✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/04/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १९३० : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.● १९९९ - अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.💥 जन्म :-● १८२७ : महात्मा जोतिबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक● १९०४ - के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक● १९०६ - डॉ. सुमित्र मंगेश कत्रे, संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक.● १९०८ मासारू इबुका, सोनी कंपनीचे सहसंस्थापक.● १९३७ रामनाथन कृष्णन, भारतीय टेनिस खेळाडू.● १९५१ रोहिणी हट्टंगडी, भारतीय अभिनेत्री.● १९६३ - बिली बाउडेन, क्रिकेट पंच.💥 मृत्यू :-● १९७७ - फणीश्वर नाथ रेणू, भारतीय लेखक.● २००० - कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे, भारतीय कर्करोग संशोधक.● २००३ - सेसिल हॉवर्ड ग्रीन, टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सचे स्थापक.● २००९ - विष्णू प्रभाकर, भारतीय साहित्यिक.● २०१५ - हनुतसिंग राठोड, भारतीय सेनापती.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा देशभरात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; महाराष्ट्रात जूनमध्ये चांगला तर जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस , स्कायमेटचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य, अजूनही कोरोना संपलेला नाही, नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मॉकड्रील,*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदाच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार; प्रथम वर्षाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मिळणार मल्टिपल चॉइसची संधी, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला निर्णय, त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - चेन्नस्वामी स्टेडियममध्ये खेळलेल्या आरसीबी विरुद्ध लखनौ च्या सामन्यात लखनौने एक विकेटनी सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नागोराव सा. येवतीकर लिखित दैनिक सकाळच्या ई - पेपर वरील*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*या लेखावर आलेल्या 25 प्रतिक्रिया वाचा खालील लिंक वरhttp://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_66.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महात्मा ज्योतिबा फुले*जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०)महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कार्य करीत रहा, परिणामाचा विचार करू नका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पिंपळाच्या झाडाला इंग्रजीत काय म्हणतात ?२) LED चा Full Form काय आहे ?३) 'विदर्भाचे दादा कोंडके' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) पहिला राष्ट्रीय सागरी दिवस केव्हा साजरा केला गेला ?५) १८८२ साली 'हंटर आयोगा'कडे सर्व मुलामुलींसाठी सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाची मागणी कोणी केली ?*उत्तरे :-* १) Peepal / Bow Tree २) Light Emitting Diode ३) डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ नाट्य कलावंत ४) ५ एप्रिल १९६४ ५) महात्मा ज्योतिराव फुले*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 दत्तात्रय दळवी👤 रामदास वाघमारे, संपादक👤 देविदास बस्वदे👤 विनोद चिलकेवार👤 युवराज पाटील👤 परमेश्वर नारवटे👤 माधव गंटोड👤 संजय मदनराव नागरे👤 प्रवीण कोडम, संपादक👤 सिध्देश रेवंतवार, धर्माबाद👤 साईनाथ हवालदार, येवती👤 माधव गंटोड👤 सुरेश दिवदेवार👤 शिवकुमार जाधव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी !  जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!**पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे.  देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांची स्वप्ने आणि विचार वाईटच असतात.त्यांना इतरांचे घेणे देणे काहीच नसते.त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार घोळत असतात.इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.ते सदैव असूरी आनंदात जीवन जगत असतात.अशा असूरी आनंदी असणा-या लोकांपासून समाजाचे फार मोठे नुकसान होते.चांगली माणसे अशापासून चार पावले दूर असतात तर दुष्ट माणसे चांगल्या माणसांच्या सहवासात कधीही येत नाहीत.पण एक खरे आहे अशांचा सहवास कधीही नसावा.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *सिंहाची गुणज्ञता*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यांस तो फाडून खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो त्यास म्हणतो, "अरे सिंहा, "या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे ऐकून सिंह म्हणाला, "अरे निगरगट्ट माणसा, "तुझा येथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे मांस तू मागतोस, या तुझ्या निर्लजपणाबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही तर फुकट मरशील मात्र.' हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक मारुन म्हणाला, "अरे भल्या माणसा, भिऊ नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस, इकडे ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग करुन एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला.                       *तात्पर्य*लोचटपणा करुन डोके उठविणाऱ्या माणसाचा लोकास कंटाळा येतो. पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत, त्यांचा परामर्श लोक आपण होऊन घेतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment