पाऊस कविता संकलित

पाऊस

पाऊस तसा पहिला
अवचितच येतो
हवाहवशा मृदगंधाने
आसमंत दरवळतो

पाऊस तुझा माझा
जेव्हा असा बरसतो
कगदाच्या होडिवर
अजून जीव लोभतो

पाऊस जेव्हा केव्हा
मुसळधार कोसळतो
तुझ्या आठवणींचा घन
माझ्या मनी बरसतो

पाऊस गर्द रात्री
मनसोक्त बरसतो
विजांचा कडकडाट
माझ्याच मनात चालतो

मनामनाचा कोपरा
पाऊस जातो उजळून
इंद्रधनुचे रंग
आभाळभर उधळून

पाऊस जातो जिवाला
उगाच हुरहूर लावून
आभाळाच रितेपण
रहातं मन व्यापून

     संकलित 

No comments:

Post a Comment