✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *जागतिक रंगभूमी दिवस*💥 ठळक घडामोडी● १९९२ : ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.● २००४ : नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.💥जन्म● १७८५ - लुई सतरावा, फ्रांसचा राजा💥मृत्यू● १८९८ : सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अवयवदानासाठी पुढे यावं, त्यासाठी कोणतीही अट नाही; मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेडमध्ये केसीआर यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आव्हान, म्हणाले, तेलंगणातील शेतकरी कल्याणकारी कार्यक्रम आपल्या राज्यात राबवून आपली प्रामाणिकता सिद्ध करावी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इस्रोच्या सर्वात मोठ्या रॉकेटने 36 वनवेब उपग्रह यशस्वी झेपावले, सलग सहाव्यांदा दिमाखदार कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ, मुंबईत नागरिकांच्या जीवाशी खेळ; तीन जणांना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधानपरिषदेचे 125 तास तर विधानसभेचे 165 तास कामकाम; दोन्ही सभागृहात 17 विधेयके संमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई -सोलापूर वंदे भारत ट्रेन सुसाट; 32 दिवसांत 4.3 कोटी रुपयांची केली कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर कोरले आपले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्याच्या रंगभूमीवर आपण अनेक भूमिका वठवित असतो. कधी मुलगा म्हणून, कधी भाऊ म्हणून, कधी दिर म्हणून, कधी नवरा म्हणून, कधी वडील म्हणून, कधी काका म्हणून, कधी आजोबा म्हणून, कधी शिक्षक म्हणून, कधी लेखक म्हणून, कधी कवी म्हणून, कधी मित्र म्हणून अबब..... किती त्या भूमिका अगदी सहजपणे लीलया केल्या आहेत. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा .......!~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर सय्यद अहमद खान  ( ऑक्टोबर १७, १८१७ - मार्च २७, १८९८ ) हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला. सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरुवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.● हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हां इंग्राजांकडून किताब● १८६४ ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना● मोहमेडन अग्लो ओरियंटल स्कुलची स्थापना ● २७ मार्च १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही मिळविण्याच्या नादात मनुष्य बरेच काही सोडून देत असतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इस्त्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?२) ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड कशी होते ?३) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ? ४) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?५) गुगलचे संस्थापक कोण आहेत ?*उत्तरे :-* १) एस. सोमनाथ २) थेट जनतेमधून ३) ३ लाख ८४ हजार किमी ४) विल्यम हर्षल ५) सर्जी ब्रिन व लॅरी पेज*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीमती गायत्री यनगंदेवार, सहशिक्षिका, धर्माबाद👤 स्वरुप सुंदरराज वैद्य, नांदेड👤 कल्याणकर साईनाथ, येवती👤 वैदेही चिलका👤 सुनील खंडेलवाल👤 धनंजय मांजरमकर👤 जगदीश्वर भूमन्ना जंगलोड👤 प्रमोद मोहिते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बळें आगळा राम कोदंडधारी। महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मडक्यासाठी लागणारी माती आणण्याला कुंभाराने गाढव पाळलेले असते. गाढव जेव्हा रिकामे असते तेव्हा ते मालकाच्या अंगणात थांबत नाही. ते सरळ उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात बसते. पालापाचोळा साली-टरफले सारे ते मटकावते. प्रत्येक प्राण्याच्या काही त-हा असतात. खाण्याच्या काही सवयी असतात. गाढवाला अगदी गूळपाण्यात भिजवलेली डाळ दिली तरी ते मनापासून खाणार नाही. उकिरड्यावर पडलेले उष्टे अन्न मनापासून खाईल.**माणसांचेही तसेच असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त-हा असतात, सवयी असतात. "विशिष्ट व्यक्तिला विशिष्ट गोष्टीच आवडतात, आणि विशिष्ट व्यक्ति विशिष्ट ठिकाणीच सापडते. त्यांना दुसरीकडे शोधायचे कारण नाही."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकटे राहून कधीच कोणते प्रश्न सुटत नसतात.त्यावर उपायदेखील सापडत नाही.उलट प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्याचा पश्चाताप स्वतःला फार होतो.पश्चातापाचे रुपांतर आपल्या मानसिकतेवर होऊन समोर येणा-या प्रश्नावरदेखील पर्याय शोधू शकत नाही.यासाठी आपल्या सर्व प्रश्नांसाठी कुणाचीतरी मदत घ्यावी लागते.आपल्या प्रश्नाचे उत्तर चर्चेतून किंवा  कुणाच्यातरी सल्ल्यानुसार  मिळू शकेल.म्हणून एकटे न राहता चार मित्रांच्या सहवासात,वडील माणसांच्या सहवासात आणि चार लोकांच्या समुहात राहणे पसंत करा.त्यामुळे तुम्हीसुखी,आनंदी, समाधानीव मानसिकदृष्ट्या संतुलीत राहाल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ सचोटी ❃*         *एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’    *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment