✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/08/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १२०१ - रिगा शहराची स्थापना. २००८ - पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला. 💥 जन्म :- १६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान. १६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे. १८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. 💥 मृत्यू :- १२२७ - चंगीझ खान, मंगोल सम्राट १९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.(चित्रित) १९९८ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री. २००८ - नारायण धारप, मराठी लेखक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळमधील पूरप्रकोपात ३२४ जणांचा मृत्यू, २ लाख नागरिक बेघर, केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.* --------------------------------------------------- 2⃣ *माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मानस कन्येने दिला मंत्राग्नी* ---------------------------------------------------  3⃣ *इस्लामाबाद : इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी करण्यात आली निवड* --------------------------------------------------- 4⃣ *श्रावणसरी : 28 दिवसांच्या खंडानंतर राज्यात सर्वदूर पाऊस; कापूस, तूर पिकाला जीवदान* --------------------------------------------------- 5⃣ *पुणे - आतापर्यंत पावसाने ओढ दिलेल्या उत्तर-मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, हवामान खात्याने दिला इशारा * --------------------------------------------------- 6⃣ *भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतीम संस्कार* --------------------------------------------------- 7⃣ *आज ट्रेंट ब्रिज येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार कसोटी मालिकेतील निर्णायक सामना* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिन्याला पर्याय नाही* http://epaper.ejanshakti.com/m5/1780138/Pune-Janshakti/18-08-2018#page/6/1 आजच्या दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित झालेला लेख आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========         *महाकालेश्वर ज्योतिर्लिंग* महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून ते भगवान शिव यांना अर्पण केलेले आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तीर्थक्षेत्रांमध्ये भगवान शिवचे सर्वात पवित्र निवासस्थान असे म्हटले जाते. हे मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या प्राचीन शहरामध्ये स्थित आहे. रुद्र सागर तलावच्या बाजूला हे मंदिर आहे. शिवलिंगाचे देवदेव, भगवान शिव हे स्वयंभू आहेत असे समजले जाते, इतर प्रतिमा आणि विधीपूर्वक स्थापित आणि मंत्रशक्तीसह गुंतविले जातात त्याप्रमाणेच स्वतःच्याच शक्ती (शक्ती) च्यामधून शक्तीचा प्रवाह आणला जातो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सुधारणा ही बाहेरुन लादता येत नाही, तिचा उगम आतूनच पाहिजे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) विजयघाट हे सुप्रसिद्ध स्थळ कोठे आहे ?*         दिल्ली *२) राष्ट्रा-राष्ट्रांतील नागरिकांचे आरोग्यवर्धन व्हावे म्हणून कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली ?*     जागतिक आरोग्य संघटना *३) सुवेझ कालव्यावरील इजिप्तच्या किनारपट्टीवरील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते ?*      अलेक्झांड्रिया *४) स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?*        मौलाना अब्दुल कलाम आझाद *५) युनोची घटना कुठल्या संमेलनात मंजूर झाली ?*          सॅनफ्रान्सिको *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * गजानन देवकर * गणेश थेटे * अगस्त्या तावारे * शेख समधानी * रोहित जंगलेकर * शेखर हेमके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*      [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ=========   *इंडिया फस्ट* प्रयत्नावर तुमचा अटल विश्वास होता देश विकास हाच एक ध्यास होता संयमाने तोडले तुम्ही सारे संकटाचे फास देश विकासासाठीच  घेतला प्रत्येक श्वास      शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.*      ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••           🌹🌹🌹🌹🌹🌹         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========   आपल्या जीवनात खरे यशस्वी व्हायचे असेल,आपले जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या कामात तुमचे हात सदैव क्रियाशील ठेवा, मन स्थिर ठेवा, कामातले लक्ष्य विचलित होऊ देऊ नका, कुणाचीही स्पर्धा करु नका की,ज्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय निर्माण होऊन मन अस्थिर होईल आणि कामामध्ये निष्क्रियता येईल, दुस-या चे काम पाहून,त्याची होत असलेली प्रगती पाहून त्याबद्दल मनामध्ये द्वेषाला जागा देऊ नका.आपण आपल्या कामात सदैव कार्यरत रहा त्यातच तुमच्या जीवनात खरे यशस्वी होऊन तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========               *लाचार - Helpless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे* एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णुला भेटायला गेला. वैकुंठाच्या दारा जवळ ७ कबुतरं होते. त्यातील एका कबुतरा वर यमाची दृष्टी गेली. ते कबुतर खुप घाबरलं. आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सुचेना. इकडे गरुडाने वैकुंठाचं दार उघडुन यमाला आत घेतलं. यम विष्णुला भेटायला गेला. ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलवुन गरुडाला विनंती केली. ” मला इथुन घेऊन जा साता समुद्रापार , कारण यमाची माझ्यावर दृष्टी पडली आहे व तो बाहेर आला वैकुंठातुन कि मला घेऊन जाईल. मला घेऊन चल .” गरुडाला हि त्याची दया आली. गरुडाने मग कबुतराला सातासमुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं जिथे सुर्याची किरणे पण पोचत नव्हती. ती गुहा दलदलीनी भरलेली होती. इकडे यम विष्णुशी बोलुन वैकुंठाच्या दारात आले. त्यानी बघितलं जाताना तर सात कबुतरं होते , आता सहाच कशी काय ? एक कबुतर कुठे गेलं. मग यमानी गरुडाला विचारलं. गरुड म्हणाला , ” तुमची दृष्टी त्या कबुतरावर पडली. ते कबुतर म्हणालं मला सातासमुद्रापार सोड , मी सोडुन आलो. ” ज्या गुहेत गरुडानी कबुतराला सोडलं तिथे जागा कोंदटलेली असल्यामुळे व प्राणवायु नसल्यामुळे त्याचे प्राण गेले. यम गरुडाला म्हणाला , ” मी विष्णुदेवाला हेच विचारायला आलो होतो कि हे कबुतर तर इथे आहे व त्याचा प्राण तर सातासमुद्रापार जाणार असं विधीलिखित आहे . कसं करायचं ? ” पण बघा त्याचा प्राण तिथेच जाणार होता म्हणुन त्याला तशी बुध्दी झाली सातासमुद्रापार जायची व त्याचा जीव घुसमटुन घुसमटुन गेला. *तात्पर्य : तुमच्या नशिबात नियतीने जे लिहिले तसेच होणार. आपण त्यात कुठला हि हस्तक्षेप करु शकत नाही. पण जर आपण इष्टदैवतेची सेवा व भक्ती केली तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे.* *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment