🔰🌸🔰🌸🔰🌸🔰 *🌷🌷जीवन विचार*🌷🌷 *〰〰〰〰〰〰〰* मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही. सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात. पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते. मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण संतानी दिली... *संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"* अर्थः माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.नावेतील पाण्याने जसा धोका होतो तसा घरातील धन वाढल्याने धोका होतो. माणसाने आपल्या गरजेनुसार धनाचा वापर करावा. पण गरजेपेक्षा अधिक धनाचा संचय करणे म्हणजे ही झाली लोभी प्रवृत्ती. या लोभी प्रवृत्तीपासून जोपर्यंत माणूस दूर होत नाही तोपर्यंत तो समाधानकारक जीवन जगू शकत नाही. 〰〰〰〰〰〰〰 *'आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.'* 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *🙏शब्दांकन/संकलन*🙏 *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे).* जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड.

No comments:

Post a Comment