✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 ऑक्टोबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KQfhe9bx9YkQGdvq/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••🛑 *_ या वर्षातील २७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••*२००५: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.**१९८३: पहिले मराठी विनोदी साहित्य संमेलन रमेश मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली भरले**१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.**१९४६: युनायटेड किंग्डममधे ’मेन्सा इंटरनॅशनल’ या संस्थेची ची स्थापना झाली.**१९४३: दुसरे महायुद्ध– दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.**१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना**१८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.**१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.**१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: पवन शामराव पाथोडे -- कवी, पत्रकार**१९८५: रमेश अरुण बुरबुरे -- कवी, गझलकार**१९८३: डॉ. महेश्वर मोतीराम मंगनाळे -- लेखक**१९८०: मनिषा पिंटू वराळे -- कवयित्री**१९७९: श्रद्धा निगम -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७६: संतोष रामचंद्र जाधव -- लेखक**१९७४: डॉ. देवानंद गोविंदराव सोनटक्के -- मराठीतील साहित्य समीक्षक* *१९६९: विजय जोशी (विजो) -- प्रसिद्ध कवी, गझलकार, समीक्षक**१९६८: अपर्णा वेलणकर -- लेखिका, मराठी अनुवादक**१९६८: गजानन शिले -- कवी, लेखक**१९६५: प्रफुल्ल कुलकर्णी -- कवी, गझलकार**१९६४: भाऊसाहेब देशमुख -- कवी**१९६२: व्यंकटेश रामचंद्र काटकर -- प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार* *१९६०: राज पुंडलिक अहेरराव -- कवी, कथाकार* *१९६०: प्रा. अरुण मानकर -- कवी, लेखक**१९५१: जगदीश काबरे -- वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध मराठी लेखक**१९५१: डॉ. हेमा लक्ष्मण जावडेकर -- लेखिका तथा अनुवादक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ( मृत्यू: २६ मे २०२१)**१९५०: उमा विरूपाक्ष कुलकर्णी -- प्रसिद्ध लेखिका, मराठी अनुवादक**१९४९: सुलभा तेरणीकर -- स्तंभ लेखिका व सिने लेखिका**१९४६: बशीर साहेबजी मुजावर -- ज्येष्ठ लेखक**१९४५: रामनाथ कोविंद - भारताचे माजी राष्ट्रपती**१९४४: धीरज कुमार -- भारतीय अभिनेता, दूरदर्शन निर्माता आणि दिग्दर्शक**१९४३: योगीराज देवराव वाघमारे -- ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार, नाटककार, बालसाहित्यकार तथा पूर्व शिक्षणाधिकारी* *१९४३: प्रा. बापूराव निवृत्ती जगताप -- कवी लेखक* *१९३९: हिरा बनसोडे -- मराठी कवयित्री व समाजसेविका**१९३८:भीष्मराज बाम -- महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ (मृत्यू: १२ मे २०१७ )**१९३४:प्रा. विमल रघुनाथ लेले -- ज्येष्ठ लेखिका**१९३०: सूर्यकांत माधव कुलकर्णी -- अ.भा. ग्रंथालय चळवळीचे मुख्य संघटक, जेष्ठ लेखक कवी, संपादन**१९३०: जयदेवप्पा हलप्पा तथा जे.एच.पटेल – कर्नाटकचे १५ वे माजी मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ ऑक्टोबर १९९९) (मृत्यू: १२ डिसेंबर २००० )**१९२८: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (मृत्यू: २१ जुलै २००१ )**१९२४: जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते**१९१९: गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७ )**१९१९: मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (मृत्यू: २४ मे २००० )**१९१७: महादेव विष्णू वाकडे (स्वामी माधवनाथ) -- नाथ संप्रदाय, प्रवचनकार (मृत्यू: ३० जुलै १९९६ )**१९१५: रतनलाल डोंगरचंद शहा -- लेखक**१९०६: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५ )**१९०५: मालती विश्राम बेडेकर -- कादंबरीकार, कथाकार (मृत्यू: ६ मे २००१ )**१८९५: लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १६ आक्टोबर १९५१ )**१८८१: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६ )**१८४७: अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या,’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३ )*🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१") (जन्म: १९६१ )**१९८२: हरी विष्णु मोटे -- खातनाम प्रकाशन (जन्म: २ ऑक्टोबर १९०७ )**१९३४: श्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे -- 'कळो न कळो' हे अजरामर काव्य लिहिणारे नागपूरातील जेष्ठ कवी (जन्म: ५ नोव्हेंबर १८८९ )**१९३१: शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (जन्म: १८ जानेवारी १८८९ )**१८६८: मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा(जन्म: १८ आक्टोबर १८०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दैवं चैवात्र पंचमम्*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा-कुणबीचे 54 लाख पुरावे समोर, शिंदे समितीचा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात 5 हजारांची वाढ, आता मिळणार 15 हजारांचं मानधन, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मन की बात च्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले श्रोत्यांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती व अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर, सरकारच्या  निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इलेक्ट्रोल बॉण्ड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कानपूर टेस्टमध्ये बांगलादेशचा डाव 233 धावांवर गुंडाळला; रवींद्र जडेजाचे कसोटीमध्ये 300 बळींचा विक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *भूकंप* 📙 ****************भूकंपाचा अनुभव भारतीयांना नवीन नाही. १९५५ साली आसाममध्ये प्रचंड भूकंप झाला होता. १९६७ साली कोयनेच्या परिसरात झालेल्या भूकंपाने मुंबईपासून कोल्हापूरपर्यंतचा सर्व टापू हादरवून सोडला होता. यानंतरचा १९८८ साली बिहारमध्ये झालेला भूकंप कित्येक खेडोपाडी उद्ध्वस्त करून गेला. १९९२ साली उत्तरकाशी या हिमालयातील भागात झालेल्या भूकंपातून अजून लोक सावरायचे आहेत. भारतातील अत्यंत भीषण भूकंप ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यात झाला. किल्लारी व सास्तूर या दोन गावी त्याचा केंद्रबिंदू होता. या भीषण धक्क्यांमुळे मराठवाड्यातील मातीच्या घरांचा पूर्णतः विध्वंस होऊन ढासळलेल्या ढिगार्याखाली अंदाजे अकरा हजार माणसे जिवंत गाडली गेली. रात्रीच्या वेळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा प्रकार घडला. गावेच्या गावे उद्ध्वस्त व निर्मनुष्य करणारा प्रकार महाराष्ट्राच्या आठवणीत कायम राहील. कच्छमधील भूजजवळ त्यानंतरचा मोठा भूकंप होऊन फार मोठी मनुष्यहानी व इमारतींची हानी झाली. अहमदाबादसारख्या शहरातील मोठ्या वास्तूंना त्याची हानी पोहोचली. इतका तो मोठा होता. या भागांत धाब्याची मातीची घरे ही हवामानाला पूरक असल्याने बांधली जात. यानंतर या बांधणीबद्दलच साशंकता निर्माण झाली आहे. भूकंप झाल्यावर संपूर्ण भूपृष्ठाच्या थरथरण्यामुळे विध्वंस होत जातो. ज्या भक्कम समजल्या जाणाऱ्या पायावर आपण इमले उभारतो, तोच पाया डळमळीत होऊन थरथरल्यामुळे वरची इमारत तडे जाऊन कमकुवत बनते, प्रसंगी कोसळते.