✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/08/2018 वार - मंगळवार =======ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय हातमाग दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९७६ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.  १९९१ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध. 💥 जन्म :-  १९२५ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ.  १९६६ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक. 💥 मृत्यू :-   १९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे थेट हवाई मार्गाने जोडल्यास उभय देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. यादृष्टीने उभय देशांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याच्या मानस अध्यक्ष स्टुअर्ट रॉबर्ट यांनी व्यक्त केले* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - इंदिरा नुयी यांच्याकडून पेप्सिको कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा* ---------------------------------------------------  3⃣ *राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर जाणार, मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह 17 लाख कर्मचारी जाणार संपावर* --------------------------------------------------- 4⃣ *इंडोनेशियात झालेल्या भूकंपात आतापर्यंत 82 लोकांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी* --------------------------------------------------- 5⃣ *राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला होणार मतदान* --------------------------------------------------- 6⃣ *मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर, राज्य सरकार आज हायकोर्टात देणार शपथपत्र* --------------------------------------------------- 7⃣ *India vs England Test : लॉर्ड्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला जसप्रीत बुमरा मुकण्याची शक्यता * --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय हातमाग दिवस - 07 ऑगस्ट* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रांतिसिंह नाना पाटील* क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील  मराठी राजकारणी होते. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव. नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'रिडल्स इन हिंदूइझम'चे लेखक कोण ?*          डॉ. बाबासाहेब आंबेडकर *२) भारताच्या राष्ट्रध्वजाची निवड कधी करण्यात आली ?*        २२ जुलै १९४७ च्या घटनासभेत *३) क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?*       सातवा *४) 'केसरी' या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष कोणते ?*          १८८१ *५) सौर वर्षाची सुरुवात कधी येते ?*        २१ किंवा २२ मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 दत्ता डांगे, प्रकाशक, नांदेड 👤 श्रीनिवास मस्के, साहित्यिक, नांदेड 👤 मनोज रापतवार, धर्माबाद 👤 रवींद्र चातरमल 👤 सिद्धार्थ सिरसे 👤 मोहन हडोळे 👤 मंगेश पेटकर 👤 तुकडेदास धुमलवाड 👤 सतिश कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========     *शहाणे* उथळ पाण्याला  खळखळाट फार असतो  वर वर स्वच्छ वाटणा-या पाण्यातच गाळ असतो काही लोकांना वाटते  आपण फार शहाणे आहेत  माहित नसते त्यांना  आपण किती अनजाने आहेत      शरद ठाकर    सेलू जि परभणी    8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========          *देव नाही देव्हा-यात,*               *देव नाही देवालयी,*          *देव मुर्तीत ना मावे,*               *तीर्थक्षेत्रात ना दावे,*          *तुझ्या-माझ्या जड देही*                   *देव भरूनिया राहे.....!* *देवाचे घर कोणते किंवा तो कुठे राहतो ? त्याची भेट घेण्यासाठी डोंगर चढून जायचे की दूर-दूर चालायचे ? परदेशी जायचे की नदीत स्नान करायचे. देवाची आरती ओवाळायची की सुवासिक धूप-अगरबत्ती लावायची ?* *" शेवटी देवाचा शोध हा प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रयत्न आहे आणि जो कोणी देवाला खरेपणाने शोधतो त्याला तो नक्कीच सापडतो."*     •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••          🌷🌷🌷🌷🌷🌷         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते.जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपदेश - preaching* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* रोज शाळा सुटल्यावर भूक लागल्यामुळे चिन्मय धावतच घरी यायचा. त्याची आई रोज त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करायची. कधी इडली, ढोकळा, थालिपीठ, नूडल्स अगदी रोज काहीतरी वेगळे असायचेच. शाळेतल्या मित्रांना त्याचा हेवा वाटायचा. एके दिवशी घरी आल्यावर आई झोपलेली होती. तो घाईने आई जवळ गेला. आईला ताप आला होता. त्याला पाहून क्षीण आवाजात आई म्हणाली, " चिनू बेटा, मला ताप आल्यामुळे अजिबात उठवले जात नाही आहे. मी तुझ्यासाठी काही खायला करु शकले नाही. आजचा दिवस तू सकाळचीच पोळी-भाजी खा आणि दूध पी". हे ऐकल्यावर चिनूला खूपच राग आला. "हे काय डब्याही तेच आणि आताही तेच ? मी नाही काही खात जा" चिन्मय धूसफूसत म्हणाला. शेवटी काही न खाताच तो चिडून खेळायला गेला. आईला बरे नाही म्हणून संध्याकाळी बाबा स्वयंपाक करत होते. "चिनू आज तुझी मला मदत हवी आहे. मटार सोलून दे बरं", बाबा पोळया लाटता लाटता म्हणाले. नाखुषीनेच चिनूने मटार सोलायला घेतले. त्यानंतर तांदूळ निवडले. "बापरे किती वेळ लागतो हे करायला." चिनू वैतागला. बाबाही बराच वेळापासून स्वयंपाकघरात होते पण त्याच्या फक्त पोळया आणि भाजी करुन झाली होती. अजून कुकर लावायचा बाकी होता. "हो ना रे चिनू, आपण इतका वेळ स्वयंपाकघरात आहोत पण दोनच पदार्थ करु शकलो. आई रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ इतके पदार्थ कसे करत असेल ? ते सुध्दा आपली अजिबातच मदत नसतांना?" बाबाच्या ह्या प्रश्नाने चिनूला आपले संध्याकाळचे वागणे आठवले. ताप आलेला असतांनाही आपण आईशी किती वाईट बोललो हे आठवून त्याला खूप वाईट वाटले. धावतच तो आईच्या खोलीत गेला. आईच्या जवळ जाऊन तिला म्हणाला , "आई मला माफ कर. तू आमच्यासाठी किती कष्ट घेतेस. मी मात्र तुला बर नसतांनाही खायला करायचा हटट केला. कधी कधी तर तू प्रेमाने कलेले, मी मात्र आवडत नाही म्हणून सरळ टाकून देतो. माफ कर मला आई". चिन्यमचे हे बोलणे ऐकून आईने त्याला जवळ घेतले.बाबाही पाने आणायला स्वयंपाक घरात गेले.आणि सर्वजण मिळून आनंदाने जेवले. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment