✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!चौदावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7295910263758659/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••२०११ - भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली*जन्मदिवस*१९१४ - ज्योती बसू, बंगाली राजकारणी.१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.१९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.*मृत्यू*२००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *समृद्धी महामार्गावरील बुलढाणा बस अपघातातील बसचालक मद्यधुंद अवस्थेत, फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक माहिती समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल गांधींना कोर्टाचा दणका, गुजरात हायकोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ? राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *HDFC चे कर्ज महागले; ग्राहकांवर EMI चा भार वाढणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यांआधी यशस्वी जयस्वालने त्याच्या दमदार कामगिरीने वेधलं लक्ष.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सौरव गांगुली*सौरव गांगुली डावखुरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. भारताकडून १००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे. त्याने भारतीय खेळाडूंपैकी पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या आहेत.  गांगुली भारताकडून ३००पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे. याप्रकारच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा त्याने काढल्या आहेत. गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,०००धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत विजय मिळवला.  याशिवाय गांगुली २००३ च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय संघनायक होता. क्रिकेट विश्वात दादा या नावाने प्रसिद्ध होते. काही काळ त्यांनी BCCI चे अध्यक्षपद देखील भूषविले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान आणि कर्म जीवनाचे पंख आहेत. यामुळे सुखरूपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो.➖जैन विचारदर्शन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) *'मुख्य निवडकर्ता '* म्हणून कोणाची निवड केली आहे ?२) महात्मा फुले यांनी कोणत्या ब्राम्हण विधवेला आत्महत्येपासून परावृत्त केले ?३) जगातील सर्वात मोठे उद्योग क्षेत्र कोणते ?४) महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणाला म्हटले जाते ?५) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) अजित आगरकर, माजी गोलंदाज २) काशीबाई ३) कच्चे तेल ४) कर्मवीर भाऊराव पाटील ५) देवेंद्र फडणवीस व अजित पवार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अशोक पवार👤 सुरेश तायडे👤 अनिल भेदरे👤 अहमद काझी👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी👤 मल्लेश भूमन्ना बियानवाड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं सर्वच चांगलं आहे आणि इतरांचं सर्वच वाईट असते या प्रकारची जर...आपली विचारसरणी असेल तर ते, व्यर्थ आहे कारण, आपल्या परीने जर..आपले चांगलेच असेल तर...इतरांचेही त्यांच्या परीने थोडं तरी चांगले असू शकते प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असू शकतात. म्हणून उगाचच नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दोघां भावातील खटला*एकदा एक गावात, दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे. यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.तात्पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवले पाहिजे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment