✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक ग्राहक हक्क दिन*💥 ठळक घडामोडी● १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना💥जन्म● १८६५ - आनंदी गोपाळ जोशी💥मृत्यू● १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.१९९२ - डॉ. राही मासुम रझा, उर्दू कवी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संपकरी कामगारांवर कारवाई करणारा मेस्मा कायदा संपुष्टात आल्याने हा कायदा पुनर्संचयित करण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले आणि चर्चेविना मंजूर ही करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोना महामारीच्या काळात थांबवण्यात आलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणार नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमेरिकेत आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने आता तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढली, कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी हिंसाचारामध्ये गेल्या 12 वर्षात 77 टक्क्यांची घट झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचं निधन; बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने अपघाती मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान*जीवनात सुखी राहायचे असेल तर सर्वप्रथम समाधान राहायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी निव्वळ धावपळ करून काही फायदा नसतो. धावपळ मध्ये कधी कधी थोडा वेळ घरातल्या लोकांसाठी, नातालगासाठी, मित्रांसाठी काढले की भरपूर सुख मिळते आणि तेथेच समाधान मिळते. ही गोष्ट जर पैश्याने मिळाली असती तर श्रीमंत लोकांएवढे समाधानी कोणीच राहिले नसते. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769नियमित ही पोस्ट मिळविण्यासाठी या समुहात add व्हावे. त्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागो ग्राहक जागो*वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.15 मार्च 1962 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे केलेल्या भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व चार हक्क प्रदान केले. त्यानंतरच्या कालावधीत ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा करून मुलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी चार ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचे आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.   *ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी*● फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.● वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.● वस्तू खरेदी करताना बिल मागावे.● सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.● डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.● वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.● पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.● ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.● ~वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात लांब रेल्वे फ्लॅटफॉर्म कोणता ?२) सफरचंदांमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?३) घड्याळचा शोध कोणी लावला ?४) चीनच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली ?५) कोणता मासा हवेत उडतो ?*उत्तरे :-* १) हुबळी रेल्वे स्टेशन, कर्नाटक ( १५०७ मी लांब ) २) 'अ' जीवनसत्त्व ३) पिटर हेनलेन ४) ली कियांग ५) गरनाई मासा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 राजेंद्र महाजन, औरंगाबाद👤 विलास फुटाणे, औरंगाबाद👤 शुभम सांगळे👤 लक्ष्मण चिंतावार👤 अंबादास पवार👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 बालाजी मामीलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राम कल्पतरु कामधेनु। निधी सार चिंतामणी काय वानूं॥ जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.*               *आम्ही विठ्ठलाचे वीर ।*        *फोडू कळी काळाचे शीर ।।**तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.*           *ज्ञानदेवे रचिला पाया !*            *तुका झालासे कळस' !!**इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."*        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व सामान्य माणसांच्या निद्रानाशाची अनेक कारणे जरी असली तरी त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे एखादे हाती घेतलेले काम चांगल्याप्रकारे न होणे. त्यामुळे मनावर खूप ताण पडतो आणि मनाची चलबिचल अवस्था निर्माण होऊन निद्रानाश होतो.त्यासाठी हातात काम घेण्यापूर्वी कामाचे नियोजन करावे.कामाचावेळ आणि त्यासाठी लागणारे कौशल्य यांची सांगड घालावी व त्या कामात मन एकाग्रतेने ठेऊन त्यात सातत्य ठेवले तर हातातले काम उत्कृष्ट होते आणि मनाला समाधानही वाटते.एकदा का मनाला समाधान वाटले की, मग शांत झोप लागते.झोप ही ठराविक वेळेत झाली तर आरोग्यही चांगले राहते.त्यामुळे मानसिक समाधानही मिळते.पुढे येणारे कामही तितक्याच अधिक गतीने होण्यास मदत होते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!                   *तात्पर्य*शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment