✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.● १९९२ : खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अ‍ॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.● १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले💥 जन्म :-● १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.● १८९६: सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर● १९१४ - गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.● १९५० : एन. चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री💥 मृत्यू :-● १९६० : सुप्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष.● १९७० - शकील बदायूॅंनी, हिंदी आणि उर्दू गीतकार.● १९९९ - कमलाबाई कृष्णाजी ओगले, रुचिरा पुस्तकाच्या लेखिका.● २०१७ - प्रा. रामनाथ चव्हाण, मराठी लेखक आणि संशोधक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील CBSE, ICSE शाळांसाठी मराठी विषयांचे मूल्यांकन अ, ब, क, ड श्रेणी स्वरुपात, राज्य शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जगात लोकसंख्येत चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी, भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील जनता उकाड्यामुळं हैराण, अनेक शहरातील उन्हाचा पारा 40 च्यावर, वीजेच्या मागणीत रेकॉर्ड ब्रेक वाढ; महाराष्ट्रात 29 हजार 116 मेगावॅट विजेची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता दुपारी 12 ते सायंकाळी 5 दरम्यान, मोकळ्या जागेवर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही; खारघर उष्माघात दुर्घटनेनंतर सरकारला जाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाबळेश्वरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस,  राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, तर दुसरीकडं तापमानाचा पारा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू, राज्य मंत्रीमंडळाचे मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• कपड्याना अत्तराने सुंगधित करता येते, त्यामुळे आपल्या अंगाचा वास येत नाही असा विचार करून आपण अधुनमधून वास घेत असतो. म्हणजे आपल्या मनात कुठे तरी शंका येत राहते. पण दूसरा एक व्यक्ती असतो ज्याच्या अंगावरचे कपडे सुंगधित तर नाहीत शिवाय खुप महागडे सुध्दा नाहीत तरी लोक त्यांच्या मागे धावतात कारण त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध इतराना आकर्षित करीत असतो.*( स्वलिखित )*साहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रा. रामनाथ चव्हाण*प्रा. रामनाथ चव्हाण मराठी लेखक आहेत. दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातले संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. ते पुणे विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख होतेे. रामनाथ चव्हाण यांचा दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात संशोधनपर लिखाण करून नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. 'भटक्या-विमुक्तांची जातपंचायत' हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे. 'जाती व जमाती' हेही त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे. याचबरोबर भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.आज त्यांची पुण्यस्मरण दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समोरच्या व्यक्तीने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आयपीएल ( IPL ) खेळणारी पिता - पुत्राची पहिली जोडी कोणती ?२) हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरादरम्यान आहे ?३) विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?४) देशातील ट्रॅक्टर क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?५) यकृत हा सर्वात महत्त्वाचा अवयव शरीरात कोठे असतो ?*उत्तरे :-* १) सचिन व अर्जुन तेंडूलकर २) नागपूर ते शिर्डी ३) प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार ४) केशुब महिंद्र ५) छातीत उजव्या बरगळ्यात *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साईनाथ मुलकोड, येवती👤 कु. श्रावणी महेंद्र ढगे, नांदेड👤 माजिद सय्यद👤 विनोदकुमार मोकमोड👤 रमेश हातोडे👤 विलास इंगळे👤 दिलीप सहस्त्रबुद्धे👤 विठ्ठल कल्याणपाड👤 स्वप्नील सूर्यवंशी👤 गंगाधर गुरलोड👤 राहुल सोनकांबळे👤 प्रकाश भेरजे👤 एस. के. शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठोने शिरी वाहिला देवराणा। तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी। जिवा सोडवी राम हा अंतकाळीं ॥८४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....*             *न मुंह छुपाके जियो*             *और न सर झुकाके जियो...*             *गमोंका दौर भी आये*             *तो मुस्कुरा के जियो...**ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!*             *ये जिंदगी किसी मंजिल पे*             *रूक नही सकती.....*             *हर एक मकाम के आगे*             *कदम बढा के जियो...*.               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवीन नाते जोडताना जुन्या नात्यांना विसरु नका. असे होऊ नये की, नव्या नात्यात गुरफटून जाऊन आपल्या रक्ताच्या नात्यांना किंवा नातेसंबधांना पार विसरुन जाऊन त्यांच्याकडे सगळ्याच बाबतीत दुर्लक्ष करुन त्यांच्याबद्दलची सहानुभूतीसुद्धा मनात ठेवत नाही. मग अशावेळी नवीन नाते जपण्यात काय अर्थ आहे. नाते असे टिकवा की, त्यात  आपल्याही नात्यांना व नवीनही नातेसंबंधानांसही घेऊन चालायला शिकले पाहिजे. त्यातच तुमच्या जीवनाचे खरे कौशल्य आहे. नात्यामध्ये दुरावा न आणता संबंध अधिक दृढ कसे करता येईल याचा विचार नेहमी केला पाहिजे. कारण कुणाचेही मन न दुखवता सा-यांच्या जीवनात आनंदाचे, सुखाचे आणि समाधानाचे वातावरण नेहमीसाठी असायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सचोटी*एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,  साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे. साधू म्‍हणाला, महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.*तात्पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment