✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९०० - फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले. १९२३ - कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी. १९४६ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना. १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य. २००५ - मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव २०१४ - चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार. 💥 जन्म :- १७७० - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा. १८११ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक. १८५५ - ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान. १८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८७२ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा. १९३३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाड १९३७ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू १९४८ - ज्यॉँ-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा. १४६० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा. १७९७ - जेफ्री ऍम्हर्स्ट, इंग्लिश सेनापती. १९२५ - विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९७७ - मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष. १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आर्थिक सुधारणांच्या बाबतीत मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय असल्याचं मत चिनी मीडियानं मांडलं आहे* --------------------------------------------------- 2⃣ *मध्य प्रदेश: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात* ---------------------------------------------------  3⃣ *मुंबई - उल्हासनगरात अक्षर प्लास्टिक कारखाना सील, एका टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचे आढळले साहित्य* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर* --------------------------------------------------- 5⃣ *भारतात होऊ घातलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रशिया मीडियाच्या माध्यमातून हस्तक्षेप करण्याची शक्यता ऑक्सफर्ड तज्ज्ञांनी वर्तवली* --------------------------------------------------- 6⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात दिनेश कार्तिकला शून्यावर त्रिफळाचीत करत बेन स्टोक्सने साजरे केले बळींचे शतक* --------------------------------------------------- 7⃣ *World Badminton Championships 2018 : भारताची महिला बॅटमिंटनपटू सानया नेहवालने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक मारली* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========    *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *उमाजी नाईक* उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक. होते. नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कलालवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यासस्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) कोणत्या किटकाच्या दंशानं हिवताप होतो ?*            डास *२) सूक्ष्म वीजप्रवाह मोजणारं उपकरण कोणतं ?*          सूक्ष्मवीजमापी *३) क्षय हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?*            फुफ्फुस *४) तापमापकाचा शोध कोणी लावला?*            डॅनियल फॅरेनहाइट *५) पेशीविषयक माहिती देणारं शास्त्र कोणते ?*          पेशीवंशशास्त्र *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अजय बिरारी 👤 पोतन्ना चिंचलोड 👤 शिरीष पद्माकर देशमुख 👤 प्रदीप काळे 👤 उत्तमराव नरवाडे 👤 भंवर सिंग *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========       *ध्यास* काही काहींना सतत नव्याचा ध्यास असतो  यशस्वी होण्याचा तोच तर खरा श्वास असतो  ध्यास धरणाराला खरं  यशस्वी होता येत  ख-या अर्थाने यशाचं गाणं त्याला गाता येत     शरद ठाकर   सेलू जि परभणी  8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.* *'रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.*         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काल तुम्ही तुमच्याबद्दल जो काही विचार केला असेल त्याची आज थोडी उजळणी करून पहा. नक्कीच तुम्ही तुमच्याबद्दल चांगलाच विचार केला असेल आणि तुमच्याच हिताचा असेल की, ज्यामुळे तुमच्या जीवनात काही तरी परिवर्तन घडवून आणण्यासाठी असेल. आता तोच विचार जर तुमच्या जीवनात चांगले परिवर्तन घडून आणतो तर त्याच विचाराला तुम्ही इतरांसमोर मांडून पहा. कदाचित इतरांच्याही जीवनात तुम्ही सांगितलेल्या विचारांशी ते सहमत होतील आणि त्यांच्या जीवनात इष्ट तो बदल घडून येऊन चांगले जीवन बदलण्याची दिशा मिळेल. म्हणजेच तुमच्या हातून एखादे चांगले कार्य इतरांसाठी घडले त्याचे समाधान तुम्हाला वाटेल. तुमच्या एका चांगल्या विचारांमुळे तुमच्या जीवनात रोडवर इतरांच्याही जीवनाचा चांगला विचार करण्याची सुवर्णसंधी आली हे कधीही तुम्ही विसरणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========           परिवर्तन - Change संकलक - कुणाल पवारे, कुंडलवाडी 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========         *स्वतः मध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment