✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_'जागर श्यामच्या कथांचा'_**_सप्रेम नमस्कार,_*_शिक्षणाबरोबरच सुसंस्कार व मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेच्या वतीने_*_पूज्य साने गुरुजींच्या 'श्यामचीआई'_* _पुस्तकातील ४२ कथांचा समावेश असलेल्या ' जागर श्यामच्या कथांचा' हा उपक्रम सोमवार, १७ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.__दररोज एक याप्रमाणे ऑडिओ स्वरूपातील कथा व्हाट्सअप ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल.__उपक्रमामध्ये सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.____________________*_सोमवार, १७ जुलै २०२३_*___________________*_सावित्रीचे व्रत_*___________________https://drive.google.com/file/d/1zwGOKGITCyWah7P0rStBTFogYXSmqQma/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आंतरराष्ट्रीय न्याय दिवस* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००४:तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.**२०००:अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर**१९९४:विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.**१९९३:तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'तेलगू थल्ली' हा सर्वोच्‍च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान**१९७६:कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९५५:वॉल्ट डिस्‍ने यांनी अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्‍नेलँड’ सुरू केले.**१९४७:मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्‍या ’रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ’काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.**१९१७:किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ’विंडसर’ हे आडनाव लावतील.**१८४१:अतिशय गाजलेल्या ’पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१८१९:’अ‍ॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.**१८०२:मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७०:प्रा.डाॅ.अश्विनीकुमार पंजाबराव धांडे-- वैज्ञानिक विषयांवर मराठीतून लिहिणारे लेखक**१९६४:किरण जुनेजा-- भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री**१९६२:गजानन एकनाथ उल्हामाले -- कादंबरी व नाट्यलेखन**१९६४:प्रमोदकुमार अणेराव-- प्रसिद्ध कवी,कथाकार व चित्रकार**१९६०:प्रमोद प्रभाकर जोगळेकर--संपादक, लेखक**१९५७:डॉ.मिर्झा रफी अहमद बेग--प्रसिद्ध वऱ्हाडी कवी* *१९५६: देविदास मुरलीधरराव कुलकर्णी -- कवी,लेखक,संपादक* *१९५४:अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर**१९४६:अविनाश फणसेकर -- नाटककार, नाट्य दिग्दर्शक, संपादक (मृत्यू:८ आगस्ट २०११)**१९४४:रविंद्र बेर्डे-- मराठी चरित्र अभिनेते* *१९४२:अप्पासाहेब गोपाळ पाटील -- कादंबरीकार* *१९३६:मृणालिनी परशुराम जोगळेकर-- कथाकार,चरित्रकार(मृत्यू:३१ मार्च २००७)**१९३३: दिनकरराव देशपांडे-- बालसाहित्यिक,लेखक (मृत्यू:१८ मार्च २०११)* *१९३०:सचिन भौमिक-- भारतीय हिंदी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक(मृत्यू:१२ एप्रिल २०११)**१९३०:बाबुराव बागूल – प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:२६ मार्च २००८)**१९१९:स्नेहल भाटकर (वासुदेव गंगाराम भाटकर)-- मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार (मृत्यू: २९ मे २००७)**१९१७: बिजोन भट्टाचार्य-भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)**१८८९:अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (मृत्यू: ११ मार्च १९७०)**१८७०: गणेश बलवंत मोडक-- लेखक (मृत्यू:१८ फेब्रुवारी ९५३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: सी.शेषाद्री- पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक(जन्म: २ फेब्रुवारी १९३२)**२०१२:मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (जन्म: २४ जून १९२८)**१९९२:शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’ (जन्म: १४ एप्रिल १९१४)**१९९२:काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०] (जन्म: २२ एप्रिल १९१६)**१७९०:अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!दुसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7316755375007481/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *युरोपात हजारो भारतीय प्रवासी अडकले, एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आजपासून पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या सुनावणीसाठी तारीख निश्चित, तब्बल दोन महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टात 18 जुलैला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती 23 कोटी, कर्नाटकात 64 कोटी; ADR च्या अहवालातून स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुष्काळाचे सावट ! नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ 28.63 टक्के पाणीसाठा उपलब्ध ; परिस्थिती गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर 141 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाबुराव बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाले. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कॅंपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कॅंपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली.१९५७ मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. २६ मार्च २००८ रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते, तेच खरे शिक्षण .➖ डॉ. जाॕन.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला *'दादा* असे संबोधले जाते ?२) आधुनिक भारतातील पहिले उल्का खगोलशास्त्रज्ञ कोणाला मानले जाते ?३) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?४) कोणता प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो ?५) कोणत्या नदीच्या पुरामुळे दिल्ली येथे महापूर आला आहे ?*उत्तरे :-* १) सौरभ गांगुली २) अश्विन शेखर ३) शट डाऊन ४) सिंह ५) यमुना नदी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मधुकर फुलारी👤 आरिफा शेख, सहशिक्षिका, पुणे👤 पुरुषोत्तम केसरे, देगलूर👤 आनंद पंगेवाड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनानाथ हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शहाणे तर सर्वजण असतात पण,खऱ्या अर्थाने तोच माणूस शहाणा असतो त्याला उचित, अनउचित, सत्य,असत्य सहजपणे ओळखता येतो. पण, कधी, कधी असं होतं की, जेव्हा,नकारात्मक विचार मनात प्रवेश करतात तेव्हा सर्व कळून सुध्दा वळत नाही असेही शहाणे कोणत्या कामाचे...? म्हणून आपण असे शहाणे बणावे जेथे ह्या साऱ्या गोष्टींना ओळखता येईल. आणि स्वतःसाठी तसेच इतरांनाही जास्त नाही तर थोडा तरी त्यातून फायदा होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संधीचा फायदा*एकदा, एका मंदिराच्या पुजार्‍याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजार्‍याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्‍याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्‍याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजार्‍याकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार करतो, की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजार्‍याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment