कविता संकलित

. . .  जगण्यातच शान आहे . . .

जगून घे गड्या तू
जगण्यातच शान आहे
नसल्यावर तू जगी या
कोण तुला देणार मान आहे

फाटले जरी हे केवळ
जीवनाचे एकच पान आहे
अवघे आयुष्य थाटले समोर
जगण्यातच शान आहे

बघ त्या वठलेल्या वृक्षाला
पालवी पुन्हा फुटली आहे
तु तर मनुष्य का तुझी
आशा खुटली आहे

पाय रोव तू खंबीरतेने
ही केवळ लाट आहे
काळोख्या रात्रीनंतर उजाडणार
एक तेजोमय पहाट आहे

अभिनंदन ,कौतुक हा एक
केवळ आभास आहे
आई वडीलांच्या जीवनाचा
तू तर खरा श्वास आहे

शुन्यातून विश्व निर्मिले ज्यांनी
ती गाथा थोर आहे
सुरूवात ही जीवनाची
हीच का तुझी हार आहे

घे नव्याने पुन्हा भरारी आकाशी
माझी तुला आण आहे
जगून घे वेड्या जरा
जगण्यातच खरी शान आहे

✍ संकलित

No comments:

Post a Comment