✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. १८३५ - ऑस्ट्रेलियात  मेलबर्न शहराची स्थापना. १८३५ - अमेरिकेत  ह्युस्टन शहराची स्थापना. १९८४ - स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन. 💥 जन्म :- १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. १९३० - वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती. १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १४२८ - शोको, जपानी सम्राट १९४९ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ* --------------------------------------------------- 2⃣ *पुरामुळे बंद केलेला केरळमधील कोची विमानतळ पासून पुन्हा सुरु* ---------------------------------------------------  3⃣ **पुणे - इयत्ता दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, बारावीप्रमाणे दहावीचा ही निकाल घसरला, यंदा 23.66 टक्के निकाल, मागील वर्षी 24.44 टक्के निकाल होता.** --------------------------------------------------- 4⃣ *बिग बी शेतकऱ्यांना देणार मदतीचा हात; शहिदांच्या कुटुंबांनादेखील करणार अर्थसहाय्य, 200 शेतकरी आणि 44 शहीद जवानांच्या कुटुंबांना करणारा मदत* --------------------------------------------------- 5⃣ *एन. टी. रामाराव यांचे पुत्र, तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि तेलुगू देसम पार्टीचे नेते नंदमुरी हरिकृष्ण यांचे भीषण अपघातात झाले निधन* --------------------------------------------------- 6⃣ *जालना : नंदुरबार येथे शासकीय अधिकाऱ्यास मारहाणीच्या निषेधार्थ जालना जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी महासंघाचे आज लेखणीबंद आंदोलन* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: तब्बल 48 वर्षांमध्ये भारताला तिहेरी उडीमध्ये पहिले सुवर्णपदक, भारताला अरपिंदर सिंगने तिहेरी उडीमध्ये जिंकवून दिले सुवर्णपदक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दर गुरुवारी प्रकाशित होणारे शैक्षणिक सदर *उपक्रमातून शिक्षण* *क्रांतिकारकांच्या आठवणीने भारावलेली पिसवली शाळा - अजय लिंबाजी पाटील, ठाणे* http://shikshakmitr.blogspot.com/2018/08/blog-post.html आपण ही आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम खालील मोबाईल क्रमांकावर whatsapp द्वारे पाठवू शकता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *घृष्णेश्वर मंदिर* घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिरअसून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण,  स्कंदपुराण,  रामायण,  महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) पुष्कर मेला कोठे भरतो ?* - जयपुर *०२) आजाद हिन्द फ़ौजची स्थापना कोठे झाली ?* - सिंगापुर *०३) क्षेत्रफळाच्याबाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक आहे ?* - सातवा *०४) जाकिर हुसैन कशाशी संबंधित आहेत ?* - तबला *०५) लाल बहादुर शास्त्री यांचीसमाधीकोठे आहे ?* - विजय घाट *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * अरुण चव्हाण  * नागभूषण माकोड, येवती * गणेश बोळसेकर * दिलीप झरेकर * कृष्णा श्याम दाभडकर * नीरज नागभूषण दुर्गम * नागेश कुऱ्हाडे * माधुरी हतनुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसतं तसं नसतं* दिसतं तसं अगदी सर्व असतं नाही दिसतं तसं नसतं लक्षात ठेवा माणूस फसतं नाही दिसतं त्यापेक्षा कुठेही फार वेगळ असतं विश्वास बसणार नाही असंच सगळं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 06*      *पत्ता बोला वृक्ष से* *सुनो वृक्ष बनराय |* *अब के बिछड़े न मिले* *दूर पड़ेंगे जाय ||* अर्थ : संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे. पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्‍या पान अन मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण कुणालातरी नाव ठेऊन त्याचा अपमान करुन स्वत: मी काही वेगळा आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा तुम्ही त्यांच्यातील चुका सुधारण्यासाठी प्रेरीत करत आहात हे निश्चित आहे. परंतू आपल्यातल्या दोषांना किंवा चुकांना वृध्दींगत करण्याची संधी देत आहात हे लक्षात असू द्या. कारण आपल्या दोषांना सुधारण्यासाठी संधीच देत नाही. इतरांचे ऐकून घेण्यासारखी मनस्थिती नसते. इतरांचे दोष काढण्यात धन्यता मानता त्यामुळे इतरांना संधी मिळते तर आपली संधी आपल्याच गर्वापायी सुधारण्याची संधी गमावली जाते. असे न करता पहिल्यांदा आपल्यातील दोष शोधून आपणच सुधारण्याची संधी शोधली म्हणजे इतरांना उपदेश देण्याइतपत हक्क आपल्याला कदाचित मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बेवारस - Helpless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा* रविवारचा दिवस होता. पाय मोकळे करावे म्हणून घराबाहेर पडलो. फिरता फिरता मुख्य बाजाराच्या रस्त्यावर आलो. रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे बरीच दुकानं बंद होती. रस्त्यावर रहदारी सुद्धा तुरळक होती. मी रमत गमत निघालो होतो. तोच कांही अंतरावर एका बंद दुकानाच्या समोर बरीच गर्दी जमलेली दिसत होती. उत्सुकतेपोटी मी ही त्या गर्दीत सामील झालो. प्रत्येकजण दुकानाच्या पायरीच्या दिशेने पहात होता. मी पण डोकावून पाहू लागलो. दुकानाच्या पायरीवर एक स्वच्छ कापडी पिशवी ठेवलेली दिसत होती आणि ती कशाने तरी गच्च भरलेली होती. त्या पिशवीचा कोणी वारसदार तिथे नव्हता. त्यामुळे त्या पिशवी बद्दल प्रत्येकाच्या मनांत शंका येत होती. गर्दीतील प्रत्येक व्यक्ती त्या बेवारस पिशवीकडे पहात आपलं मत मांडत होती. एकजण म्हणाला, ‘‘कोणी यात्रेकरू चुकून विसरून गेलेला दिसतो आहे.’’ त्यावर दुसरा उद्गारला, ‘छे छे कांहीतरी चोरीची भानगड असावी. तर तिसर्याला वेगळीच शंका, ‘‘कशावरून आंतमध्ये काही वेगळे असू शकते. तात्पर्य – व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment