✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!अकरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7286872121329140/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *५ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००९:अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.**१९९७:स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्‍नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.**१९९६:संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर**१९७७:पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात**१९७५:विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.**१९७५:’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९७५:’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्‍चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.**१९६२:अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:आंध्रप्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९५०:इस्रायेलच्या क्‍वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.**१९१३किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली.**१८८४:जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.**१८३०:फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.**१८११:व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:प्रा.डॉ.आनंद अहिरे -- कवी लेखक* *१९८५:राहुल गोविंद निकम-- कवी लेखक**१९८५:अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९८०: डॉ. चत्रभूज कदम-- लेखक संपादक* *१९७९: आनंद वासुदेव वाडे-- कवी* *१९७८:मारोती माधव काळबांडे -- कवी, लेखक* *१९७८:प्रा.डॉ.कैलास अंभुरे -- प्रसिद्ध लेखक* *१९७७: नवनाथ विष्णू गडेकर -- कवी* *१९७६:मंदा धनराज सुगिरे-- लेखिका, कवयित्री* *१९७३:डॉ स्मिता प्रमोद पाटील -- कवयित्री, लेखिका**१९७३:गीता कपूर-- हिंदी चित्रपटांची (बॉलिवूड) कोरियोग्राफर**१९६६:प्रा.डॉ.बाबाराव मारोती ठावरी -- लेखक* *१९६३:लक्ष्मण मलगिलवार- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६२:डॉ.साहेब रामराव खंदारे -- कवी, समीक्षक,संपादक* *१९५८:अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९५७:अशोक हांडे-- मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार**१९५७:पांडुरंग वसंत कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५४:डॉ.कैलास शंकरराव कमोद-- लेखक, नाशिकचे अभ्यासक* *१९५४:जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४: नारायण गजीराम थोरात -- कवी**१९५२:रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २०००)**१९४९:पांडुरंग मोरे -- कथाकार* *१९४६:राम विलास पासवान – माजी केंद्रीय मंत्री,आणि लोक जनशक्ती पक्षाचे माजीअध्यक्ष(मृत्यू: ८ ऑक्टोबर, २०२०)**१९४३:बाळकृष्ण गणपतराव कवठेकर-- जेष्ठ साहित्यिक व समीक्षक**१९३३:सुरेंद्र आत्माराम गावस्कर-- सूचिकार, संपादक (मृत्यू:१३ जानेवारी १९७९)**१९२५:नवल किशोर शर्मा – माजी केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल(मृत्यू:८ आक्टोबर २०१२)**१९२०:आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)**१९१६:के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)**१९१२:दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे---पत्रकार, कथाकार, विनोदकार, अनुवादक(मृत्यू:६ ऑगस्ट १९८३)**१८८२:हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:तुळशी परब-- कवी (जन्म:३० सप्टेंबर १९४१)**२००५:बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)**१९९६:चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – प्रसिद्ध रहस्यकथाकार(जन्म:९ जून १९०६)* *१८२६:सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री शिंदे यांच्या आरोग्य वारी संकल्पनेत 12 लाख वारकऱ्यांची झाली आरोग्य तपासणी, आरोग्य विभागाने दिली आकडेवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *म्हाडाच्या 4082 सदनिकांसाठी आतापर्यंत एक लाख ऑनलाईन अर्ज; 10 जुलै अंतिम मुदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समान नागरी कायद्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, पण मसुदा तयार झाल्याशिवाय निर्णय नाही, महाराष्ट्र दौराही करणार, विदर्भातून सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भाजपकडून महत्त्वाचे निर्णय; चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू*पी. व्ही. सिंधू ( पुसारला वेंकट सिंधू ) या भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. सिंधूने 2016 च्या ब्राझीलमधील रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तसेच, ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी सिंधू ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. ती सध्या भारताची राष्ट्रीय विजेती आहे. 2012 मध्ये तिने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या टॉप 20 मध्ये स्थान मिळवले. 10 ऑगस्ट 2013 रोजी, पीव्ही सिंधू जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. पीव्ही सिंधू हैदराबादमधील 'गोपीचंद बॅडमिंटन अकादमी'मध्ये प्रशिक्षण घेते आणि 'ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट' नावाच्या ना-नफा संस्थेद्वारे समर्थित आहे. तिचा जन्म 5 जुलै 1995 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत येथे झाला.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानी मनुष्य हा स्वर्ग बनवू शकतो.➖स्वामी शिवानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव काय आहे ?२) माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे ?३) धावणे शर्यतीच्या मैदानास काय म्हणतात ?४) कोणार्क येथील सूर्यमंदिराला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?५) संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नामदेव दामाशेटी रेळेकर २) अरवली ३) ट्रॅक ४) ब्लॅक पँगोडा ५) सीपीयू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 डॉ. मनोज तानुरकर, धर्माबाद 👤 नरेश शिलारवार, आर्ट लाईफ, धर्माबाद👤 सुधाकर चिलकेवार, धर्माबाद👤 गंगाधर कांबळे, धर्माबाद👤 विजय प्रकाश पाटील गाडीवान, धर्माबाद👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद👤 मोतीराम तोटलोड, धर्माबाद👤 नागनाथ भत्ते, धर्माबाद👤 गणपत बडूरकर, धर्माबाद👤 सुदर्शन जावळे पाटील👤 राजरेड्डी बोमानवाड👤 मारोती कदम👤 सुभाष कुलकर्णी👤 चक्रधर ढगे पाटील👤 किशन कावडे👤 अनिल गायकांबळे👤 संभाजी कदम👤 संतोष शेळके, साहित्यिक👤 गजानन बुद्रुक, कळमनुरी👤 गिरीश कहाळेकर👤 फारुख शेख👤 अजय चव्हाण👤 अशोक पाटील👤 रमेश अबुलकोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥ घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रास त्यालाच होतो ज्याच्यात सहन करण्याची ताकद असते.ज्याला ह्या साऱ्या गोष्टींविषयी काही वाटत नाही कारण त्याला काहीही फरक पडत नाही . म्हणून आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण, चुकीच्या वाटेवर चालून आपल्या जीवनाची दिशा कधीही बदलवू नये. व नको त्या आहारी जाऊन साथ देऊ नये. कारण त्रास आणि दु:ख भलाही कठोर असले तरी आपले मार्गदर्शक सुध्दा असू शकतात हे विसरता कामा नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वार्थी मांजर*एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.तात्पर्य :- स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment