✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जुलै 2023💠 वार - मंगळवार•••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०६ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००७:भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी**१९९९:लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.**१९९७:के.आर.नारायणन भारताचे १० वे, पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.**१९९७:इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड**१९९४:इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त**१९९२:स्पेनि,मधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८४:सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.**१९७८:जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.**१९१७:कॅनडात आयकर लागू झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९९२:सचिन जगन नांगरे -- कवी* *१९८३:संतोष ग्यानिदास गेडाम-- कथाकार, कवी* *१९६९:राजेश कुबडे उर्फ शेषराव अमृतराव कुबडे -- कवी,लेखक* *१९५८: महेन्द्र शामकांत देशपांडे -- पत्रकार, संपादक,लेखक आणि प्रकाशक* *१९५४:दिनेश केसकर-- बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे एशिया-पॅसिफिक आणि भारतातील विक्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष* *१९४९:बकुळ पंडित-- मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री**१९३४:दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक आणि ललितनिबंधकार.(मृत्यू:२७ जानेवारी, २०१६)* *१९३१:निळू फुले(निळकंठ कृष्णाजी फुले)-- मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते(मृत्यू:१३ जुलै २००९)**१९२९:सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे माजी सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते(मृत्यू:१३ आगस्ट२०१८)**१९२२:विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – सुप्रसिद्ध कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)**१९१९:सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – सुप्रसिद्ध गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)**१९१७:सदाशिव शंकर देसाई-- विख्यात साहित्यिक,पत्रकार आणि इतिहास संशोधक.(मृत्यू:३१ मे १९९६)**१८८७:नागेशशास्त्री गणेशशास्त्री नवरे-- कवी**१८७५:जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)**१८३२:करसनदास मुळजी -- भारतीय पत्रकार(मृत्यू:२८ ऑगस्ट १८७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०१५: रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई-- दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते,बिहार,सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल (जन्म:३० ऑक्टोबर १९२९)* *२०१२:बी.आर.इशारा–चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक(जन्म:७सप्टेंबर१९३४)**१९७७:कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक(जन्म:२५ एप्रिल १९००)**१८८०:गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)**_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मो: 9822695372 chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!पहिला भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2854662371327185&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत; अर्थमंत्री अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! खात्यात जमा PF वर मिळणार जबरदस्त व्याज, चालू आर्थिक वर्षासाठी 8.15% व्याजदराला मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे 21 हजार कोटी बुडाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशातील दरडोई उत्पन्नाची राज्यनिहाय यादी केंद्र सरकारने केली जारी, तेलंगणा प्रथम तर दुसऱ्या स्थानावर कर्नाटक, महाराष्ट्र चौदाव्या स्थानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी यांचं निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पोर्ट ऑफ स्पेन कसोटी रंगतदार स्थितीत, वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत, भारताकडे 289 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कारगिल विजय दिवस*कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे. श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक मृत्युमुखी पडले, १३६३ जखमी झाले.लढाई आधीच्या पहिल्या तीन आठवड्याच्या अभ्यासाकरिता भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. प्रत्यक्ष युद्धात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकाॅप्टर यांचा सहभाग होता. एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली.कॅप्टन बत्राने ७ जुलै १९९९ रोजी कारगीलजवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टाॅप म्हणतात.कारगील युद्ध स्मारक हे भारतीय सैन्यदलाने द्रास शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर टायगर हिलच्या दिशेने उभारलेले स्मारक आहे. हे तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी आहे. हे स्मारक श्रीनगर-लेह मार्गावर (`राष्ट्रीय महामार्ग क्र. १ डी'वर)आहे. स्मारकातील भिंतीवर कारगील युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची आणि सैन्याधिकाऱ्यांची नावे कोरली आहेत. दरवर्षी या स्मारकात २६ जुलै हा दिवस कारगील हुतात्म्यांचा स्मरणदिवस म्हणून पाळला जातो.कारगीलला पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. जेथे पाकिस्तानने बॉंंब फोडले होते तेथे आज एक कारगिल हाईट्स नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलात एक जुना बंकर ग्राहकांच्या विलोकनार्थ शाबूत ठेवला आहे. (असे बंकर पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीनंतर लडाखच्या प्रत्येक घरात बनले होते.) लोकांनी मागणी केल्यावरून 'लडाख हिल डेव्हलपमेन्ट काऊन्सिल' अस्तित्वात आले. त्यामुळे आता कारगीलमध्ये ४०हून अधिक हाॅटेले झाली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या घरांतही राहण्याची सोय होते. कारगीलला सन २०१६ या वर्षात ४२ हजार, २०१७मध्ये ६७ हजार तर २०१८ या एकाच वर्षात एक लाख सात हजार पर्यटकांनी भेट दिली.२६ जुलै २०१९ या दिवशी कारगील युद्धाला वीस वर्षे झाली. त्याच्या एक दिवस आधी जम्मू ॲन्ड कश्मिर रायफल्सच्या १३व्या बटालियनची एक बाईक रॅली उत्तराखंडातील दर्रापासून सुमारे १८५० किलोमीटरचा प्रवास करून २१ दिवसांनी लडाखमधील द्रासला पोचली. शेफ संजीव कपूर यांनी सैनिकांसाठी खास तिरंगी खीर बनवली होती. सर्व सैनिकांनी व अधिकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र भोजन केले. जवानांच्या हौतात्म्यावर भारतीय सेनेने ८.२४ मिनिटांची एक शाॅर्ट फिल्म जारी केली. त्याअगोदर कारगिल ट्रिबूट गीत गायले गेले व वाजवण्यात आले. गीताचे बोल होते, 'वीर जवानों, तुम्हें न भूलेगा तुम्हारा हिंदुस्तान!'*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्याच्या किरणांनी कमळे फुलतात, त्याप्रमाणे आईच्या मायेनं जीवन कळ्या फुलतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'भारताची रॉकेट वूमन'* म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' हे प्रसिद्ध गाणे कोणत्या चित्रपटातील आहे ?३) विम्बल्डन चॅम्पियनशिप - २०२३ पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला ?४) UPI चा full form काय आहे ?५) 'जागतिक इमोजी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) रितू करिधाल, ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ २) सिकंदर - ए - आजम ३) कार्लोस अल्काराज ४) Unified Payments Interface ५) १७ जुलै*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साईनाथ कामीनवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 रामकुमार चिलकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्यामकुमार चिलकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीधर चिंचोलकर, मुख्याध्यापक, केशव प्रा. शाळा धर्माबाद👤 लक्ष्मण सुरकार, सहशिक्षक, भोकर👤 प्रा. संगीता भालसिंग, साहित्यिक, अहमदनगर👤 संगीता चाके-मोहनकर👤 ऋचाली चंदेल बयास, संगमनेर👤 गंगाधर मंगरूळे👤 गोविंद मानेमोड, तळणी, बिलोली👤 गजानन महाजन, बिलोली👤 संतोष श्रीखंडी👤 नरेंद्र राठोड, सुरत, गुजरात👤 साईनाथ भोरे, कुंडलवाडी👤 ज्ञानेश्वर पाटील, अंमळनेर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस बोलता, चालता, समजदार,सुशिक्षित प्राणी असताना सुध्दा एक,एक सेंकदाला कितीतरी पाप करत असते.तरीही त्याची थोडीही त्याला कल्पना नसते तरीपण स्वत:ला मोठा समजत असते हे, किती विचित्र आहे...? त्यापेक्षा मुके प्राणी एकवेळचे बरे म्हणायला काहीच हरकत नाही. निदान माणसानी एवढेही पाप करू नये की, माणसाचे जीवनच व्यर्थ होऊन जाईल...आपण माणूस प्राणी आहोत आपला जन्म कशासाठी झालेला आहे याची थोडीतरी जाणीव ठेवावी.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लाख मोलाचा देह*एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलवायला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनात आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण बदल्यात तु मला तुझे डोळे दे.' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस का?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. शेवटी व्यापारी म्हणाला, 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस? कष्ट कर पैसे मिळव'.तात्पर्य :- आपल्या शरीराची किंमत आपण स्वतः जाणून घ्यावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment