✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/03/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● मुंबईतील सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले● १९९२ : भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.● १९९८ : सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणकदेशाला अर्पण केले💥जन्म● १८६८ : मॅक्झिम गॉर्की, रशियन लेखक.● १९२६ : पॉली उम्रीगर, भारतीय क्रिकेटर💥मृत्यू● १९८४ : स्वातंत्र्यसंग्रामातील थोर पुढारी भाऊसाहेब रानडे.● १९९२ : आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.● २००० : शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्‍ज्ञ आणि लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पहिली ते बारावीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम NCERT बदलणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकात बदल करण्याची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना जाहीर, 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची 70 टक्के थकबाकी भरली तर 30 टक्के रक्कम माफ होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठवाड्यात आत्तापासूनच जाणवू लागली पाणीटंचाई, हिंगोलीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे स्थालंतर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रत्नागिरीत समुद्रसपाटीपासून अंदाजे 390 मीटर उंचीवर 'रामगड' नावाचा किल्ला आढळून आल्याचा दुर्ग अभ्यासकांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतही वाढता कोरोना! पालिकेने वाढवली रुग्णालयातील बेडची संख्या, कोरोनाचा वेग वाढला! देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजार पार, सुमारे दोन हजार नवे रुग्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आधार क्रमांक पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 अशी आहे. एक एप्रिल 2023 पासून लिंक नसलेले पॅन होतील निष्क्रिय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात घेऊ या काळजी* मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८ ते ४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल किंवा काळा गॉगल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक शाळांनी तयार करावे. काही दिवसांत शाळेतील परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. उन्हाचा त्रास सहन करण्यापेक्षा त्याची काळजी घेतलेली केव्हाही बरे. म्हणून आपण ही काळजी घ्या आणि इतरांना काळजी घ्यायला सांगू या. लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *क्रिकेटपटू पॉली उम्रीगर*२८ मार्च १९२६ रोजी सोलापूर येथे पॉली उम्रीगर यांचा जन्म झाला. पॉली उम्रीगर यांचे मूळ नाव पहलान रतनजी उम्रीगर. त्यांच्या वडिलांची कापडाची कंपनी होती. नंतर त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले. पॉली उम्रीगर यांचे शिक्षण मुंबईत झाले. १९४४मध्ये झालेल्या बॉम्बे पेंटॅग्युलर स्पर्धेत ते पारसी संघातर्फे खेळले. हा त्यांचा प्रथम श्रेणीतील पहिला सामना. त्या वेळी ते अठरा वर्षांचे होते. १९४८मध्ये भारतीय कसोटी संघात त्यांची निवड झाली. वेस्ट इंडिजविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. १९५५ ते १९५८ या काळात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. पॉली उम्रीगर मध्यम फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. १९६२ साली ते कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्या वेळी त्यांनी इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूपेक्षा अधिक म्हणजे ५९ कसोटी खेळल्या होत्या. त्यांची धावसंख्याही त्या वेळच्या भारतीय फलंदजांपेक्षा अधिक होती. त्यांनी एकूण ३६३१ धावा काढल्या. त्यात बारा शतकांचा समावेश होता. त्या वेळी भारतात सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्यांच्या नावे होता. सुनील गावस्कर यांच्यापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके उम्रीगर यांच्या नावावर होती.पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्विशतक ठोकले होते. पॉली उम्रीगर यांचे निधन सात नोव्हेंबर २००६ रोजी झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" जीवनाचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दुःख भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२१ चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' कोणाला प्राप्त झाला आहे ?२) जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी किती असते ?३) पृथ्वीच्या परिभ्रमणचा कालावधी किती आहे ?४) 'उगवत्या सूर्याचे राज्य' असे कोणत्या राज्याला ओळखले जाते ?५) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) आशा भोसले २) ५० सदस्य ३) ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे, ५४ सेकंद ४) अरुणाचल प्रदेश ५) गुरू *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 स्वानंद बेदरकर, नाशिक👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा साहित्यिक, वसमत👤 कवी स्टीफन कमलाकर खावडिया👤 पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, नांदेड👤 जयवर्धन भोसीकर👤 किरण कदम👤 प्रल्हाद धडे👤 रमेश राजफोडे👤 हर्ष प्रदिपकुमार मुक्कावार, उदगीर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*【माझ्या फेसबुक अकाउंटवरून वाढदिवसाची माहिती संकलित केली जाते. 】[ आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फेसबुक वर follow करावे किंवा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखानंदकारी निवारी भयातें। जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥ विवेके त्यजावा अनाचार हेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ?  बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!**कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?**" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्हाला कधी कुणाला द्यायचेच असेल तर तुमच्या चेह-यावरचे थोडे हास्य द्या कारण तुमच्या थोड्या स्मितहास्याने इतरांच्या जीवनात असलेल्या दुःखाचा विसर काही काळ दूर होऊ शकेल.जर तुम्हाला कधी कुणाला द्यायचेच असेल तर तुमच्याकडे असणारे थोडे सहकार्य द्या की ज्या सहकार्यातून इतरांना जीवनात चांगले जीवन जगण्याचे बळ मिळेल.जर तुम्हाला द्यायचेच असेलतर थोडे प्रेमही द्यायला विसरु नका. कारण तुमच्या अंतःकरणातील प्रेमामुळे इतरांच्याजीवनात चैतन्यानेजगण्याची पालवी बहरेल.हाच तर तुमच्या आमच्या जगण्यातला माणुसकीचा खरा अर्थ आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *❃ सचोटी ❃*       *एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’    *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment