दिलीप नारायण अपशंकर -- लेखक, अनुवादक तथा निवृत्त अधीक्षक अभियंता**१९४८: डॉ. माधवी वैद्य -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४३: इयान चॅपेल –ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कप्तान**१९४०: योहाना शाहू गायकवाड -- लेखक* *१९३९: दिवाकर दत्तात्रय गंधे -- मराठी नाट्यसमीक्षक व चित्रपटविषयक लिखाण करणारे लेखक (मृत्यू: १मार्च २०१९ )**१९३६: वैजयंती वामन काळे -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९३२: डॉ.मनमोहन सिंग – भारताचे १३ वे माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ**१९३१: श्याम त्रिंबक फडके -- प्रसिद्ध नाटककार**१९३१: विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ आक्टोबर १९८३ )**१९२३: देव आनंद – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ३ डिसेंबर २०११ )**१९२०: अनंत दामोदर आठवले (स्वामी वरदानंद भारती) -- आयुर्वेदतज्ज्ञ, लेखक, ग्रंथकार, कीर्तनकार (मृत्यू: ५ सप्टेंबर २००२ )**१८९४: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (मृत्यू: १० डिसेंबर १९५५ )**१८८८: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ जानेवारी १९६५ )**१८५८: मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (मृत्यू: १० आक्टोबर १८९८ )**१८४९: इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६ )**१८२०: ईश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू: २९ जुलै १८९१ )*🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: डॉ. रामचंद्र देखणे -- लोककला, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारुडकार (जन्म: १२ एप्रिल १९५६ )**२००८: पॉल न्यूमन –अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म: २६ जानेवारी १९२५ )**२००२: राम फाटक – गायक व संगीतकार (जन्म: २१ आक्टोबर १९१७ )**१९९६: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (जन्म: ४ जानेवारी १९२४ )**१९८९: हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (जन्म: १६ जून १९२० )**१९८५: हनुमंत गुणवंत देशपांडे -- विदर्भातील कवी (जन्म: १८९७ )**१९७७: उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२)(जन्म: ८ डिसेंबर १९०० )**१९५६: लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक(जन्म: २० जून १८६९ )**१९०२: लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्त्री भ्रूण हत्या : एक काळजी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात आज अनेक विकास कामासोबत तीन परम रुद्र महासंगणकाचे होणार लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असून उर्वरित भागात येलो अलर्ट, IMD चा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशाच्या अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ झाल्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगे नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय; विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अजित दादा महायुतीतून बाहेर पडतील अन् ते आमच्या महाशक्तीत येतील; आमदार बच्चू कडूंचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कसोटी क्रमवारीतही ऋषभ पंतचा डंका! सहाव्या क्रमांकावर घेतली झेप; विराट कोहली टॉप-१० बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंजीर फळांचे औषधी उपयोग*उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणी प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**O. P. D. - Out Patient Department**••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रोज सकाळी एकच गोष्ट तुम्हालाप्रेरणा देऊ शकते…. ती म्हणजे तुमचे ध्येय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मिस युनिव्हर्स इंडिया - २०२४'* या स्पर्धेची विजेती कोण ठरली ?२) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८ - १९ अंतर्गत राज्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीचे नाव काय ?३) कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ?४) 'फूल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'गॉड ऑफ क्रिकेट' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) रिया सिंघा, गुजरात २) सिरेगावबांध, ता. अर्जूनी मोरगाव, जि. गोंदिया ३) जॉर्डन ४) पुष्प, सुमन, कुसुम, सुम ५) सचिन तेंडुलकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील आलूरकर, तंत्रस्नेही शिक्षक, नांदेड👤 अजय मिसाळे👤 श्री दासरवार👤 सोनाजी बनकर👤 विश्वनाथ होले, साहित्यिक, पुणे👤 विक्की खटके 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥ तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपा आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशील झणीं ॥३॥ ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाप आणि पुण्य कशाने होते या विषयी आपल्याला पूर्णपणे माहीती असताना सुद्धा आपण नको त्या मार्गाने जाऊन जीवनाची माती करत असतो.निदान या मानवी जीवनाचे खरे महत्व जाणून सुंदर अशा मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण, इतरांचे चांगले केल्याने जरी त्यांना विसर पडत असेल तरी निसर्ग कुठेतरी बघत असतो व नको ते कार्य केल्याने लपवून ठेवल्यानेही ते कधीच लपत नाही असे अनेकदा ऐकण्यात आले आहे. म्हणून व्यर्थ विचार करणे सोडून द्यावे व सत्य काय आहे याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करा*गोपाळच्या घरात पाच म्हशी आणि एक गाय होती. तो दिवसभर सर्व म्हशींची काळजी घेत असे. तो दुरून हिरवे गवत कापून त्यांच्यासाठी आणून खायला घालत असे. गोपाळांच्या सेवेने गाई, म्हशी आनंदी होत्या. सकाळ संध्याकाळ इतके दूध आले असते, गोपालच्या कुटुंबाला ते दूध विकायला भाग पाडले असते. संपूर्ण गावात गोपाळच्या घरातून दूध विकायला सुरुवात झाली. आता गोपालला कामात जास्तच मजा येत होती, कारण त्यामुळे त्याची आर्थिक स्थितीही मजबूत होत होती. काही दिवसांपासून गोपाळला काळजी वाटू लागली होती, कारण त्याच्या स्वयंपाकघरातील एका मोठ्या मांजरीने त्याचे डोळे गोठवले होते. गोपाळ जेव्हा केव्हा किचनमध्ये दूध ठेवायचा तेव्हा तो निवांत होता. मांजर दूध प्यायचे आणि त्यांना खोटेही ठरवायचे. गोपालने मांजराचा अनेकवेळा पाठलाग करून तिला मारण्यासाठी धाव घेतली, पण मांजर पटकन भिंतीवर चढून पळून गेले. एके दिवशी गोपाल अस्वस्थ झाला आणि त्याने मांजरीला धडा शिकवण्याचा विचार केला. तागाच्या पोत्याचे जाळे टाकले होते, ज्यात मांजर सहज अडकले. आता काय, गोपाळला आधी काठीने मारहाण करण्याचा विचार आला. मांजर इतक्या जोरात म्याव करत होती की गोपाल तिच्या जवळ जाऊ शकत नव्हता. पण आज धडा शिकवण्यासाठी गोपाळने माचीसची काठी पेटवली आणि गोणीवर फेकली. गोणी पेटू लागताच मांजर सर्व शक्तीनिशी पळू लागली. मांजर जिकडे तिकडे पळत असे, जळणारी पोती पाठीमागून गेली. काही वेळातच मांजर संपूर्ण गावात पळाली. संपूर्ण गावात आगीचा भडका उडाला…………….. आग लागली, विझवा…….या प्रकाराचा आवाज उठू लागला. मांजराने संपूर्ण गाव जाळले. गोपाळचे घरही वाचले नाही.निष्कर्ष - आवेग आणि स्वतःच्या चुकीचे परिणाम एखाद्याला भोगावे लागतात आणि त्याची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते.••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment