✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार. 💥 जन्म :- १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार. 💥 मृत्यू :- १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान. २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्य सरकारी कर्मचार्‍यांना १ जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनलाभ देण्याची राज्य सरकारने केली घोषणा* --------------------------------------------------- 2⃣ *जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील मेगा भरती थांबवली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा* --------------------------------------------------- 3⃣ *धनगर आरक्षणप्रश्नी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त १३ ऑॅगस्ट रोजी राज्यभर तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय धनगर समाज महासंघातर्फे घेण्यात आला* --------------------------------------------------- 4⃣ *एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट 'आ'वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त* --------------------------------------------------- 5⃣ *भारतातील सर्वात पहिला बेबी स्पा हैदराबाद शहरामध्ये सुरू, हा स्पा खास तान्ह्या मुलांकरिता असून यामध्ये केवळ नऊ महिन्यांपर्यंत वय असलेल्या तान्हय़ा मुलांना प्रवेश दिला जाणार* --------------------------------------------------- 6⃣ *रूपे कार्ड आणि भीम अँप याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास 'जीएसटी'मध्ये सवलत देण्याची योजना केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत करण्यात आली.* --------------------------------------------------- 7⃣ *चीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने केले पराभूत* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांना आळशी बनवू नये* https://storymirror.com/story/5966bd362086f79414698de6 पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारावे आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *दामोदर हरी चाफेकर* दामोदर चाफेकर यांचा जन्म श्री. हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी २५ जून १८६९ रोजी झाला. लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव दामोदरवर होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील एरवडा तुरूंगात फाशी दिली. लहानपणापासूनच दामोदरला व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रमंडळींना संघटीत करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती. इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरि चाफेकर व वासुदेव हरि चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) सर्वात ज्यास्त उस उत्पादक असलेला राज्य कोणता ?* उतरप्रदेश *०२) भारतात हीरेची सर्वात जास्त ठेव कोणत्या राज्यात आहे ?* मध्यप्रदेश *०३) भारतीय संविधान मधील समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेण्यात आली ?* ऑस्ट्रेलिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुदर्शन पाटील जोगदंड 👤 गुलाबलाल जैस्वाल 👤 राजेंद्र पोकलवार 👤 नरसिंह पावडे देशमुख 👤 गंगाधर ढगे 👤 दिनेश दारमोड 👤 दीपक हिवराळे 👤 हर्ष पाटील 👤 इरेश वंचेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूसकी* माणूसकीवरचा विश्वास रोज उडू लागला आहे इथे राजरोस फसवण्याचा प्रकार घडू लागला आहे दुस-याला फसवणारे समाधानी असू शकत नाहीत असले लोक कधीच आनंदाने हसू शकत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *_"मैत्री"_* *'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मैत्री'च्या नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते. त्यातून ख-याखु-या अस्सल 'मैत्री'ची नाती निर्माण होतात.* *बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडेल, आणि 'मैत्री' अभंग राहिल.. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात होऊन गेलेल्या घटना ह्या भूतकाळातल्या असतात आणि त्या कुणालाही बदलता येत नाहीत. परंतु त्यात झालेल्या वाईट गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जपले पाहिजे आणि जी चांगली होऊन गेलेली घटना आहे त्या घटनेला अधिक चांगले कसे करता येईल हे करण्यासाठी आपल्यासमोर भविष्यकाळ आहे तो मात्र आपल्या हातात आहे. म्हणून भूतकाळाला जास्त महत्त्व न देता भविष्याला आपल्या डोळ्यांसमोर सदैव ठेवून जीवन जगायला शिकले पाहिजे हा काळाचाच नियम आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पुनरावृत्ती - Repeat* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नगारा* एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढय़ात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्‍यावर एका झाडाची फांदी वार्‍यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्‍यावर आपला पंजा मारून लागला. तेवढय़ात त्याच्या लक्षात आले की नगार्‍याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्‍याचे कातडे कुरतडून फाडले तर.. आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या. तात्पर्य : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्‍चात्ताप करण्याची पाळी येत नाही *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment