✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 सप्टेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/afErT9Yde4yi6EUH/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📀 *_राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस _*📀•••••••••••••••••••••••••••••••••••••••📀 *_ या वर्षातील २६८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 📀 *_महत्त्वाच्या घटना:_* 📀••••••••••••••••••••••••••••••••• *२००७: भारताने महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 'टी २० विश्वकरंडक' जिंकला.**१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पातील २२० मेगावॉट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.**१९९५: गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ’मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी लेखक आहेत.**१९९४: ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.**१९६९: भारत सरकारने विद्यापीठ पातळीवर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली**१९६०: अणूशक्तीवर चालणार्या ’यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण**१९४८: होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना.**१९४६: हाँगकाँग येथे ’कॅथे पॅसिफिक एअरवेज’ ची स्थापना झाली.**१९३२: दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.* 📀 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📀••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: विकास वर्मा -- भारतीय अभिनेता आणि मॉडेल**१९७४: प्रा. अलका ज्ञानोबा सपकाळ -- कवयित्री**१९६९: वृषाली वसंत आठल्ये -- लेखिका* *१९६६: डॉ.उर्मिला संजय व्यवहारे -- लेखिका**१९६२: सुजाता लोखंडे -- कादंबरीकार, लेखिका* *१९५८: राम किसनराव पवार -- शिक्षणतज्ञ, विचारवंत, निवृत्त शिक्षण उपसंचालक**१९५५: संजय जोग -- दूरदर्शन व चित्रपट मधील अभिनेता (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९५ )**१९५०: मोहिंदर अमरनाथ – क्रिकेटपटू आणि समालोचक**१९४६: प्रियंवदा करंडे --- बाल, किशोर व कुमारवयीन. मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखिका**१९४०: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४ )**१९३८: पिलू दारा रिपोर्टर -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच (मृत्यू: ३ सप्टेंबर २०२३ )* *१९३७: बाबुराव वरघटे -- कवी, लेखक* *१९२४: गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (मृत्यू: ३१ मार्च २००४ )**१९२२: गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक,संपादक व साहित्यिक (मृत्यू: ३० मार्च १९८९ )**१९२१: डॉ.सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक(मृत्यू: ७ जून १९९२ )**१९१५: प्रभाकर शंकर मुजूमदार – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत**१९११: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (मृत्यू: १० मार्च १९८५ )**१९११: हमीद अली मुराद -- फक्त मुराद या नावाने ओळखले जाते चरित्र अभिनेते (मृत्यू: २४ एप्रिल १९९७ )**१९१०: गोविंद राऊत -- लेखक**१८९८: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्या पंडित (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६० )**१८८९: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक.व लेखक (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ )**१८८७: भास्कर कृष्ण उजगरे -- लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर १९३५ )* *१८६१: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६ )**१५५१: दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत – कवी (मृत्यू: २८ जानेवारी १६१६ )**१५३४: गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१ )* 📀 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📀 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: मोहन भंडारी -- दूरचित्रवाणीवरचे अभिनेते (जन्म: ३१ जुलै १९३७ )**२०११: सुरिंदर कपूर --भारतीय चित्रपट निर्माता (जन्म: २३ डिसेंबर १९२५ )**२००६: पद्मिनी रामचंद्रन -- भारतीय सिने अभिनेत्री व भरतनाट्यम नर्तकी (जन्म: १२ जून १९३२ )**२००२: श्रीपाद रघुनाथ जोशी [कोल्हापूर] – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक (जन्म: २३ जानेवारी १९२० )**१९९८: वासूदेव पाळंदे – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते,दिग्दर्शक व कुशल संघटक. पुण्यातील 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’, ’महाराष्ट्रीय कलोपासक’, ’जागर’ इ. नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.* *१९९२: सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश (जन्म: २६ एप्रिल १९०८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सहज सुचलेली बाल कविता..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुजरातची रिया सिंघा बनली मिस युनिव्हर्स इंडिया, उर्वशी रौतेलाने घातला मुकुट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लापता लेडीज चित्रपटाची ऑस्करच्या शर्यतीसाठी निवड, 29 चित्रपटांमधून निवडला किरण रावचा चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती, छाननीमुळं विलंब लागलेल्यांनाही मिळणार तिन्ही हप्त्यांची रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे असेल पुण्याच्या नव्या विमानतळाचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार; मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 24 निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडलळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृत्यू, स्वतःवर झाडली गोळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग*१.] *कोथिंबीर* :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.२.] *कढीलिंब* ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४.] *माठ* :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. ६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. ७.] *अळू* :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. ८.] *अंबाडी* :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. ९.] *घोळ* :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. १०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*D. T. D. C. - Desk to Desk Courier*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठी स्वप्ने पाहणारेच,मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजावर कोणता संस्कृत श्लोक कोरलेला आहे ?२) दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांनी शपथ घेतली ?३) जगात ऑनलाईन शॉपिंग सर्वाधिक कोणत्या देशात होते ?४) 'प्रात:काळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे ? *उत्तरे :-* १) यतो धर्मस्ततो ज: ( जेथे धर्म आहे, तेथे विजय होईल.) २) तिसऱ्या ३) चीन ४) सकाळ, उषा, पहाट ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. तौफिक खान पठाण, धर्माबाद👤 ओमप्रकाश सुरेश गंजेवार, धर्माबाद👤 राजू यादव👤 विरेश भंडारे👤 सतीश आरेवार👤 अंकुश मापारी👤 सारंग दलाल, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥ जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां त्वरीत भावयुक्त ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वारंवार कोणाच्या विषयी नको त्या शब्दात बोलून आपला अनमोल वेळ वाया घालविण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघण्यासाठी थोडा वेळ काढावा. कारण आपण जेव्हा दुसरी कडे बघत असतो किंवा बोलत असतो त्यावेळी आपल्याकडेही बघणाऱ्यांच्या अनेक नजरा असतात. म्हणून दुसऱ्या विषयी बोलताना ताळतंत्र ठेवूनच बोलावे.जर अशीच वेळ निघून गेली तर आपल्या जवळ पाहिजे तेवढा वेळ उरणार नाही म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन चांगले कार्य करून दाखवावे जेणेकरून इतरही त्यातून शिकू शकतील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दयेचा स्ट्राईक*अब्दुलकडे एक शेळी होती, त्या शेळीला एक लहान पिल्लू होते. अब्दुलने त्या दोघांवर प्रेम केले आणि त्यांच्यासाठी शेतातून मऊ मऊ गवत आणले. दोन्ही शेळ्या गवत खाऊन आनंदी झाल्या. अब्दुलला दुरून पाहून ती लगेच त्याच्याकडे धावत असे. अब्दुल चौथीत शिकत असे. एके दिवशी तो शाळेत गेला होता. त्याच्या आई आणि वडिलांनी बकरीचे पिल्लू सलीमला विकले. सलीम जेव्हा त्या पिल्लूला घेऊन जाऊ लागला तेव्हा शेळी जोरात रडू लागली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला दोरीने बांधले होते. सलीम पिल्लूला घेऊन खूप दूर गेला. पिल्लूही जोरात रडत होतं. तो आईला हाक मारत होता. आईची ममता अश्रूंनी वाहत होती, पण ती असहाय होती. शेळीने शेवटचा विचार केला, जर तिने आता प्रयत्न केले नाहीत तर ती आपल्या पिल्लूला कधीही भेटू शकणार नाही. असा विचार करून एकदा प्रयत्न केला. शेळीच्या गळ्यातून दोरीचा फास तुटला. ती शेळी जीव तोडून सलीमकडे धावली. तिचे पिल्लू पाहून शेळीने सलीमवर जोरदार हल्ला केला. सलीमने बराच वेळ धडपड केली, पण शेळीचा हल्ला थांबवता आला नाही. अचानक शेळी अनेक आघात करत राहिली. शेवटी सलीमने हार मानली आणि शेळीचे पिल्लू तिथेच सोडले. अम्मी-अब्बूकडून पैसे घेऊन सलीम परतला. अब्दुल घरी आल्यावर शेजाऱ्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तो आई-वडिलांवर रागावला. आई-वडिलांनी खूप समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. कारण त्याच्यासाठी त्या शेळ्या अनमोल होत्या.नैतिक - आईच्या करुणेच्या हल्ल्याने मोठ्या शक्तींचा पराभव होतो. आई आपल्या मुलासाठी आपला जीव पणाला लावते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment