✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार. १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. 💥 जन्म :- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.१९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष. १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी 💥 मृत्यू :- १५७४ - गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु १५८१ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आतापर्यंत 1027 कोटी रुपयांची मदत* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : पहिल्या तिमाहीत देशाच्या विकासदराची झेप, एप्रिल ते जूनदरम्यान विकासदर 8.2 टक्के.* ---------------------------------------------------  3⃣ *रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावररील खड्डे ८ सप्टेंबरपूर्वी भरणार - चंद्रकांत पाटील* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : सोलापूर शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम तीव्र, देगाव रोड येथे अतिक्रमण काढण्याचे काम महापलिकेच्या वतीने सुरू* --------------------------------------------------- 5⃣ *नाशिक : तुकाराम मुंढेंच्या अविश्वास ठरावावर प्रश्नचिन्ह, अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश* --------------------------------------------------- 6⃣ *एशियन गेम्स 2018: महिला हॉकीमध्ये रौप्यपदकावरच मानावे लागले समाधान, भारताच्या पुरुषांसह महिला हॉकी संघालाही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाने दिली हुलकावणी.* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 119 डावात सहा हजार धावा पूर्ण करीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला टाकले पिछाडीवर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांच्या प्रगतीसाठी* वरील लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *परमवीर चक्र* परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत. ग्रेनेडियर्स रेजिमेंट आणि गोरखा रायफल्स या पथकांना प्रत्येकी ३, शीख रेजिमेंट, कुमाऊँ रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स आणि द पूना हॉर्सेस या पथकांना प्रत्येकी २ पुरस्कार दिले गेले. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांपैकी लेफ्टनंट अर्देशर तारापोर हे सगळ्यात वरच्या पदाचे अधिकारी होते. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने १९८३-८५ दरम्यान पंधरा तेलवाहू जहाजे विकत घेतली. यांना त्यावेळच्या १५ परमवीरचक्र विजेत्यांची नावे दिली गेली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?* मा.प्रतिभाताई पाटील *०२) मास्टर विनायकचे पूर्ण नाव काय ?* विनायक दामोदर कर्नाटकी *०३) महाराष्ट्रातील सहकारी कारखान्याचे आद्य प्रवर्तक कोण ?* पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील  *०४) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हटले जाते ?* दादासाहेब फाळके *०५) संत एकनाथ यांचा जन्म कोठे झाला ?* पैठण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * विजय भगत वाशीम * धनराज पाटील बाभळीकर * गणेश गिरी धर्माबाद * प्रल्हाद जाधव * कोंडीबा मुत्तलेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *विज्ञाननिष्ठ* विज्ञाननिष्ठ माणूस वाटतो भोळा आहे आजच्या विज्ञानाला कुठे नवा डोळा आहे आजच्या विज्ञानाला नवा डोळा असला पाहिजे विज्ञाननिष्ठ माणूस कधी भोळा नसला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 08* *रात गवई सोय के* *दिवस गवाया खाय |* *हीरा जन्म अनमोल था* *कौड़ी बदले जाय ||* अर्थ : महात्मा कबीर मनुष्य जन्माची दुर्लभता पटवून देतात. सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव जन्म दुर्मिळ असून विश्वाची चिंता वाहण्याचं सामर्थ्य फक्त मानव जन्मातच आहे. मानव प्राणी चिंतनशील व विचारशील आहे. इतरांपेक्षा मानवाला बुद्धी आणि बोलीच वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे तो जगताची काळजी वाहू शकतो. भल्या वाईटाचा विचार करू शकतो,परंतु हल्ली मानव स्वार्थांध झाला आहे. जग आपल्यामुळं सुंदर होवू शकतं. हा भावही तो जणू विसरूनच गेलाय की काय ? अशी परीस्थिती बनलीय. मानवाने विवेकी अन निरामय जगण्यातच त्याची जीवन सार्थकता आहे. परंतु हे मानवा तू देह विलासी बणून रात्र झोपून आळसात गमावत आहेस. दिवसचे दिवस देह शृंगारात व जिभीचे चोचले पुरवण्यातच तू मश्गूल होवून संपवून टाकत आहेस. अशा प्रकारे तू हिर्‍यासमान असणारा अनमोल असा मनुष्यजन्म उगाच कौडीचेही सार्थक न करता व्यर्थच वाया घालवत आहेस. अशा प्रकारे तुझ्या या जन्माला अर्थच काय राहिला बरे ? असे जगणे तर सर्लच पशू पक्षीही जगत असतात. पुढील संत सुवचन पहा. गेला गेला रे जन्म वाया । फुकाची झिजवली काया । नाही केला रे विचार । नराचा झाला रे खर । एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराने आपल्याला या जगात इतर जीवापेक्षा वेगळा जीव जन्माला घालून काहीतरी आपल्या हातून चांगले कृत्य घडावे म्हणून पाठवले आहे. मनुष्यजन्म हा इतर जीवजन्मापेक्षा सर्वश्रेष्ठ जन्म आहे हेही आपण नाकारू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या हातून काहीतरी सत्कृत्य घडावे, इतर जीवांना आपण आपल्यासारखाच जीव मानावा, त्यांची अवहेलना करु नये, संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जावे, आपण जशी सुखासाठी धडपड करत असतो मग इतर जीवांना का दु:ख द्यावे. परमेश्वराने सगळ्याच जीवांना समान जीव देऊन स्वतंत्रपणे जगण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे त्यांचे स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये ही भावना आपल्या अंत:करणात सतत ठेवून जगायला शिकले पाहिजे,केवळ आपल्या स्वार्थासाठी जगणे नाही तर इतरांसाठी जगणे हा सर्वात मोठा उद्देश आपल्या मनुष्यजन्माचा आहे हे आपण लक्षात ठेऊन मनुष्यजन्माचे सार्थक करावे. ही मनुष्यजन्माची संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून मनुष्य जन्माला विशेष महत्त्व आहे. या चांगल्या, सुंदर जन्माला कलंक लागू न देता जीवन जगायला शिकले पाहिजे तरच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्यरुपी प्रतिनिधींचे कार्य पूर्ण झाल्याचे समाधान वाटेल. नाही तर " आला जन्माला आणि गेला वाराला " असेच होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधान - Solution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= मन निर्मळ हवे देवदत्त अतिशय अस्वस्थ झाला होता. मानसिक ताणाबरोबर त्याची प्रकृतीही बिघडायला लागली होती. गावात एक सिद्ध साधू महाराज होते. देवदत्त त्यांच्याकडे गेला आणि आपली व्यथा सांगू लागला. ‘ ‘महाराज, अति विचार करून मी त्रासून गेलो आहे. या विचारांमुळे रात्र रात्र झोप येत नाही त्यामुळे अस्वस्थपणा फारच वाढतो. आता तर प्रकृतीवरही परिणाम होऊ लागला. यावर काहीतरी उपाय सांगा. ” त्या साधू महाराजांनी देवदत्ताला आपल्या एका स्नेह्याकडे पाठविले आणि त्यांच्याकडे राहून चार-पाच दिवस त्यांची दिनचर्या पाहून येण्यास सांगितले. देवदत्त गुरुंची आज्ञा मानून त्याच्या स्नेह्यांकडे राहून त्यांची सर्व दिनचर्या पाहून परत आला. तरीही या सर्व गोष्टींचा त्याला कांहीच . उलगडा झाला नाही. ‘ ‘तू तिथे काय पाहिलंस?” या साधू महाराजांच्या प्रश्नावर देवदत्त म्हणाला, ‘ अभ्यासण्यासारखी तुमच्या स्नेह्यांची दिनचर्या नाही. ते रात्री सर्व भांडी धुतात आणि रात्रभर त्यांच भांड्यांवर थोडीशी धूळ बसली असेल म्हणून सकाळी पुन्हा ती सर्व भांडी धुऊन काढतात. मी जरा आश्चर्यानेच त्यांना या प्रकाराबद्दल विचारले? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘ ‘मी या मंगल कार्यालयाची व्यवस्था बघतो. धुळीने भरलेली भांडी किंवा कार्यालयातील अस्वच्छता मला आवडत नाही. धुळीने भरलेली भांडी स्वच्छ’ करून ठेवणे माझे कर्तव्य आहे. म्हणून ती मी सकाळ संध्याकाळ स्वच्छ करतो. हे ऐकल्यावर साधू महाराज म्हणाले, ‘ ‘देवदत्ता, जे पाहायला हवं, समजून घ्यायला हवं ते तू समजून नाही घेतलंस. अरे, चित्त निर्मळ तर सुखच सुख. ” *'नाही निर्मळ मन काय करील साबण'.* तात्पर्य : रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम मनातील जाळी जळमटं काढून मन स्वच्छ करून रात्रीला आणि दिवसाला सुरुवात करावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment