✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!दहावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7284168791599473/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *४ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.**१९९७:’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.**१९९५:टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान**१९४७:ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.**१९४६:सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९३६:’अमरज्योती’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.**१८२६;अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.**१७७६:अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:गोविंद दत्तराम कवळे -- कवी**१९८०:संजय माणिक राठोड-- कवी,लेखक**१९७३:वृषाली सानप-काळे- मराठी आणि हिंदी भाषेतून लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७०:शिल्पा देवळेकर -- कवयित्री, लेखिका* *१९६६:डॉ.प्रभाकर शेळके-- कवी,कथाकार* *१९६५:रमेश पांडुरंग तांबे-- लेखक,कवी* *१९६०:देवेंद्र भुजबळ-- लेखक,संपादक तथा माजी माहिती संचालक* *१९५६:डॉ.संजीवनी मुळे- लेखिका,कवयित्री**१९५४: डॉ सुनंदा देशपांडे-- लेखिका* *१९४७:गणेश आप्पासाहेब धांडगे -- कादंबरीकार कथाकार* *१९४७:डॉ.आनंद पाटील -- जेष्ठ साहित्यिक* *१९३३:डॉ.अरविंद वामन कुलकर्णी-- प्रख्यात समीक्षक,लेखक,कवी(मृत्यू:२९ ऑक्टोबर २००३)**१९२६:विनायक आदिनाथ तथा ’वि.आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक(मृत्यू: १७ एप्रिल २०११)**१९१४:निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ –भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)**१९१२:पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९९४)**१८९८:गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (मृत्यू:१५ जानेवारी १९९८)**१८९०: नारायण केशव बेहेरे -- कवी, कादंबरीकार काव्य समीक्षक (मृत्यू:१९ जानेवारी १९५८)**१८९०:क्षमादेवी राघवेंद्र राव--संस्कृत भाषातज्ज्ञ(मृत्यू,:२४ एप्रिल:१९५४)**१८७२:काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)**१७९०:भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (मृत्यू: १ डिमेंबर १८६६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ मे १९०९)**१९८२:भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार (जन्म: १९१८)**१९८०:रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.(जन्म:२४ एप्रिल १८९६)**१९६३:पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (जन्म:२ ऑगस्ट १८७६)**१९३४:मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७)**१९०२:स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.(जन्म: १२ जानेवारी १८६३)**१८३१:जेम्स मोन्‍रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८)**१८२६:थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (जन्म: १३ एप्रिल १७४३)**१८२६:जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० आक्टोबर १७३५)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान; सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कचरा वर्गीकरण न झाल्यास झोन अधिकाऱ्यांचे पगार थांबवले जाणार; संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा; आज दुपारी कॅबिनेटची बैठक, प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेत परत; आरबीआयचा खुलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवघ्या 999 रुपयांत जिओने आणला 4G फोन; महिन्याचा रिचार्ज फक्त 123 रुपयांत, 07 जुलै रोजी होणार चाचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका; जयंत पाटील यांचे पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अशेस  मालिकेतील लॉर्ड्स कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 43 धावांनी विजय मिळवला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतकार पी. सावळाराम*निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३ - २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते.मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले.भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्याऱ्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते.पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती.पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो.२०१० साली हा पुरस्कार संगीतकार यशवंत देव, २०१२ साली तो गायक सुरेश वाडकर तर २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना मिळाला होता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा, तो स्वर्गाचे फुल बनवतो.➖रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894Q••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'बटाट्याची चाळ' हे विनोदी पुस्तक कुणी लिहिले ?२) LCD चे Full Form काय आहे ?३) अंजिठा येथे एकूण किती लेण्या आहेत ?४) जगातील सर्वात मोठा असणारा अर्धा पृथ्वीगोल अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी आहे ?५) मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी कोणते ?*उत्तरे :-* १) पु. ल. देशपांडे २) Liquid Crystal Display ३) २९ लेण्या ४) यारमथ ५) गिधाडे, कोल्हे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गोविंद कवळे, साहित्यिक, उमरी👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 बालाजी मंडलेकर, देगलूर👤 गणेश मंडाळे👤 प्रभाकर शेळके, साहित्यिक👤 प्रदीप यादव👤 श्याम उपरे👤 अविनाश खोकले👤 उदय स्वामी👤 परमेश्वर मेहेत्रे👤 बंडू अंबटकर👤 कमलाकर जमदाडे👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक👤 श्रीपाद वसंत जोशी👤 राजकुमार बिरादार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, आपल्याला करायचं असते एक अन् होऊन जातं दुसरचं अशा वेळी निराश होऊ नये व खचून जाऊ नये. चांगले होण्यासाठी थोडा उशीर सुद्धा लागू शकतो. एवढेच नाही तर त्यावेळी काही अडी,अडचणी,प्रसंग येत असतात त्यांना पार करण्यासाठी आपल्यात हिंमत असायला पाहिजे सोबत प्रयत्न करणे आवश्यक आहे शेवटी सर्वच चांगले होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वेळेचे महत्व*एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.तात्पर्य - जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment