✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣      ( फ्रेश शालेय परिपाठ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/08/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन* *भारतीय क्रीडा दिन* *तेलगू भाषा दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९७४ - चौधरी चरण सिंह यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली. 💥 जन्म :- १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू. १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक. १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : महापुरामुळे केवळ केरळवासियांसाठीच केंद्र सरकराने प्राप्तिकर भरण्याची मुदत वाढविली असून ती आता 15 सप्टेंबरपर्यंत केली आहे.* --------------------------------------------------- 2⃣ *उत्तर प्रदेशात 30 पोलीस अधिका-यांच्या करण्यात आल्या बदल्या* ---------------------------------------------------  3⃣ *पुणे - इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार ऑनलाइन जाहीर* --------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : डीबीटी रद्द करावी या मागणीसाठी स्टुटंड फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा* --------------------------------------------------- 5⃣ *चेन्नई - तामिळनाडूचे माजी अध्यक्ष एम. करुणानिधी यांना भारतरत्न देण्याची डीएमकेची मागणी* --------------------------------------------------- 6⃣ *डॉ. अविनाश सुपे यांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. बी सी रॉय पुरस्कारासाठी निवड* --------------------------------------------------- 7⃣ *एशियन गेम्स 2018: मनजित सिंगने जिंकले अॅथलेटीक्समध्ये सुवर्ण* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *तुझी जात कंची ?* मुंबईहुन प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. http://epaper.ejanshakti.com/m5/1794308/Mumbai-Janshakti/29-08-2018#page/4/1 जरूर वाचावे आणि आवडल्यास share पण करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *केदारनाथ* केदारनाथ हे भारताच्या उत्तराखंडराज्यामधील एक लहान गाव आहे. केदारनाथ येथील अतिप्राचीन केदारनाथ मंदिरासाठीप्रसिद्ध आहे. भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड ह्या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) इ.स.१७७४ मध्ये भारतात कुठे कोळशाची पहिली खाण उत्पादनक्षम झाली ?* राणीगंज *२) 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन'ची स्थापना कधी झाली ?* १९ जुलै १९९० *३) भारतातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय कुठे आहे ?* अलिपूर कोलकाता *४) 'लोकनायक' ही पदवी कुणाला दिली गेली ?* जयप्रकाश नारायण *५) उत्तर प्रदेशमध्ये किती जिल्हे आहेत ?* ७५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * योगिता सुरेश येवतीकर, नांदेड * शिवराज पाटील चोळाखेकर * आशिष जैन * रवींद्र केंचे * गणेश येडमे * ईश्वर सेठीए * सचिन बावणे * विनायक कुटेवाड * योगेश ढगे पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *दिखावा* हल्ली कामं कमी अन् दिखावा जास्त आहे प्रथम पहाणाराला वाटते हे एकदम मस्त आहे काम कमी अन् दिखावा जास्त व्हायला नको दिखावा करता करता महत्वाचे काम रहायला नको शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 06* *पांच पहर धंधा किया,* *तीन पहर गया सोय |* *एक पहर भी नाम बिन* *मुक्ति कैसे होय ||* अर्थ : दिवसाचे दिन आणि रात्र असे दोन भाग होतात. रात्रीचे चार प्रहर व दिनाचे चार प्रहर असतात. असे एका दिवसाचे आठ प्रहर होतात. त्यापैकी पाच प्रहर म्हणजेच पंधरा तास माणूस नित्याच्या दैनंदिन धावपळीत व्यथित करीत असतो. सहजतेने इतका वेळ नोकरी-चाकरी , मनोरंजन, आदि बाबीत उडवित असतो. तीन प्रहर म्हणजे नऊ तासांचा वेळ दररोज झोपण्यात निघून जातो. खरे तर मनुष्य जन्म इत्तर प्राण्यांपेक्षा भिन्न आहे. बुद्धी आणि बोली यांच्या वेगळेपणामुळे मनन, चिंतन ,चर्चा संवाद-सुसंवाद यांचे माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाचा वारसा मानव प्राणीच चालवू शकतो. गरज आहे ती आपल्या अष्टौ प्रहरापैकी अर्धा-एखाद प्रहर स्वार्थविरहित निरामय भावनेने जीवनाकडे बघण्याची. असा संकल्प सर्वांनी केला तर या अशा प्रगल्भ जगण्यानं या विश्वाचंं कल्याणंच होईल. सर्वांच्या दुःखाच्या व्याधीचं परिमार्जन होईल. अनावश्यक लालसा, मोह टाळता आले तर पृथ्वीवर नंदनवन बनवायला किती अवकाश लागणार आहे ! व्याधी व वेदना मुक्तीचा तोच तर खरा महामार्ग असणार आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे. कारण धनाच्या श्रीमंतीने त्याच्यामध्ये जगातल्या उपभोग्य वस्तू खरेदी करुन तात्पुरता आनंद मिळवता येतो आणि तोही स्वत:साठी. दुसरे असे की, माणसे जोडण्याऐवजी तोडण्यातच तो यशस्वी होतो. एखादी कुणी जरी व्यक्ती आली तरी त्यांच्या मनात फक्त पैसे मागण्यासाठीच आला आहे अशी शंका निर्माण होते. त्यामुळे नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचीच भूमिका त्यांच्या अंगी असते. अशा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही सदैव इतरांच्या मनावर राज्य करत जीवन व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करते. एकमेकांची मने ओळखण्याचे काम, सुखदुःख जाणणे, संकटकाळी धाऊन जाणे, आपले मन कुठेतरी मोकळे करणे, नातेसंबंध दृढ करणे ह्या सा-या गोष्टी मनाच्या श्रीमंती असणा-यामध्ये सदैव वास करत असतात. अशी माणसे सदैव नवीन काहीतरी शोधत असतात की जे आपले आणि इतरांचे नाते दृढ करतात. अशा माणसांमध्ये स्वार्थ, मतभेद, दुरावा, गर्व अशा प्रवृत्ती कधीही वास करत नाहीत. म्हणून मनाची श्रीमंती ही सर्वमान्य असून एक सशक्त समाज घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रवृत्ती - Tendency* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *१००० आरशांची खोली* एका अध्यात्मिक गुरु ना एका माणसाने विचारले "माझे कामगार माझ्याशी प्रामाणिक नाहीत. पत्नी, मुलं, सगळं जग हे स्वार्थी आहे. सगळे चुकीचेच वागतात. अस का?" तेव्हा गुरु हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली. एका गावात एक खोली होती. त्या खोलीत १००० आरसे होते. त्यात खोलीत एक छोटी मुलगी खेळायला जायची. अर्थातच तिला तिच्या भोवती अनेक मुली दिसायच्या. ती खुश व्हायची. ती हसली की त्या सगळ्या हसायच्या. तिने टाळ्या वाजवल्या की त्या सगळ्या टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे तिला ती खोली म्हणजे सर्वोत्तम जागा वाटायची. त्याच खोलीत एकदा एक खूप त्रासलेला, एकदम नाराज माणूस शिरला. त्याला त्याच्या भोवती सगळे चिडलेले, नाराज ,अस्वस्थ चेहरे दिसायला लागले. ते सगळे त्याच्याकडे रोखून पहात होते. त्याने एकदम भडकून त्यांच्यावर हात उगारला तर त्या सगळ्यांनी ही त्याच्यावर हात उगारला. त्याच्या मनात विचार आला अरेच्या काय ही खोली. जगात यापेक्षा वाईट जागा नसेल. हे जग म्हणजे अशाच हजारो आराशांची मोठी खोली आहे. आपण जसे असू तसे त्या आरशातून दिसू. जग म्हणजे स्वर्ग की नरक हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसं पाहू तसं ते दिसेल." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment