✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.💥 जन्म :-● १४५२ : लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार💥 मृत्यू :-● १८६५ : अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे राष्ट्राध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपूरमध्ये सूर्य तळपला, 43.2 अंशसेल्सिअस जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं तुकडेबंदीबाबतची पुनर्विलोकन याचिका फेटाळली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ; गेल्या 24 तासात 700 रुपयांची वाढ,  प्रतितोळा दर 63 हजारांच्या पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर; शाहरुख खान आणि एस. एस. राजमौली यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - सनरायजर्स हैद्राबादने केकेआर ला 23 धावानी केले पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्महत्या : एक चिंतन*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1493759750750794&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोकण विभागकोकण विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई त्याच प्रमाणे मुंबई उपनगर हे देखील कोकण विभागमध्येच येतात.क्षेत्रफळ : ३०,७४६ किमी जिल्हे :मुंबई शहर – मुंबई उपनगर – ठाणे – पालघर – रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्गसाक्षरता: ८१.३६%इतिहासब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता.  ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे तीनच जिल्हे होते. १९६१ मध्ये कोकण विभाग हा नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्राचा भाग बनला. १९८१ साली सत्नगिरी जिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्याची निर्मिति झाली. कुलाबा जिल्याचे रायगड असे नामांतर करण्यात आले २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यावरील प्रशासकीय कारभार कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्याची निर्मिति करण्यात आली.चतुःसीमा: कोकण विभागाच्या पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेस पुणे विभाग आहे ज्याला पश्चिम महाराष्ट्र असेही संबोधले जाते. उत्तरेस गुजरात राज्य तर दक्षिणेस गोवा राज्य आहे.कोकण विभागातील मुंबई हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा तर सिंधुदुर्ग हा सर्वत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जोड़ीदार सुंदर नाही तर काळजीकरणारा पाहिजे…*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हीस्परर्स' या लघुपटात हत्तीची काळजी घेणारे दाम्पत्याची नावे काय आहेत ?२) आयपीएलमध्ये एका संघाकडून २०० सामने खेळणारा पहिला कर्णधार कोण ठरला आहे ?३) घानेंद्रियाची क्षमता तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी कोणते उपकरण विकसित केले आहे ?४) ज्ञानवापी मज्जिद कोणत्या राज्यात आहे ?५) १९२७ चा वन कायदा बदलून कोणत्या वर्षी वन संवर्धन कायदा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) बेली व बोम्मन २) महेंद्रसिंग धोनी ३) अल्फॅक्टोमीटर ४) वाराणसी, उत्तरप्रदेश ५) १९८०*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुधीर गुट्टे, विस्तार अधिकारी      पंचायत समिती माहूर👤 सौ वैशाली क्रांतिकुमार भुक्तरे, नांदेड👤 दत्ताहरी जाधव👤 प्रा. श्रीराम गोविंद गव्हाणे, संपादक👤 मुकुंद एडके👤 रामकिशोर झवर👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक धर्माबाद👤 बलकेवाड योगेश👤 संदीप पारने👤 सुनील पलांडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। तरा दुस्तरा त्या परा सागराते॥ सरा वीसरा त्या भरा दुर्भराते। करा नीकरा त्या खरा मत्सराते॥८०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'परमार्थ' साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे.**भगवंताला 'सर्व' देण्यापेक्षा 'स्व' द्यायला शिका. 'स्व' दिल्यावर 'सर्व' नाही दिले तरी चालेल, कारण ते आपले, आपल्या मालकीचे रहातच नाही. उलट 'सर्व' देऊन 'स्व' द्यायचा राहिला, तर 'सर्व' दिल्याचे समाधान मिळत नाही.**"भगवंताला 'स्व' देणे म्हणजे 'मी त्याचा आहे' ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याच्या मार्गावर चालणारी माणसे कधीच कुणाला घाबरत नाहीत. कारण सत्य हेच त्यांचे असत्याला दूर करणारे प्रभावी शस्त्र आहे.की ज्यामुळे असत्याचा सत्यापुढे काहीच चालू शकत नाही.म्हणून केव्हाही सत्याच्याच मार्गाने चालावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *युक्ती*सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट  धरू लागला.शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली.*तात्पर्य*नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment