✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!तेरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7291567597526259/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *७ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.**१९८५:विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.**१९७८:सॉलोमन बेटांना (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४१:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.**१९१०:इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.**१८९८:हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. मात्र, त्यांना अमेरिकेचे राज्य हा दर्जा मिळण्यासाठी पुढे ६० वर्षे वाट पाहावी लागली.**१८९६:मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.**१८५४:कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली तरी भारतातील पहिली कापडगिरणी मात्र भडोच येथे तर महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी नागपूरला सुरू झाली होती.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:संतोष इमलीबाई पिचा पावरा-- कवी, लेखक* *१९८७: नवनाथ सोपान गोरे -- लेखक* *१९८१: महेंद्रसिंह धोनी – प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी माजी कर्णधार* *१९७७:हनुमंत चांदगुडे -- प्रसिद्ध कवी, गीतकार* *१९७३:कैलाश खेर-- प्रसिद्ध भारतीय पॉप-रॉक गायक**१९७०:छाया बेले -- कवयित्री,लेखिका* *१९६९: ज्योती धर्माधिकारी-- कवयित्री, लेखिका**१९६९: नरेंद्र सा.गुळघाणे-- कवी* *१९६५: प्रज्ञा दत्तात्रय घोडके-- कवयित्री, लेखिका* *१९६२:पद्मजा फेणे-जोगळेकर-- सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका**१९५५:डॉ.दत्तात्रेय तापकीर-- प्रसिद्ध लेखक**१९५०:पांडुरंग गायकवाड -- जेष्ठ लेखक* *१९४८:पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)**१९४८:सुभदा साने-- लेखिका, बालसाहित्यिक* *१९४७:राजे ग्यानेंद्र – नेपाळ नरेश**१९३३:श्यामकांत विष्णू कुलकर्णी--कवी, कादंबरीकार, कथाकार, लेखक (मृत्यू:२६ जानेवारी २०२२)* *१९३२:प.झो.उपाख्य अविनाश वरोकर- कवी लेखक* *१९२३:प्रा.लक्ष्मण गणेश जोग – कथाकार, कादंबरीकार, समीक्षक(मृत्यू:२५ जून १९८०)* *१९१४:अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार (मृत्यू: ३१ मे २००३)**१९०९: विनायक शामराव काळे-- कवी* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:दिलिप कुमार- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता (जन्म:११ डिसेंबर १९२२)**२०२०:रवी दाते-- ज्येष्ठ संगीतकार, गझलगायक आणि तबलावादक(जन्म:३ डिसेंबर १९३९)* *२०१३:सुधाकर बोकाडे-- भारतीय चित्रपट निर्माता(जन्म:१९५६)**१९३०:सर आर्थर कॉनन डॉइल – स्कॉटिश डॉक्टर व ’शेरलॉक होम्स’ या गुप्तहेरकथांचे लेखक (जन्म: २२ मे १८५९)**१३०७:एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म:१७ जून १२३९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *MPSC तर्फे घेण्यात आलेल्या PSI व STI परीक्षेचा निकाल जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीएचडी असल्यास नेट-सेट ची गरज नाही, यूजीसीचे स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चांद्रयान - 3 चे 14 जुलै रोजी होणार प्रक्षेपण, इस्रोची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाज्यांचे दर गगनाला, सामान्यांच्या बजेटला मोठी कात्री.. समस्यांमुळे जनता कोमात, राजकारण मात्र जोमात.. पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या, शेतकरी मेटाकुटीला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नेदरलँड्सच्या संघाने पात्रता फेरीत स्कॉटलंडला चार विकेट्स राखून पराभूत केले आणि त्यांनी विश्वचषकात दिमाखात प्रवेश केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी*महेंद्र सिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी राजपूत परिवारा मध्ये रांची येथे झाला. 'माही' व 'एम.एस.' या नावाने तो ओळखला जातो. त्या सोबतच तो 'कॅप्टन कूल' या नावाने देखील ओळखल्या जातो. त्याने २००७  पासून २०१६ पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये आणि २००८ पासून २०१४ पर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले आहे. धोनी यांच्या नेतृत्वात २००७ च्या आयसीसी विश्वचषक टी -२०, २०१० आणि २०१६ आशिया कप, २०११ आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनी उजव्या हाताने फलंदाजी व विकेटकीपिंग करतो. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. धोनीने १०,०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये तो प्रभावी "फिनिशर" मानला जातो.*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर मुख हे व्यक्तीचे शिफारस पत्र आहे, तर सुंदर हृदय हे विश्वासपत्र आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'परमवीर चक्र - द टायगर्स ऑफ इंडियन वॉर्स'* या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत परिषद केव्हा घेतली ?३) फुटबॉल ची संस्कृती तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कोणत्या राज्याने *'फुटबॉल फॉर ऑल'* हा उपक्रम सुरू केला आहे ?४) विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये लावण्यात येत असलेल्या ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला ?५) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला संबोधले जाते ?*उत्तरे :-* १) शिवाजीराव बडे, अहमदनगर २) १ जून १९३६ ३) ओडिसा ४) डेव्हिड वॉरेन, ऑस्ट्रेलिया ५) महात्मा फुले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 गजानन काठेवाडे, पीएसआय 👤 ऋषिकेश देशमुख, साहित्यिक, देगलूर👤 साईनाथ हामंद, करखेली👤 लक्ष्मण कांबळे👤 महेश जोशी, पत्रकार, धर्माबाद👤 दत्ताहरी पाटील कदम बेलगुजरीकर👤 जगन्नाथ पुलकंठवार, धर्माबाद👤 सय्यद युनूस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक👤 शंकर रामलू बलीकोंडावार👤 बाशेट्टी नागेश👤 बाळासाहेब पेंडलोड👤 श्रीकांत माने, धर्माबाद👤 प्रकाश गोरठकर👤 विजय पाटील रातोळीकर👤 ज्वालासिंह घायाळे👤 दिगंबर पांचाळ👤 हरिओम रामोड👤 व्यंकट ताटेवाड👤 पिराजी कटकमवार👤 पोषट्टी जाजेवार👤 संदीप डोंगरे👤 हणमंत जाधव👤 प्रज्ञा घोडके👤 रमेश चांडक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर आलेली चांगली, वाईट परिस्थिती किंवा नकळत आलेला एखादा भयानक प्रसंग जसा येतो तसाच एक, ना एक दिवस निघूनही जात असतो.पण, त्यावेळी ती,परिस्थिती बघून कोण आपुलकीने आपल्याला साथ देतो व कोण पाठ फिरवतो खरी माणसाची ओळख त्याच वेळी होत असते. म्हणून आपुलकीने साथ देणाऱ्याला कधीच विसरू नये व दिखावूपणाची आपुलकी दाखवून गोड बोलणाऱ्यावर मुळात विश्वास करू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लांडगा आला रे आला*एका गावात एक धनगर होता. त्याला दीपक नावाचा मुलगा होता. दीपक रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे. त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत. एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला.' लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा'. तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला, 'कशी गंमत केली.' शेतकरी संतापले. पण काय करणार, तसेच निघून गेले.दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसर्‍या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्‍यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा दीपक कसे फसवले म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले. तिसर्‍या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला. दीपक जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. दीपक आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता. तात्पर्य : थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment