✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक 'पेपर बॅग' (Paper Bag Day* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'टिळक पुरस्कार’ जाहीर**१९९९:’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.**१९९८:१६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.**१९९५:अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर**१९८५:पी.एन.भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८२:राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना**१९७९:किरिबातीला *(इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२:लंडनमधील मार्क्वी क्लबमधे ’द रोलिंग स्टोन्स’ चा पहिला कार्यक्रम झाला.**१९६१:मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.**१९३५:’प्रभात’चा ’चन्द्रसेना’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या ’मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.**१९२०:पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले. पण याआधीच ६ वर्षे तो वाहतुकीस खुला झाला होता.**१७९९:रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:जयश्री संजय सातोकर -- कवयित्री, लेखिका* *१९६७: मीना घोडके -- लेखिका**१९६५:संजय मांजरेकर – क्रिकेटपटू**१९५९:प्रा.डॉ.शेषराव नत्थुजी जुडे-- लेखक**१९५२:शंकर किसन तांबे-- लेखक* *१९४७:सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी-- मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री**१९४५:डॉ.अंजली दामोदरराव टाकळीकर -- कवयित्री* *१९२२:मनोहर कल्लावार-- लेखक* *१९२०:यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १४ जुलै २००८)**१९२०:वसंत गोविंद देशमुख-- लेखक (मृत्यू:१ एप्रिल १९८४)**१९१३:मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (मृत्यू: १४ जून २०१०)**१९१०: गोविंद रामचंद्र दोडके-- लघु निबंधकार (मृत्यू:१३ जानेवारी १९६३)**१९०९:बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)**१८९६:देविदास लक्ष्मण महाजन-- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक(मृत्यू:३ एप्रिल १९६७)**१८८९:केशव गणेश आठल्ये(केशवबुवा)-- लेखक व प्रवचनकार**१८६४:वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)**१८६४:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)**१८५४:जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १४ मार्च १९३२)**१८१७:हेन्‍री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (मृत्यू: ६ मे १८६२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)**२०१२:दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)**१९९९:राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म:२०जुलै १९२९)**१९९४: वसंत साठे --हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार** *१६६०:बाजी प्रभू देशपांडे (जन्म: १६१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!सतरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7305295232820162/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *न्यूयॉर्कमधील भारतीय वंशाच्या संशोधकांनी बनवलं अनोखं उपकरण; पाच मिनिटांच्या आत ओळखता येणार विषाणू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारत जोडो नंतर काँग्रेसची बस यात्रा, डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातून सुरूवात, लोकसभेच्या जागा जिंकण्याचं टार्गेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठी बातमी! विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का ; ईडी संचालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे बेकायदेशीर, 31 जुलैपर्यंत पद सोडण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवण्यास विरोध करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी.. शाह फैसल आणि शेहला रशीद यांच्या याचिका मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मेड इन इंडिया आयफोनचा मार्ग मोकळा.. आता टाटा भारतात बनवणार iPhone! ठरणार भारतातील पहिले आयफोन उत्पादक*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या लेकींची कमाल.... बांगलादेशचा 87 धावांत खुर्दा, दीप्ती-शेफालीचा भेदक मारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) केनियातील मसाई मारा येथील आदिवासींनी सचिन तेंडूलकरला कोणत्या पुरस्काराने सन्मान केला ?२) पातळ प्लास्टिक पिशवीवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ?३) भारताबाहेर प्रदेशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था ( आयआयटी ) कोणत्या देशात स्थापन केली जाणार आहे ?४) महाराष्ट्र राज्याचा राज्यखेळ कोणता ?५) गोंडवाना विद्यापीठ कोठे आहे ?*उत्तरे :-* १) गार्ड ऑफ ऑनर २) न्युझीलंड ३) झांझिबार - टांझानिया ४) कबड्डी ५) गडचिरोली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 प्रवीण दाभाडे पाटील, सहशिक्षक, कन्नड👤 शिल्पा जोशी, मुंबई👤 अविनाश पांडे👤 हरिहर धुतमल, पत्रकार, नांदेड 👤 साईनाथ पाटील गादगे नागणीकर👤 माधव उमरे👤 दादाराव जाधव👤 अभिजित राजपूत👤 नागेश पडकूटलावार👤 नंदकुमार कौठेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो ? ॥२३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी कितीही दिले तरी ते जन्मभर पुरत नाही. व कोणी काहीच दिले नाही तरी कोणाचे, कोणापासून अडत नाही. पण, ज्यांनी वेळ, प्रसंग,अडचण जाणून आपुलकीने मदत केली असते ती,मदत जगापेक्षा वेगळी असते. म्हणून वेळ, प्रसंगी आपल्याला कोणी आपुलकीने मदत केली असेल तर त्यांना कधीही विसरु नये.व ज्यांनी त्या, प्रसंगी पाठ फिरवली असेल...त्यांचाही आदर करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर, कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पिल्लू पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ""आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या. दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही. हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ""वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव."" तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment