*हुरहूर*
दि.१५-१२-२०१९
मन माझे दुःखी झाले
हूरहूर तुझ्या भेटीची
आस लागूनी जीवा
मला चाहूल तुझ्या येण्याची
तुच माझा सखासोबती
तुझ्यावीन नाही माझी
जीवन जगण्याची गोडी
तुला पाहते मी माझा नजरेतूनी आणि विसावते थोडी
तुझ्या आठवणीची हुरहूर
लागुनी भास होतो मजला
येशील काय माझा स्वप्नात
देशील काय साथ तु अशी मजला
〰〰〰〰〰〰
प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जिल्हा नांदेड
No comments:
Post a Comment