भूकंपाचा अनुभव अत्यंत चमत्कारिक असतो. सहसा हा अनुभव घेतलेला माणूस असा प्रसंग कधीच विसरणार नाही. अनेकदा घनगंभीर असा आवाज या वेळी आसमंतात भरून राहतो. घरांचे पत्रे, घरांतील फडताळातील वस्तू, मोकळ्या बरण्या, शेल्फवरची पुस्तके थरथरण्याने पडतात वा विस्कळीत होतात. अनेकदा भूकंपानंतर पाऊस पडल्याची नोंद आहे. फार मोठा भूकंप असेल तर झाडे उन्मळून पडणे, रेल्वेचे रूळ वेडेवाकडे पिळवटणे, तलावातील पाणी भूगर्भात नाहीसे होणे. रस्त्याच्या मध्यभागी कित्येक मीटर खोल जाणाऱ्या भेगा पडणे असे दृश्य दिसते.भूकंपाचे क्षेत्र सहसा काहीशे चौरस किलोमीटरचे असते. याची नोंद कित्येक किलोमीटर दूरवर होऊ शकते. भूकंप मोजण्याच्या यंत्राला 'सायास्मोग्राफ' म्हणतात व भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये व्यक्त केली जाते. एक ते दहा रिश्टरमध्ये ती तीव्रता मोजली जाते. शून्य ते पाच या दरम्यान मोजल्या गेलेल्या भूकंपाची जाणीव होते, किरकोळ नुकसान होते. पाच ते सात या दरम्यान इमारतींची हानी, रस्त्याला तडे जाणे, झाडे पडणे हे होऊ शकते. तर सातपेक्षा जास्त रिश्टरचा भूकंप सहसा भयानक हानी करून जातो व त्याचा परिणाम सहज पाच सातशे किलोमीटरपर्यंत जाणवतो. पृथ्वी साडेचार अब्ज वर्षांपूर्वी उत्पन्न झाली पण त्या वेळेपासून आजपर्यंत पृथ्वीच्या बाह्यकवचाच्या खाली २९,००० किलोमीटर खोलीवर असलेल्या तप्त खडकांच्या द्रवस्वरूपामुळे अनेक बदल घडत आले आहेत. बाह्य कवच जेमतेम वीस ते तीस किलोमीटर जाडीचे असून या कवचाच्या सलग अशा टापुंच्या हालचाली सतत चालू असतात. या हालचाली होत असताना एक टापू ज्या वेळी दुसऱ्या टापूशी घासतो, चिकटतो, घासून सरकतो वा आदळतो, तेव्हा भूकंप होतात. या हालचालींमुळे प्रचंड पर्वत, मोठाले खडक, जलाशय यांच्या अस्तित्वावरच सखोल परिणाम घडतात. ज्यावेळी दोन टापू एकमेकांवर घासतात, त्यावेळीच आपल्याला ही भूकंपाची थरथर जाणवते. समुद्राच्या पोटात खोलवर अशा घडामोडी घडतात तेव्हा सुनामी लाटांची निर्मिती होते. विलक्षण विध्वंस करणाऱ्या या लाटा अनेक किनारे उद्ध्वस्त करीत जातात. इंडोनेशियाजवळ झालेल्या भूकंपातील सुनामीचा अनुभव भारतासकट अनेकांनी घेतला आहे. १९८९ साली अमेरिकेत सनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या भयानक भूकंपात प्रचंड असे फ्लायओव्हर पूल एखादा धुण्याचा कपडा पिळावा असे पिळवटून कोलमडले होते. तर १९०६ साली त्याच भागात झालेल्या भूकंपात कित्येक किलोमीटर लांबीचे भूकंपाचे टापू एकमेकांवर आदळल्याची खूण आजही दिसू शकते. भूकंपाची कारणे आजही अज्ञात आहेत. मध्य कवचामध्ये उत्पन्न होणाऱ्या अतिदाबामुळे बाह्य कवचाच्या हालचाली होत असाव्यात व हा दाब कित्येक वर्षे हळूहळू निर्माण होत असावा, असे मानले जाते. जगामधील भूकंप होऊ शकणारे पट्टे मात्र ज्ञात आहेत. भूकंपाला तोंड देऊ शकणारी घरे, कारखाने, यंत्रे आपण उभारू शकतो, पण त्यासाठी अफाट खर्च येतो. जपानमध्ये या स्वरूपाची काळजी घेऊन मोठ्या इमारती उभारल्या गेल्या आहेत. दुसरी सोपी काळजी म्हणजे भक्कम लाकडी व लोखंडी सांगाड्यावर घरे उभारणे. मधल्या भिंती हलक्या, तकलादू अशा वस्तूंनी उभ्या केल्या जातात. जपान हे राष्ट्र भूकंपाला तोंड देण्यासाठी सतत सज्ज असते. ११ मार्च २०११ रोजी झालेल्या तीव्र भूकंपाला व त्यानंतर उत्पन्न झालेल्या सुनामीला तोंड देणे उत्तर जपानला कठीण गेले. ८.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का फुकुशिमा या शहराला बसला. त्याचा केंद्रबिंदू शहरापासून ३०० किलोमीटर दूर समुद्राच्या पोटात होता. त्यामुळे प्रथम भूकंपाचे हादरे व त्यानंतर १० मीटर उंचीच्या सुनामी लाटा यामुळे किनाऱ्यावरची कित्येक गावे नामशेष झाली. या तडाख्यात फुकुशिमा येथील अणुविद्युत निर्मितीकेंद्रेही सापडली. सततचे भूकंप व सुनामीला तोंड देण्याची तयारी असलेल्याने या प्रलयंकारी भूकंपानंतरही मनुष्यहानी लाखोंनी न होता हजारांमध्येच थांबली. तीव्र स्वरूपाच्या भूकंपाला तोंड देताना नेहमीच अनेक प्रश्न समोर उभे राहतात. अनेक घरे कोसळून झालेली मनुष्यहानी, निवारा तुटल्याने उघड्यावर आलेली माणसे, निरुपयोगी झालेली दळणवळणाची सर्व साधने (वीज, टेलिफोन, रस्ते, रेल्वे) पिण्याच्या पाण्याचे पाइप फुटल्याने त्याचा तुटवडा या साऱ्याला तोंड देणे कठीण असते. मोठ्या भूकंपाला एखादे राष्ट्रही सहज तोंड देऊ शकत नाही ते यामुळेच. भूकंपाची पूर्वसूचना देणारी एखादी यंत्रणा वा एखादे संशोधन नजीकच्या भविष्यात होईल असेही कोणतेच चिन्ह नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*R. B. I. - Reserve Bank of India*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचार न करता पुस्तकं वाचणे म्हणजे न पचविता खात सुटणं*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्यावरणपूरक ऑक्सीजन बर्ड पार्कचे नागपूर येथे नुकतेच कोणाच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले ?२) दुबईत होणाऱ्या चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) कोणत्या चित्रपटाची २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे ?४) 'बेढप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष व महिला विभागात भारताने कोणते पदक पटकावले ? *उत्तरे :-* १) नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री २) डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत ३) लापता लेडीज ४) बेडौल ५) सुवर्णपदक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 व्यंकटेश काटकर, सेवानिवृत्त शिक्षक तथा साहित्यिक, नांदेड👤 माधव शिंदे👤 श्रीकांत भोसके👤 नारायण अवधूतवार, बिलोली👤 विशाल मस्के👤 व्यंकट रेड्डी मुडेले👤 निलेश पंतमवार, नांदेड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाचे हे घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे।। मी तू हा विचार विवेके शोधावा । गोविंदा माधवा याची देही।। देही ध्याता ध्यान त्रिकुटीवेगळा । सहस्त्रदळी उगवला सुर्य जैसा।। ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती । या नावेरूपे ती तुम्हीं जाणा।। ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गरजेपेक्षा जास्त मिळूनही समाधान होत नसेल तर त्याला हाव म्हणतात. एकदा ती हाव निर्माण झाली की, माणूस कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो. आणि शेवटी त्याच जगात जगत असतो. या प्रकारचे जगणे फक्त स्वतः पुरते मर्यादित असतात. त्या जगण्याला काही अर्थ लागत नाही शेवटी हातात सुद्धा काहीही राहत नाही म्हणून या प्रकारचेही जगणे नसायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालहट्ट*एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला. सहसा असे होत नसे. दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाच्या सल्ला घेत असे. त्यामुळे बिरबल वेळेवर हजर नसल्याने अकबर नाराज होता. बिरबलाने आत येताच अकबराला मुजरा केला. अकबर त्याला म्हणाला, “काय हे बिरबल? आमचा वजीरच दरबारात उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही.”“माफ करा खाविंद. मी वेळेत तयार होतो, पण जरा अडकलो होतो.”“अडकलो होतो म्हणजे, राज्याच्या कारभारापेक्षा काय महत्वाचं काम आलं होतं?”“तसं नाही खाविंद. मला तसं नव्हतं म्हणायचं. खरं तर माझा मुलगा मी घरीच थांबावे, त्याच्याशी खेळावे म्हणुन हट्ट करत होता. मी दाराकडे वळलो कि रडत होता. त्याची समजुत काढता काढता जरा वेळ लागला. माफी असावी.”“काहीतरीच काय बिरबल, एवढ्या मोठ्या राज्याचा वजीर तु आणि एका लहान मुलाला तुला पटकन समजावता येत नाही?”“हुजूर, बालहट्ट काही सोपी गोष्ट नसते. लहान मुलांना उठसूट रागावलेलं चांगलं नसतं. आणि त्यांना फार समजही नसते. त्यांना त्याक्षणी एखादी गोष्ट हवी वाटली तर तीच पकडून बसतात. त्यांना जरा प्रेमाने, गोडीगुलाबीने समजावणं कठीण काम असतं. त्याला वेळ लागतोच.”“मला त्यात काही अवघड वाटत नाही बिरबल. तू पराचा कावळा करतो आहेस.”“तुम्ही काही वेळ मुलांसोबत घालवल्यावर तुम्हाला नक्की पटेल, खाविंद.” “आण लहान मुलांना. मी दाखवतोच तुला, सहज सांभाळीन मी.”“हुजूर, लहान मुलांना आणायची गरज नाही. मला आता लहान मुलांचा चांगलाच अनुभव आहे, काही वेळ मीच लहान मुलांसारखा वागतो आणि तुम्ही माझ्या वडिलांसारखे वागा.”“चालेल.”“पण हुजूर, एक अट आहे. तुम्ही न चिडता, न रागावता, न ओरडता मला सांभाळून दाखवायचं.”“मंजुर आहे बिरबल, आज दरबार संपल्यावर तु मुलासारखा वाग आणि मी वडिलांसारखा वागतो.” दरबार संपला आणि निवाडे, तक्रारी अशा विविध कामांसाठी आलेली माणसे घरी गेली. अकबराने बिरबलाला सांगितले चल आता ठरले तसे करूया. बिरबल लगेच खाली बसला. आणि मला खेळणे हवेत म्हणुन हट्ट सुरु केला. अकबराने त्याची समजूत काढली, “अरे बेटा, इथे दरबारात कुठे खेळणे असणार? आपण पकडा पकडी खेळूया का?”“नाही नाही, मला खेळणे हवेत.” असे म्हणुन बिरबलाने मोठ्याने रडायला सुरु केले. “अकबराने आपल्या सेवकाला खेळणे आणायला पाठवले. आणि मग बिरबलाला म्हणाला “बेटा, बघ मी तुझ्यासाठी खेळणे आणायला सेवकाला पाठवले आहे. आता जरा शांत हो. खेळणे येईपर्यंत आपण दुसरे काहीतरी खेळू.”बिरबल शांत झाला. आणि म्हणाला “ठीक आहे बाबा, आपण घोडा घोडा खेळू. तुम्ही घोडा व्हा, मी तुमच्यावर रपेट मारणार.” अकबर चमकला. “हे काय बिरबल? तू माझ्या पाठीवर बसणार? तुझी एवढी हिम्मत?”“हुजूर आपण भूमिकेत आहोत हे विसरू नका. मुले आपल्या बाबांशी घोडा घोडा खेळतच असतात. तुम्हाला नसेल खेळायचे तर तुम्ही हरलात म्हणुन कबुल करा.”“नाही, अजुन मी हरलो नाही. मला कोणी घोडा बनवलं नाही अजुन. पण हरकत नाही. मी बनतो घोडा.”अकबर खाली बसला आणि वाकुन घोडा झाला. बिरबल त्याच्या पाठीवर बसुन फिरून आला. अकबराचं अंग अवघडलं.सेवक खेळणे घेऊन आला. बिरबल त्या खेळण्यांशी काहीवेळ खेळला. अकबराला वाटले आता झाले. तेवढ्यात बिरबलाने मला भूक लागली म्हणुन भोकाड पसरले. अकबराने त्याच्यासाठी खायला मागवले पण तो खायला ऊस हवा म्हणुन रडायला लागला. अकबराने सेवकाला पाठवुन उसाच्या कांड्या मागवल्या. त्या येईपर्यंत बिरबल रडतच होता. सेवक उसाच्या कांड्या घेऊन हजर झाला. बिरबल म्हणाला मी इतका मोठा ऊस कसा खाऊ? मला याचे तुकडे करून द्या.सेवकाने त्याचे छोटे तुकडे केले. परत बिरबल रडायला लागला. “फार छोटे तुकडे केले, मला थोडे मोठे तुकडे हवे होते.”अकबराने बिरबलाला सांगितले “काही होत नाही बेटा, आपण दुसरी कांडी घेऊन तिचे थोडे मोठे तुकडे करू. मग झालं ना?” बिरबल म्हणाला “नाही नाही, मला दुसरी कांडी नाही ह्याच कांडीचे थोडे मोठे तुकडे हवे होते.” अकबराने समजावुन सुद्धा बिरबल ऐकेना. आता अकबराची सहनशक्ती संपली. तो ओरडला. “बिरबल, बस झाला हा वाह्यातपणा, आता शांत हो नाही तर चाबकाचे फटके देईन.”बिरबल रडायचं थांबला आणि लगेच नेहमीच्या आवाजात अकबराला म्हणाला “पाहिलंत खाविंद, मुलांना सांभाळणं एवढं सोपं नसतं. तुम्ही तर एका लहान मुलाला, खोटा का असेना, चाबकाचे फटके मारायला निघालात.” अकबर शांत झाला. “बरोबर आहे बिरबल, मला वाटलं तेवढं हे सोपं नाही. आता हे खेळणे आणि ऊस घरी घेऊन जा तुझ्या मुलासाठी. त्याच्या बाबाला आम्ही दरबाराच्या कामात अडकवुन ठेवतो म्हणुन. आम्हाला तुझी आजची अडचण समजली. पण तरीही दरबारात पुन्हा उशीर करू नकोस. आपल्या खाजगी कारणासाठी प्रजेला खोळंबुन ठेवणं बरोबर नाही. आपल्या मुलाशी जरा लवकर खेळ आणि दरबाराच्या वेळेच्या आधीच त्याची समजूत काढुन लवकर निघत जा.” बिरबलानेही ते मान्य केले आणि अकबराचा निरोप घेऊन घरी गेला.लेखक: आकाश खोत यांच्या ब्लॉग वरून साभार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment