✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18/04/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १७२० - शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली● १८५३ - मुंबईहून ठाण्यापर्यंत रेल्वे सेवा नियमितपणे सुरू झालीकरण्यात आला.● १९२४ - सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले● १९३६ - पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला● १९५० - आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली● १९७५ - भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आर्यभट्टचे प्रक्षेपण.💥 जन्म :-● १८५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न, स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह पुरस्कर्ते समाजसुधारक● १९१० - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.● १९१६ - ललिता पवार, हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री● १९६२ - पूनम धिल्लन, हिंदी चित्रपट अभिनेत्री💥 मृत्यू :-● १८५९ - रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे, १८५७ च्या युद्धातील सेनापती● १९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.● १९७२ - महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक,● १९९५ - पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते, पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक.● २००२ - शरद दिघे, महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाटोदा ग्रामपंचायतीनं देशपातळीवर कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत श्रेणीत पटकावला दुसरा क्रमांक, पुरस्कारातून ४ कोटींची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदाची जनगणना जातीनिहाय करा, 2011 च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी देखील जाहीर करा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महागाई विरोधात केलेल्या आंदोलन प्रकरणातील गुन्ह्यात माजी आमदार खेडकर व इतर आंदोलकांचे जामीन मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा अनुदानासाठीची कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी, 20 एप्रिलपर्यंत कागदपत्रे जमा करण्याच्या शासनाच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये 01 मे रोजी महाराष्ट्रदिनी 51 सर्वधर्मीय जोडप्यांच्या सामुदायिक सोहळ्याचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आरसीबीच्या घरच्या मैदानात चेन्नईचा विजयी डंका, चेन्नईने आरसीबीवर आठ धावांनी मात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्य सुंदर आहे*https://m.facebook.com/story.php?story_fbid=3649684281824986&id=100003503492582&mibextid=Nif5ozसाहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे*(जन्म : पेढे परशुराम , तालुका चिपळूण , जिल्हा : रत्नागिरी, ७ मे १८८०, - मृत्यू : १८ एप्रिल १९७२) हे एक उल्लेखनीय भारतशास्त्रज्ञ, संस्कृत विद्वान, भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त झाला त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यासाठी ४० वर्षांपेक्षा जास्त सक्रिय शैक्षणिक संशोधन ज्याचा परिणाम धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या ६,५०० पृष्ठांवर झाला. इतिहासकार राम शरण शर्मा म्हणतात: "पांडुरंग वामन काणे, एक महान संस्कृतशास्त्रज्ञ, ज्याने सामाजिक सुधारणेचा विवाह केला, त्यांनी विद्वत्तेची पूर्वीची परंपरा चालू ठेवली. विसाव्या शतकात पाच खंडांमध्ये प्रकाशित "धर्मशास्त्राचा इतिहास" हे त्यांचे स्मारक कार्य आहे. प्राचीन सामाजिक कायदे आणि रीतिरिवाजांचा ज्ञानकोश. हे आपल्याला प्राचीन भारतातील सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यास सक्षम करते." त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त राजभवन महाराष्ट्र इथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.कोकणातील वेदशास्त्रपारंगत व विद्वत्तेची मोठी परंपरा असलेल्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा उत्तम ज्योतिषी आणि पंचांगकर्ते, तर आजोबा वैदिक पंडित, ज्योतिषी आणि उत्तम वैद्य होते. वडील वामनरावांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांचे सखोल ज्ञान होते. महत्त्वाचा असा ऋग्वेद तर त्यांचा तोंडपाठ होता. वामनराव पुढे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, न्यायालयात इंग्रजीतून कामकाज करणारे पहिलेच वकील ठरले. म्हणजे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक इंग्रजी भाषेतील कायद्याचे ज्ञान असा मिलाफ असलेले असे त्यांचे वडील वामनराव ! डॉ. पां. वा. काणे यांचे दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडीलही वैदिक पंडित आणि वैद्यकीचे उत्तम ज्ञान असलेले असे होते.पां.वा. काणे यांना अमरकोशातील सर्व श्लोक लहानपणीच तोंडपाठ होते. लहान वयातच त्यांनी विविध नियतकालिकांतून आधी मराठीतून आणि नंतर इंग्रजीतून लेखन सुरू केले. त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्तेचा आलेख सतत वरच चढत गेला. बी.ए. आणि संस्कृतमधून एम.ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन सुरू केले. संस्कृत, मराठी, हिंदी इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. अश्या रीतीने त्यांनी अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्एल.बी. झाले. नंतर झाला वेदान्त पारितोषिकासह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एम.ए. झाले. त्यानंतर ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्एल.एम. झाले. या परीक्षेत त्यांना व्ही.एन. मंडलिक सुवर्णपदक मिळाले. त्यांना मराठी, हिंदी,इंग्रजी खेरीज संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषा अवगत होत्या.काणेंनी १९०४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. नंतर ते एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते सन १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची प्रगती साधते तीच खरी मैत्री*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'Statue of Liberty'* हा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा कोणत्या देशात आहे ?२) कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) आधारित 'आभासी भिंत' तयार करणारा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता ?३) इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे पदसिध्द कुलपती कोण असतात ?४) देशातील पहिले खाजगी विमानतळ कोणते ?५) हवामान म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) अमेरिका २) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर ३) राष्ट्रपती ४) दुर्गापूर, पश्चिम बंगाल ५) एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरीची स्थिती होय.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गझलकार शेखर गिरी👤 कु. मधुरा हणमंत पडवळ, लातूर👤 सचिन कुलकर्णी, लातूर👤 योगेश मरकंटी👤 मनोज कुंटे👤 देवराव पाटील कदम👤 राजू मेकाले👤 चंद्रकांत तालोड👤 चंद्रशेखर अनरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहु नाम या रामनामी तुळेना। अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥ विषा औषधा घेतले पार्वतीशे। जिवा मानवा किंकरा कोण पुसे ॥८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरा-बायकोमध्ये मतभेद असतातच. तसं पाहिलं तर 90% जोडप्यांमध्ये दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी असतात, त्यामुळे वाद होणं, खटके उडणं स्वभाविकच आहे. परंतु एकाने समंजसपणा दाखवला पाहिजे. कारण वाद टोकाला जाऊन नवरा-बायको विभक्त होणार असतील तर त्या संपूर्ण कुटुंबाची वाताहात होते.**'लिव्ह-इन' मध्ये नात्याची कमिटमेंट नसते. त्यामुळे त्यात गांभीर्य नसते. एकत्र राहण्यातली नवलाई संपली की त्या नात्याचा कंटाळा येऊ लागतो. कमिटमेंट नसल्यामुळे दोघंही एकमेकांना बांधील नसतात. अंतिमत: अशा नात्याचा शेवट दोघांच्या विभक्त होण्याने होतो. आपल्यावर कुटुंबातल्या इतर सदस्यांबरोबर 'अॅडजस्ट' करण्याचे संस्कार झालेले असतात. वैवाहिक सुखही तसं क्षणिकच असतं, लग्नाची नवलाई संपली की सगळं चाकोरीबद्ध होऊन जातं. पण नवरा-बायको एकमेकांचे मित्र असतील तर त्यांच्या नात्यात सतत एक सकारात्मकता झिरपत असते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही नात्यामध्ये एकमेकाबद्दलचा विश्वास आणि प्रेम असेल तर ते नाते अधिक घट्ट बनते. कामापुरते किंवा आपमतलबासाठी निर्माण केलेले नाते कधीच जास्त काळ टिकत नाही.उलट अशा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन जोडलेल्या नात्यामध्ये एकमेकांबद्दल तिरस्काराची भावना उत्पन्न होते.तेव्हा नाते जर टिकवायचे असेल तर निःस्पृह भावनेने व आपुलकीने नाते निर्माण करुन ते शेवटपर्यंत कसे टिकतील यासाठी जपले पाहिजे. हीच ख-या जीवनाची यशोगाथा आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोरडी सहानभुती*एक कोल्हा एका विहिरीत पडला व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. तो आपले डोके मोठ्या मुष्कीलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता. इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला, अरेरे ! मित्रा तूच का आत पडला आहेस ? तिथे तुला फारच थंडी वाजत असेल, आणि तू पडलास तरी कसा विहिरीत ? तुझी स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कसं काय झालं ते तरी मला कळू दे. त्यावर कोल्हा म्हणाला, मित्रा, तू कृपा करून जर एखादी दोरी आत सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा ती मला या वेळी अधिक उपयोगी पडेल. विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर, म्हणजे मी माझी हकीगत तुला सांगतो.*तात्पर्य*एखाद्या संबंधाने नुसत्या शब्दांनी खूप कळकळ दाखविण्या पेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तरी त्याची किंमत फार मोठी आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment