✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १८९८ : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.● अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.💥जन्म● १८९६ : सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे.● १९३३ : अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर.● १९३२ : व.पु. काळे, मराठी साहित्यिक.💥मृत्यू● १९९३ : सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वाराणसी इथे 1 हजार 780 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पाचं लोकार्पण व पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश केले जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेत 355 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी, 67 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'हाफ तिकीट'मुळे ताई, माई, आक्कांचा प्रवास जोरात; पुणे जिल्ह्यात 3 लाख महिलांनी केला एसटीतून प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *31 मार्चपर्यंत बँकांना राहणार नाही एकही सुट्टी, रविवारीही होईल काम ; आरबीआयने सर्व बँकांना रविवारी शाखा सुरु ठेवण्याचे दिले निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गायिका आशा भोसले यांना सन 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची विजेती. कल्याणच्या वैष्णवी पाटीलवर प्रतीक्षाची मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्महत्या : एक चिंतन*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1469220069871429&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत पुरुषोत्तम काळे ( वपु )*वसंत पुरुषोत्तम काळे, हे मराठी भाषेतील लेखक होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.व.पु.काळे मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार, अशी ख्याती असलेल्या व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणस, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार, असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. ज्या वेळी व.पु.चे निधन झाले. त्याच्या २ वर्षापासून ते एका विचित्र मन स्थितीमध्ये होते. त्यांना निराशा आली होती.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात - व. पु. काळे*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'टायगर कॅपिटल' असे कोणत्या शहराला ओळखले जाते ?२) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार आजही किती टक्के लोक अशुद्ध पाणी पितात ?३) जपानचे पंतप्रधान कोण आहेत ?४) कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप ( मलेरिया ) होतो ?५) आनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला ?*उत्तरे :-* १) नागपूर २) २६ टक्के ३) फुमिओ किशिदा ४) प्लाझमोडियम ५) ग्रेगल मेंडेल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤  चिं. यश जितेंद्र आमटे👤 राजेश बाहे, अमरावती👤 पिराजी चव्हाण, कृतिशील शेतकरी, धर्माबाद👤 सचिन पेटेकर👤 नेताजी चव्हाण👤 अनिल पेंटावार👤 भीमराव भुरे👤 अभिनंदन एडके, धर्माबाद👤 जगदीश उराडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घनश्याम हा राम लावण्यरुपी। महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥ करी संकटीं सेवकांचा कुडावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.**रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.**महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.**"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजूबाजूला असलेल्या आणि एकसारख्याच दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी फरक दिसतो. काही लोक इतिहास वाचवण्यात वेळ वाया घालवतात, तर काही लोक इतिहास घडविण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करतात. या दोघांतील फरक समजून घेणे, आपल्याला ही उपयोगी ठरू शकते. काही लोकांकडे असे काय वेगळे असते ? ज्यामुळे त्या लोकांना इतिहास घडविणे शक्य होते, या प्रश्नाचे उत्तर शोधावेसे वाटत असतेच. शांतपणे कधीतरी समजून घेतले पाहिजे. डोबळमानाने एक मानाने एक बाब एकसारखी दिसते म्हणजे, त्या काही लोकांमध्ये जिद्द आणि चिकाटी भरपूर असते, तेच लोक इतिहास घडवत असतात. शिवाय, तो दृढनिश्चय टिकवून ठेवणे आणि विकसित करणे, हे खूप कठीण काम ते करत असतात, कारण तीच योग्य पद्धत असते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे लोक इतरांपेक्षा यशस्वी झालेले दिसतात. ते लोक कधीकधी इतरांवर रागावलेले असतात. हा राग येणेदेखील आपल्यासारखेच असते. पण एक छोटासा फरक असा असतो की, या काही लोकांनी त्यांना आलेल्या रागाचे रूपांतर हे संकल्पात केलेले असते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक डोळा असलेले हरीण*        एका  हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,'   या विश्वासाने चरत असे ,  पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी ,  होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला.   मरतांना हरीण मनात म्हणाले ,  " अरेरे !  ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला."         *_🌀तात्पर्य_ ::~*    *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment