✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १८५७ : क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.● १९८२ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली.💥जन्म :- ● १९२९ : उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता💥मृत्यू :- ● १९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.● १९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.● १९९७ - श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदरात वाढ. या आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के असेल व्याजदर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एप्रिल महिन्यापासून अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत होणार वाढ, पेनकिलर, ॲंटिबायोटिक तसेच हृदयरोगपर्यंतच्या सर्व औषधांच्या किंमतीत होणार वाढ. महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर वाढणार बोजा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वसामान्यांना मोठा दिलासा, पॅन आणि आधार लिंक करण्यासाठीच्या मुदतीत वाढ , आता नवीन अंतिम मुदत 30 जून*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे- अहमदनगर रेल्वे सुरु करा; प्रवाशांची मागणी, केंद्रीय रेल्वे समितीच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन रेल्वे बोर्डाच्या अखिल भारतीय रेल्वे प्रवाशी सेवा सुविधा समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले 'योग्य निर्णय'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बनावट औषध प्रकरण - केंद्र सरकारची मोठी कारवाई ! 20 राज्यातील 18 फार्मा कंपन्यांची मान्यता रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लिट. पदवी प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुन्या चालीरीती आणि कोरोना काळ*लहान असतांना घरातले वाडवडील मंडळी काही गोष्टी आवर्जून करायला सांगायचे त्याचे महत्व आज कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून जी काळजी घेत आहोत, ती काळजी फार पूर्वीपासून आपल्या देशात घेतल्या जात होती याची प्रचिती येते. बाहेरून एखादा व्यक्ती मग ते घरातील सदस्य असो वा पाहुणे घरात येत असेल तर त्याला सर्वप्रथम हातपाय धुण्यास सांगितले जाते. ग्रामीण भागात आज ही हात पाय धुण्याची जागा ही घरात प्रवेश करण्यापूर्वीच असते. घरातल्या मुलानी बाहेर खेळून आले की, आई त्यांना हातपाय धुतल्याशिवाय घरात येऊ देत नाही. त्यामागे कारण हेच असू शकते की, बाहेरील कोणते जीवजंतू घरात प्रवेशित करू नये आणि त्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जायची. घरात बाळंतपण झालेली असेल तर आई सर्वाना बजावून सांगत असे की, हातपाय धुतल्याशिवाय कोणीही बाळाजवळ येऊ नये. त्याचे ही कारण तसेच होते, लहानसे बाळ जीवजंतूला लवकर बळी पडतात, त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती देखील खूप कमी असते. म्हणून प्रत्येक घरातली आई अशी काळजी घेत. कुणाच्या अंत्यविधीला जाऊन आले की, अंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करणे त्याज्य होते. अंत्यविधी ह्या प्रक्रियामध्ये अनेक जीवजंतू आसपासच्या परिसरात वावरतात आणि अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या सर्वाना त्याचा संपर्क होऊन घरात जीवजंतू येऊ नये म्हणून अंत्यविधी करून आल्यावर अंघोळ करण्याची प्रथा योग्य वाटते. त्यानंतर महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी पाच दिवस सर्वांपासून वेगळे राहणे यात देखील असेच काही कारण आहे असे वाटते. आज आपण ज्या पद्धतीने विलगिकरण पद्धत पाहत आहोत ते काही अंशी येथे लागू पडत असेल असे वाटते. संसर्ग आणि संपर्कातुन प्रसार पावणारे रोगांचे फैलाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही. जुने जाणते लोकं काही प्रथा किंवा चालीरिती पाळत असत, त्याचे शास्त्रीय कारण त्यांना कदाचित माहीत नसेल पण जीवजंतू, विषाणू, सूक्ष्मजीव घरात येऊ नये म्हणून ते फार पूर्वीपासून काळजी घेत आले आहेत. तेंव्हा आपणही साध्या साध्या बाबी काळजीपूर्वक करू या. कोरोनासारख्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी नियमित हातपाय धुणे, परक्याशी संपर्क न करणे, घराबाहेर न पडणे, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्कचा वापर करणे इत्यादी बाबी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे.लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*श्रीमती पुपुल जयकर*(११ सप्टेंबर १९१५: इटावा, उत्तर प्रदेश,- २९ मार्च १९९७ : मुंबई, महाराष्ट्र) या इंग्लिश लेखिका होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या. पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली, ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत टिकली.लंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल मेहता यांचे बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी लग्न झाले.इ.स. १९४१ साली काँग्रेस पक्षात सामील झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेर‍अली यांच्यांशी ओळख झाली. १९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट झाल्यावर जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला.पुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या पुढे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेग (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष झाल्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" अपयशाच्या कठीण खडकाखालीचयशाच्या पाण्याचा झरा असतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तिबेटचा तिसरा धर्मगुरू म्हणून दलाई लामा यांनी कोणत्या ८ वर्षीय मुलाची निवड केली ?२) पहिले WPL ( वुमन प्रीमियर लीग ) चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?३) जिल्हा परिषद सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती असते ?४) पृथ्वीचा आकार कसा आहे ?५) महाराष्ट्रात अपंगांसाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) मंगोलियन मुलाची २) मुंबई इंडियन्स ३) ७५ सदस्य ४) ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर ( जिओइड ) ५) नागपूर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 दुष्यंत भाऊ सोनाळे, नांदेड👤 पंकजकुमार पालीवाल, सहशिक्षक👤 प्रदीप मनुरकर, धर्माबाद👤 उदय पवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 धीरज कोयले👤 पिराजी शेळके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा रामनामे वदा पुर्णकामें। कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें॥ मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत कबीर म्हणतात..."बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलीया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय."**'आदर्श व्यक्तिमत्व' एका दिवसात बनू शकत नाही. या जगात वाईटाचा शोध घेतला तर सर्वात वाईट आपण स्वत:च  सापडतो.**'शिल्पकार' जसा एखादे शिल्प घडविताना, त्यातील नकोसा भाग काढतो व हवासा भाग ठेवून एक देखणे शिल्प तयार करतो. तद्वतच आपल्यातील दोष शोधून,ते काढून टाकून एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' बनण्याचा 'संकल्प'  हिच खरी 'घटस्थापना.'**हि विधायक 'घटस्थापना' झाली कि आपोआपच ह्रदयात 'मानवतेची प्रतिष्ठापना' झालीच म्हणून समजा.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचा एक हसरा चेहरा इतरांसाठी खूप काही आनंद देऊन जातो. तुमच्या हस-या चेह-याकडे पाहून समोरच्या जीवनात कितीजरी दुःख असले तरी तो काही क्षण विसरुन तर जातोच पण दुसऱ्या क्षणी तो विचार करतो की,आपला रडका आणि पडका चेहरा करून राहिल्याने दु:ख थोडेच कमी होणार आहे असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. आपल्या चेह-यामुळे तर आपल्यासह समोरचाही चिंतेत पडतो आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारा थोडा बहुत आनंदाला पारखा होतो एवढेच नाही तर त्याचा आनंद आपण हिरावून घेतल्यासारखा वाटतो. इतरांना आनंद देण्यापेक्षा आपण दु:खच देत आहोत आणि त्यांचे कारण आपणच आहोत असा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाने कितीजरी दुःख असले तरी आपल्या चेहऱ्यावर थोडे तरी हास्य फुललेले असू द्यावे.©️ *व्यंकटेश काटकर,नांदेड* 9️⃣4️⃣2️⃣1️⃣8️⃣3️⃣9️⃣5️⃣9️⃣0️⃣🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *❃ युक्ती ❃*      सूर्य  आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकटधरू लागला . शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली .         *_तात्पर्य_*    नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही .*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment