✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १८९६ : पहिल्या ऑलिंपिक सामन्याचे (पुनरुज्जीवित) उदघाटन● १९५२ : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.● १८६९ : दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.💥जन्म● १८९९ - शि.ल. करंदीकर, मराठी लेखक● १९६५ - देवकी पंडित, भारतीय शास्त्रीय गायिका💥मृत्यू● १९६८ - नारायण गोविंद तथा ना.गो. चापेकर, मराठी साहित्यिक● १९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार, शेतकऱ्यांना लवकरच मोठी मदत मिळणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील नऊ विरोधी पक्षनेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप, राज्यपालांच्या भूमिकांवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोकण म्हाडाची 4,752 घरांची लॉटरी, 8 मार्चपासून अर्जविक्री तर 10 मे रोजी सोडत, विरार-बोळींजमध्ये तब्बल 2 हजार 48 घरांची होणार विक्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *होळीपूर्वी बरसाना-जयपूर शहर जल्लोषात तल्लीन; लाठमार-रासलीला रंगोत्सव उत्सवात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *WPL 2023 - मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच सामन्यात 143 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वूमेन्स प्रीमियर लीग तरुणींना प्रेरणा देईल, त्यांची स्वप्न सत्यात उतरवेल: नीता अंबानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Class-2nd, 4.7 Croosing the Road -poem**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/jfK_3KyfiVY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पळस, होळी आणि धुलिवंदन*होळीची चाहूल म्हणजे आजूबाजूच्या परिसरात फुललेला पळस. पळसाची फुले आपल्या विशिष्ट रंगामुळे सर्वाना आकर्षित करत असतात. मराठी वर्षातील शेवटच्या फाल्गुन महिन्याला सुरुवात झाली की शेतात आणि जंगलात पळसाच्या झाडाला अनेक फुले दिसू लागतात. असे म्हटले जाते की पूर्वीच्या काळातील माणसे ही पळसाची फुले एकत्र करून त्याचा रंग तयार करीत असत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर हा रंग टाकून धुलीवंदनाचा सण साजरा करीत. परंतु काळ बदलत गेला तसा लोकांच्या सण साजरा करण्याच्या पद्धती देखील बदलत गेल्या. आज या पळसाच्या फुलांकडे लोकांचे फक्त लक्ष जात आहे मात्र त्याचा रंग म्हणून कोणी वापर करत नाहीत. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध रंगाचा वापर आज केल्या जात आहे, ज्यामुळे अनेकांना त्वचारोग होण्याचा धोका देखील संभवत असतो. काही महाभाग मंडळी वोर्निश कलर ही वापरतात. ज्यामुळे खूप त्रास होतो. मित्रा-मित्रात हा खेळ खेळताना कोण कशाचा वापर करेल हे सांगता येत नाही. एकमेकांवर अंडे फोडण्याचे प्रकार देखील काही ठिकाणी होतात. अंड्याच्या उग्र वासामुळे रंगाचा खेळ बेरंग होऊ शकतो. म्हणून सर्व बाबी लक्षात घेऊन नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमीचा सण साजरा केल्यास ते सर्वासाठी सोईस्कर होईल. सायंकाळच्या कातरवेळीशेतात करूया मुक्त विहाररखरखत्या वातावरणातपाहू पळस फुलांचा बहार*झजरी दादा, झजरी दादा*फाल्गुन महीना सुरु झाला की आमच्या बच्चे कंपनीला खुप आनंद व्हायचा कारण सर्वात आवडणारा आमचा होळीचा सण जवळ आलेला असायचा. होळीच्या पंधरा दिवासपूर्वीच आम्हाला वेध लागायाचे. तीन चार मित्र मिळून एक गट केल्या जायचे. सुताराजवळ जाऊन दोन छान लाकडे तासुन घ्यायचे, ज्यास आज टिपरी म्हणतात हे कळले. ते दोन लाकडे एकमेकावर आपटून प्रत्येकाच्या घरा समोर जाऊन *झजरी दादा, झजरी दादा* हे गीत म्हणून खांद्यावर असलेल्या झोळीमध्ये घरातील माई, ताई, अक्का वाटीभर ज्वारी टाकायचे. हे दिवस म्हणजे प्रत्येकांच्या घरी शेतातून ज्वारी आलेली असायची त्यामुळे ज्वारी देताना कोणी कुरकुर करायचे नाही. जर कोणी दान दिले नाही तर त्यांच्या नावाने बोंबा मारुन पुढे जायचो. असे आम्ही रोज पंधरा दिवसात पूर्ण गाव पिंजुन काढायचो. जवळपास एक-दीड पायली ज्वारी जमा व्हायची. ते सर्व ज्वारी दुकानात विकून मिळालेल्या पैश्यात खोबऱ्याचे व साखरचे हार प्रत्येकाला एक-एक मिळेल असे घ्यायचो आणि उरलेल्या पैश्यात रंग घेत असू. होळीच्या सायंकाळी आम्ही सर्व मित्र मारोतीच्या पाराजवळ जेथे होळी तयार केलेली असायची तेथे जमा व्हायचो. वेगवेगळ्या नावाने मग बोंबा मारायचो. गावातील मानकरी वाजत गाजत येऊन होळी पेटवायचा. आम्ही होळीतील जाळ घरी नेऊन छोटी होळी करायचे आणि त्यात खोबरा व हरभरा भाजून खायचो. मग रात्री जेवताना पूरणपोळी आणि कढीची मजा काही औरच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाटच पाहत असू. सकाळपासून मग मित्रामध्ये रंग खेळण्याची मजा यायची. कोणी कोणास ओळखू येणार नाही एवढा रंग लावले जायचे. दुपारपर्यंत रंग खेळून झाल्यावर स्नान करून मग घरातच बसायचो. आज परत ते सर्व दिवस आठवू लागले. ते मित्र परत दिसू लागले. परत एकदा छोटे व्हावे आणि खुप मजा करावे असे वाटते.*धुलिवंदन:-*होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. मनातील राग, द्वेष इत्यादी भावनाना मोकळी वाट करून देण्यासाठी हा सण अत्याधिक महत्वाचा आहे. एकीकडे मुले रंगात न्हाऊन निघतात तर याच दिवशी कुमारिका मुली प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवाळणी करतात आणि त्यांच्याकडून भेट म्हणून धान्य किंवा पैसे घेतात. घरात काम करणारे जे काही कामगार मंडळी असतात ते देखील खुशाली मागतात आणि घरधनी त्यांना खुशाली देऊन खुश करतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. दरवेळी सण येतात नि जातातएकमेकांत प्रेम निर्माण करतातसणाचे महत्व समजून घेतले तरप्रत्येक सण सदा आनंदच देतात.*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून आपणा सर्वाना होळी आणि धूलिवंदनच्या रंगबिरंगी शुभेच्छा.*- नासा येवतीकर, संयोजकफ्रेश मॉर्निंग बुलेटिन 9423625769••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात एकूण किती वन्यजीव अभयारण्य आहेत ?२) ऑस्ट्रेलियाने महिला टी - २० क्रिकेट विश्वचषक कितव्यांदा जिंकले आहे ?३) 'प्रति शिवाजी' कोणाला म्हटले जायचे ?४) भारतातील सर्वाधिक अंडे उत्पादन करणारा राज्य कोणता ?५) सांचीचा स्तूप कोणी बनवला ?*उत्तरे :-* १) ५६५ २) सहाव्यांदा ३) नेताजी पालकर ४) आंध्रप्रदेश ५) सम्राट अशोक*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 अशोक दगडे, सरपंच, चिरली👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर👤 मीनल आलेवार👤 श्रीकांत संतोष येवतीकर👤 अविनाश गायकवाड👤 कैलास वाघमारे👤 राजकुमार कांबळे👤 माधव गोतमवाड👤 सुरेश कटकमवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे। न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥ करी सुखसंवाद जो उगमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.**संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.*         *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळेचे भान ठेऊन व कामाची गती पाहून किती आपण हाती घेतलेल्या कामात किती मेहनत घ्यायची हे आपण ठरवावे.कारण आपल्या कामाचा उत्कृष्ट दर्जा हा वेळ आणि काम यांच्यावरच अवलंबून आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात केलेलं पाप लपत नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment