✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १६५६ - शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायगड किल्ला ताब्यात घेतला● १८९६ - पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन.● १९१९ - महात्मा गांधींची सत्याग्रहाचे आवाहन .● १९८० - अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षपदाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली💥जन्म● १९०९ - जी.एन. जोशी, भावगीतगायक व संगीतकार.● १९१७ - हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु, मराठी कथाकार व कवी.● १९१९ - रघुनाथ विष्णू पंडित, कोंकणी कवी.● १९२७ - विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग, मराठी उद्योजक.● १९५६ - दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.● १९७१ - संजय सुरी, चित्रपट अभिनेता, निर्माता.💥मृत्यू● १९८९ - पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा-कादंबरीकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सलग पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *छत्रपती संभाजीनगरमधील मास कॉपीप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती, 24 तासात चौकशी अहवाल देण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हनुमान जन्मोत्सववेळी धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवा, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगरमधील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे काढले; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बाहेरील औषधं लिहून देण्यास पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बंदी; सर्व औषधं मोफत मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यात पंजाबचा राजस्थानवर पाच धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिन 07 एप्रिल - प्रासंगिक लेख             *आरोग्यम धनसंपदा*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल...."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'म्हारी छोरिया छोरो से कम है के ?' हा संवाद कोणत्या चित्रपटातील आहे ?२) तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचे मूळ नाव काय आहे ?३) आबेल पुरस्कार - २०२३ कोणाला जाहीर झाला आहे ?४) भारताचे पहिले अर्जुन पुरस्कार विजेते क्रिकेटपटू कोण ?५) राज्यघटनेच्या कितव्या तरतुदीनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संसद वेळोवेळी कायद्याने ठरवेल तसेच वेतन व भत्ते मिळण्याचा अधिकार आहे ?*उत्तरे :-* १) दंगल २) तेंझिन ग्यात्सो ३) लुईस काफारेली ४) सलीम दुर्रानी ५) कलम १०६*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सय्यद रफिक👤 राजेश सुरकूटवार👤 मारोती कदम👤 दत्ताहरी कदम👤 पोषट्टी सिरमलवार👤 व्यंकट चन्नावार👤 लक्ष्मण दशरथ सावंत👤 अभिनंदन पांचाळ👤 सय्यद साजिद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांपरी संकटे साधनांची। व्रते दान उद्यापने ती धनाची॥ दिनाचा दयाळू मनी आठवावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहिणाबाई अशिक्षित, अडाणी पण प्रतिभासंपन्न होत्या. पैशानं गरिब मात्र विचारांची, भावनांची श्रीमंती प्रचंड होती. त्यांचा मुलगा सोपानला शाळेतील एका स्पर्धेत, स्वामी विवेकानंदाचा फोटो बक्षिस मिळाला. भगवी वस्त्र, भगवा फेटा, तेजपुंज चेहरा, पाणीदार डोळे, रूबाबदार उभं राहणं. गंमत म्हणून त्यानं आईला विचारलं, ओळख बरं कुणाचा आहे हा फोटो ? शेतात दिवसभर राबणारी एक स्त्री,, तिला कसं माहित असणार विवेकानंद ? तो फोटो बारकाईनं पाहिला व पटकन् म्हणाल्या..." देवाला कुणी रं फेटा बांधलाय ? झ्याक दिसतयं."**विवेकानंदाचं वर्णन यापेक्षा उत्तम शब्दांत दुसरं असूच शकत नाही. किती योग्य, किती नेमकं वर्णन ! खरंच, विवेकानंद देवंच होते आध्यात्मातले ! ते देवत्व नेमकेपणानं बहिणाबाई पाहू शकल्या याचं कारण त्यांची 'संवेदनशिलता.' ना शाळेचा परिचय, ना शहराची ओळख, साध्या खेड्यात राहणारी स्त्री. मात्र त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मराठी भाषेच्या खजिन्यातलं रत्न; जणू कोहिनूर हिराच ! आचार्य अत्रेंनी बहिणाबाईच्या कवितांना 'मोहरांचा हंडा' म्हटलयं याचं कारण बहिणाबाईंचं 'संवेदनशिल मन !'*              ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुस-याच्या सहाय्याने जीवन जगणे म्हणजे एकप्रकारची गुलामीच आहे. कारण प्रत्येकवेळी तो म्हणेल त्याचपध्दतीने करावे लागणार.त्यामध्ये आपल्याला स्वत: काही नवे करण्याची इच्छा असेल तर ते काहीच करु शकत नाही. मग अशी गुलामी पत्करण्यापेक्षा केव्हाही मुक्तपणे स्वतंत्र राहणे चांगले.स्वतंत्रपणे राहून आपल्या मनातील अभिव्यक्तीला चालना देता येते, आपल्या संकल्पना साकार करता येतात, स्वतंत्र विचारसरणी असल्यामुळे आपल्या प्रगतीची दारे खुली असतात. आपल्या कोणत्याही सृजनशीलतेला बाधा येत नाही. आपल्याला मुक्तपणे जीवन जगण्याचा आनंद मिळतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *प्रयत्नांती यश*थोमस अल्व्हा एडिसन यांची ही कथा.आपल्या अनेक शोधांनी अवघ्या मानवजातीचे आयुष्य उजळवून टाकणारा ,ते सुखमय करणारा हा संशोधक . सतत कसले ना कसले प्रयोग करीत प्रयोगशाळेत दिवसभर संशोधन करणे हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन करणे,हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन केल्यावर त्यांना दिव्याचा शोध लागला .त्यावेळी भेटावयास ,त्यांचे कौतुक करावयास आलेल्या व्यक्तींनी त्यांना विचारले,'या शोधासाठी तुम्हाला किती प्रयोग करावे लागले ?"'एक हजार ...' एडिसनम्हणाला .त्यांना पुन्हा विचारण्यात आले ,'आपण एक हजार वेळा प्रयोग केलेत .परत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर खरतर आज लाभलेल्या यशाबद्दल आपणाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया काय ?' यावर एडिसन म्हणाला ९९९ प्रयोगांनी दिवा बनवता येत नाही ,हेच मला कळल.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment