✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १३०५ - देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध. १७०८ - मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक. १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली. १९३९ - दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघानेबाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली. १९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू. 💥 जन्म :- १८५२ - क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष. १९०९ - सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६३ - रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६७ - रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ६३४ - अबु बकर, अरब खलीफा. १८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ. १८९२ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शासकीय आकडेवारीनुसार राज्यात २१ हजार बालके तीव्र कुपोषित, मेळघाटात ३० दिवसांत ३७ बालकांचा मृत्यू* --------------------------------------------------- 2⃣ *राज्यांच्या पैशांच्या हव्यासामुळे पेट्रोल, डिझेल कधीही जीएसटीच्या कक्षेत येण्याची शक्यता कमी* ---------------------------------------------------  3⃣ *2019 पर्यंत राज्यातील रस्ते होतील झकास, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना विश्वास* --------------------------------------------------- 4⃣ *पॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद* --------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर : पुत्रदा एकादशीनिमित्त काल पंढरीत भाविकांची गर्दी, चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ, अनेक मंदिरं व समाधी पाण्याखाली* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन*  --------------------------------------------------- 7⃣ *ट्रेंट ब्रिज - तिसऱ्या कसोटीत भारताची इंग्लंडवर 203 धावांनी मात, जसप्रीत बुमराचे पाच बळी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========     *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *भीमाशंकर ज्योतिर्लिंग* भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर,  सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्हांला रंजक वाटणाऱ्या व्यवसायाची निवड करा, यामुळे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावे लागणार नाही *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता?* 👉🏼 शुक्र *२) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?* 👉🏼 गुरू *३) हॅले हा धुमकेतू किती वर्षानी दिसतो?* 👉🏼 ७६ वर्षानी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * अनिलकुमार शिंदे, किनवट * सचिन बोरसे, नांदेड * आनंद यादव, धर्माबाद * बाबुराव पिराईवाड, धर्माबाद * रामदास पेंडपवार, निझामाबाद * भोजन्ना चिंचलोड, येवती * सुनील बेंडे * भारत सर्वे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *ती* मन चिंब भिजले आहे तनात बी रूजले आहे पेरलं की उगवतेच ती सर्वांना जगवतेच शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 02* *अंधो का हाथी सही,* *हाथ टटोल-टटोल ।* *आंखोंसे नहीं देखिया,* *ताते विन-विन बोल।* अर्थ : अंध व्यक्तीसमोर हत्ती उभा केला तर ती व्यक्ती हत्तीला चापळूनच त्याच्या आकृती बद्दलचे मत तयार करते, कारण तो हत्ती आंधळ्याचा आहे. त्याच्या अनुभूतीनुसार त्याची हत्तीविषयीची धारणा आहे. रंग,रूप,आकार जाणण्याइतकी दृष्टी त्याच्याकडे नाही. त्याचं समज विश्व स्पर्श, श्रवण, गंध व रसनेवरचं ! एकाद्या बाबीची अनुभूती घेताना त्या प्रसंगाशी पूर्णपणे एकरूप होता आलं की ती बाब लक्षात येते. पंचेंद्रिय कार्यरत असूनही अज्ञानी व मुढ व्यक्ती अनुभूतीमध्ये समरस होत नाहीत. त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्ती होत नाही व अज्ञानाचे भ्रमही दूर होत नाहीत. त्यामुळे बुद्धी व मनाची सांगड घालून ती बाब तपासायला हवी. तेव्हाच ईश्वराचे खरे स्वरूप कळते. नाही तर अशीच मंडळी निरर्थक बाबी सांगून ईश्वराविषयी अवडंबर वाढवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही. केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल. म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कंत्राट - Contract* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *धनाचा गर्व* एकदा एका उंदराने हिरा गिळला हिऱ्याच्या मालकाने त्या उंदिराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा सगळे उंदिर एक घोळका करून एका दुसऱ्यावर चढून दाटीवाटीने बसले होते पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला होता शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता. हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच उंदराला कसे काय ओळखले? शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..! आयुष्यात धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा पण आपण ज्या समाजात वाढलो जगलो मोठे झालो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आपण ह्या समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका नाहीतर त्या मूर्ख उंदिरामध्ये आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही..! *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment