✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली💥 जन्म :-१९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे 💥 मृत्यू :- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री१८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्नाटकच्या जनतेच्या प्रेमाची व्याजासह परतफेड करणार, बंगळुरू-म्हैसूर महामार्गाचे उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशी गोवंश सुधारणा प्रकल्प हा क्रांतिकारी प्रयोग, नितीन गडकरींच्या हस्ते बारामतीत गोवंश गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा, कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यसभेत काँग्रेसकडून व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील, तर  गटनेतेपदी मल्लिकार्जुन खर्गे कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ, शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार : देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IND vs AUS 4th Test : विराट कोहलीची दमदार 186 धावांची खेळी, शुभमनचं शतक, 571 धावा करत भारताची 91 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *शिक्षकांना शिकवू द्या ...*शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *गोपीनाथ गणेश तळवलकर*गोपीनाथ गणेश तळवलकर  (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्‍या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मेल - एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या शेवटच्या डब्याच्या मागे क्रॉस किंवा इंग्रजी अक्षर X असे का लिहिले असते ?२) पाकिस्तानातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर कोण आहे ? ३) कांदा उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?४) असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नसतात ?५) जागतिक श्रवण दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) संबंधित गाडी पूर्णपणे सुरक्षित समोर गेलेली आहे असा संकेत रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळतो. २) मारव्हिया मलिक ३) दुसऱ्या ४) किवी पक्षी ५) ३ मार्च *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भगवान शंकरराव कांबळे, पत्रकार, धर्माबाद👤 रुस्तुम शेख, नांदेड👤 सुरेश बोईनवाड👤 राजेश कवडे👤 साईनाथ बोंबले👤 लक्ष्मण वडजे👤 कामाजी धतुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनाचा दयाळू मनाचा मवाळू। स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥ तया अंतरी क्रोध संताप कैंचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.**समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.**"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*              ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची  जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा,भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य समजावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कड्यावर चरताना पाहिला. तेव्हा तेथे आपल्याला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन तो बकर्‍याला म्हणाला, 'अरे तू अशा उंच आणि अवघड जागी सगळा दिवस चरतोस, हे बरं नाही. एखादे वेळी पाय घसरून खाली पडलास तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा या मैदानात कोवळे गवत आणि गोड अशी झाडाची पानं आहेत ती खा, त्याने तुला जास्त समाधान मिळेल.' त्यावर बकरा म्हणाला, 'बाबा रे, तू म्हणतोस ते खरं, पण मला तू भुकेला दिसतो आहेस, म्हणून तू जिथे आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही.'तात्पर्य :- जे लोक स्वार्थी असतात, त्यांनी आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवूं नये, कारण त्यात काहीतरी कपट असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment