✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९५२ - पहिली लोकसभा अस्तित्वात आली.● १९७० : चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले💥 जन्म :-● १४७८ - संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त● १८९१ : यशवंत रामकृष्ण दाते, नामवंत मराठी कोशकार.● १९१६ - सिरीमाओ बंदरनायके , श्रीलंकेच्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.● १९२७ - चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.💥 मृत्यू :-● १९७५ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती● १९९८ - विजय सिप्पी, हिंदी चित्रपट निर्माते● २००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.● २०११ - वि.आ. बुवा, मराठी विनोदी साहित्यिक.● २०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड लेखक.● २०१२ - नित्यानंद महापात्रा, भारतीय पत्रकार आणि राजकारणी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्येष्ठ निरूपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं, पुरस्काराचं मानधन दिलं मुख्यमंत्री सहायता निधीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अवकाळी काही पाठ सोडेना; नाशिकसह जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा तडाखा, मराठवाड्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सह्याद्री फार्म्सकडून कर्मचाऱ्यांंसाठी खूशखबर ! 461 कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे शेअर्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महिलांना दरमहा दोन हजार, मोफत वीज; राहुल गांधी यांची कर्नाटकच्या जनतेला चार आश्वासने*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 एप्रिल रोजी होणार बीआरएस पक्षाची सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *Femina Miss India 2023 : राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली 'मिस इंडिया'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल 2023 - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राउंडवर कोलकाताचा पाच विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कथा :- परीक्षा गुरुजींची*http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_3.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूरदास हे हिंदीच्या ब्रज बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी होते. हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी ते प्रसिद्ध आहेत.सूरदास यांचा जन्म इ.स. १५४०मध्ये रुणकटा नावाच्या गावात झाला. हे गाव मथुरा-आग्रा मार्गालगत वसलेले आहे. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की सूरचा जन्म सिही नावाच्या खेड्यातल्या एका गरीब सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तो खूप विद्वान होता, त्याच्या लोकांची आजही चर्चा आहे. सूरदास यांचे वडील रामदास गायक होते. सूरदासच्या जन्माबद्दल मतभेद आहेत. सुरुवातीला सुरदास आग्राजवळील गौघाट येथे राहत होता. तेथे असताना त्यांनी श्री वल्लभाचार्य यांची भेट घेतली आणि त्यांचे शिष्य झाले. वल्लभाचार्य यांनी पुष्तीमार्गामध्ये त्यांची दीक्षा घेतली आणि कृष्णालीला पद गाण्याचे आदेश दिले. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर्धन या गावांत गेले. वल्लभाचार्यांनी त्यांना श्रीकृष्णभक्तीचा उपदेश दिला. सूरसागर या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात प्रसिद्ध झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून तानसेनाच्या मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या सांगण्यावरून सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे. या प्रसंगानंतरही अकबराने सूरसागराचा फारसी अनुवाद करवला. सूरसागरातील भ्रमरगीत हा भाग साहित्यिक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथाने हिंदी भाषेचे सौंदर्य वाढवले असे म्हटले जाते. आधुनिक काळात सूरसागराचे प्रकाशन वाराणसीच्या नागरी प्रचारिणी सभेने १९५० मध्ये केले. २०१५ मध्ये सूरसागराचे इंग्लिश भाषांतर हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले.सूरसागराशिवाय सूरदासांनी सूरसारावली, साहित्यलहरी, नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.१५८०मध्ये गोवर्धन जवळच्या परसौली गावात सूरदास यांचा मृत्यू झाला.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसानं मनात काही ठेवू नये,नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्याही एका विषारी वनस्पतीचे नाव सांगा ?२) शुद्ध पाण्याचा सामु ( PH ) किती असतो ?३) PH चा Full Form काय आहे ?४) वैदिक वाङ्मययातील कोणता मूळ ग्रंथ मानला जातो ?५) जपानचे दुसरे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) धोतरा २) सात ३) पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन ४) ऋग्वेद ५) निप्पोन*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हिंदुजा शिवाजी अन्नमवार, नांदेड👤 शिवकन्या पटवे, उपक्रमशील शिक्षिका, बिलोली👤 सुभाष टेकाळे, कुपटी, माहूर👤 मोईन आर. शेख👤 आनंद बाबासाहेब त्रिभुवन👤 म. सलमान👤 विनायक शिंदे👤 अनुजकुमार मुंडे👤 जया इगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मत्सरे नाम सांडूं नको हो। अती आदरे हा निजध्यास राहो॥ समस्तांमधे नाम हे सार आहे। दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतरांसारखाच मीसुद्धा एका छोट्या खेड्यात लहानाचा मोठा झालो. तिथं मरण येईपर्यंत राबणा-या बाया पाहिल्या. त्यात आई नावाचीही बाई होती. दिवसभर काम एके काम, हिच त्यांची दैनंदिनी. घर आवर, रोज टोपलंभर भाकरी बडव, घर-गोठा स्वच्छ कर, रांजण-घागरी भरून ठेव, गायी वासरांची देखभाल कर..आणि शेतावर जा. लेकरांना जेऊ घाल..न्हाऊ घाल..पुरूषांना ताटं लाव..मग स्वत: उशीरानं जेव. बाई अशी पुरूषप्रधान कर्फ्यूखाली सतत का करपत गेलीयं ?**माती आणि माता काही मागत नाही, पण भरभरून सारं देतात. माया, जिव्हाळा, प्रेम, आधार, सहारा आणि भाकर देणा-या माती आणि माता या श्रेष्ठ विश्वसंस्थाच आहेत, ज्या निर्मोही आहेत. विशाल आणि पवित्र आहेत. पण बाईपणाच्या झिजण्याचं मोल जगात झालं नाही. त्यावर महाकाव्य लिहून झाली असतील, पण 'माय' हा शब्दांपलिकडचा महान ग्रंथ म्हणून शिल्लकच उरणार आहे. " पोलिसांचा कर्फ्यू एक वेळ परवडला, पण परंपरेचा परवडत नाही."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा तुम्ही एकांतामध्ये असता तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार येतात आणिमनाला गोंधळून टाकतात. अशावेळी आपल्याला काय करावे नि काय करु नये अशी मनाची द्विधा मनस्थिती होते. काय करावे काही सुचत नाही. मग अशी परिस्थिती असते तेव्हा एकच करायचे.मनाला स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी आवडणा-या गोष्टीकडे लक्ष घाला त्यात तुमचे मन रमले की, आपोआपच तुमची द्विधा असलेली मनस्थिती पूर्ववत होण्यास मदत होते आणि तुमच्या मनातला चाललेल्या गोंधळाला विराम मिळतो. दुसरी एक गोष्ट करा की,ज्यातून तुम्हाला काही पर्याय शोधण्यास मदत होते.काही संस्कारक्षम, आदर्श विचार, संतांची, थोर व्यक्तींची व विचारवंताची उपदेशात्मक ग्रंथ, पुस्तके किंवा विचार वाचण्यासाठी हातात घ्या. ज्यातून तुम्हाला काही ना काही पर्याय शोधून काढण्यास मदत मिळेल व गोंधळलेल्या मनाला स्थिर ठेवता येईल.कारण हेच ज्ञान आपल्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी व प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करतील. मग पुढील कामासाठी जोमाने लागू शकाल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *महत्‍व मानवसेवेचे*एक प्रसिद्ध संत होते. त्‍यांच्‍याकडे शिक्षण घेण्‍यासाठी दूरदूरवरून शिष्‍यगण येत असत. त्‍यांच्‍या शिष्‍य परिवारातील दोन शिष्‍य त्‍यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्‍नान करून पूजापाठ करण्‍यात मग्‍न होते. चार तासांच्‍या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा या रूग्‍णांची सेवा करण्‍यास ते गुरुला मदत करत. त्‍या संतमहात्‍म्‍याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्‍यामुळे स्‍वत पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना निशुल्‍क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्‍त्र, निवारा उपलब्‍ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्‍यांच्‍या उपचारांची व्यवस्‍था करत असत. एकेदिवशी त्‍यांचे दोन्‍ही शिष्‍य त्‍यांच्‍या दीर्घपूजेत व्‍यग्र होते. त्‍याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्‍यादिवशी आश्रमात रुग्‍णांची संख्‍या जास्‍त होती. परंतु दोन्‍ही शिष्‍य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्‍हा निरोप धाडला. त्‍यावर त्‍या दोघांनी नाराजी व्‍यक्‍त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घलू लागले. तेव्‍हा गुरुजींनी त्‍यांना पुढील शब्‍दात मार्गदर्शन केले,''वत्‍सांनो, मी तर व्‍यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्‍यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्‍या बरोबरीची असते. कारण ती निस्‍वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्‍या दोन्‍ही शिष्‍यांचे डोळे उघडले.                     *तात्पर्य*ईश्‍वराची जिवंत कलाकृती म्‍हणजे माणूस त्‍याची सेवा म्‍हणजे साक्षात ईश्‍वराची पूजा असते व त्‍या सेवेपेक्षा अन्‍य कोणतीही पूजा ही मोठी नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment