✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *भारतीय लष्कर ध्वज दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ◆ १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार. ◆ १९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या. ◆ १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर. 💥 जन्म :- ◆ १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १२५४ - पोप इनोसंट चौथा. ◆ १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा. ◆ १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट. ◆ २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसर्‍या माळ्यावर राहत होते. २२ वर्षे येथे त्यांचे वास्तव्य होते. हे निवासस्थान देखील राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताने भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बहुचर्चित सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना क्लीनचीट, नियमबाह्य व्यवहार झाले नसल्याचं शपथपत्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एसीबीने सादर केलंय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर भीमसागर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *माथाडी कामगारांच्या ठेवींवर बँक अधिकाऱ्यांचा डल्ला, 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, तब्बल 50 हजार माथाडी कामगारांच्या आयुष्याच्या पुंजीवर बँकांमधील अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. माथाडी कामगारांच्या ठेवी बँकेतील अधिकाऱ्यांन परस्पर इतर खात्यांवर वळवल्याचा आरोप होत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हैदराबाद प्रकरणातील चार ही आरोपी पोलिसांच्या एन काउंटर मध्ये ठार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताच्या एकोणवीस वर्षाखालील विश्वचषक संघात निवड झालेल्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांचा दादर युनियन स्पोर्टिंग क्लबच्या वतीने भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद येथे वेस्ट इंडिज आणि भारत यातील पहिल्या T-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा विकेटनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *स्मार्ट बॉय : काळाची गरज* मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_35.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌳 *बोन्साय* 🌳 ***************** जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात. वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो. अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्‍या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो. बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते. बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात. एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचा किती टक्के समावेश असावा ?* 75 % 2) *शाळा व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतो ?* मुख्याध्यापक 3) *शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोणामधून निवडला जातो ?* पालकांमधून 4) *शाळा व्यवस्थापन समितीची महिन्याला किमान किती बैठक होणे आवश्यक आहे ?* 1 5) *शाळा व्यवस्थापन समितीचा ध्येय कोणता ?* शाळेचा सर्वांगीण विकास *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनंजय शंकर पाटील, सोलापूर 👤 साईनाथ जायेवाड, येवती 👤 भीमाशंकर बच्चेवार 👤 मनोज मनूरकर 👤 बाळासाहेब तांबे 👤 आश्विन जैस्वाल 👤 संतोष अनालदास *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या भोवती पसरलेला अथांग निसर्ग शत-शत पावलावर आपणांस आनंदाचे झोके देत असतो. डोंगराळ, खडकाळ प्रदेशातून खळखळ वाहणारा शांत निर्झर काय, सप्तरंगाने आकाशाला गवसणी घालणारा इंद्रधनुष्य काय, आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारे उंचच उंच वृक्ष काय किंवा काळ्याकुट्ट ढगाला लागलेली रुपेरी किनार काय, हे सर्व पाहून कोणाला वेड लागणार नाही? नव्या तेजाने, नव्या ज्ञानाने , नव्या सौंदर्याने आंणि नव्या चैतन्याने निसर्ग सतत बदलत असतो. तो सतत आम्हांस काही तरी नवीन सांगत असतो. ते आपण नीट समजून घेतले पाहिजे.* *आपण विनाकारण निराश, दु:खी, अशांत, बेचैन, त्रस्त होण्यात काय अर्थ आहे? त्यासाठी निसर्ग हाच आपला गुरू आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे. अहंकाराचा मोती होऊन कोणा राजाच्या मुकुटात चमकत राहण्यापेक्षा कमल पत्रावरील अस्मितापूर्ण दवबिंदू होऊन एखाद्या तहानलेल्या चिमणीच्या तोंडात पडण्यात केवढा मोठा आनंद आहे ! म्हणून निसर्गातील चैतन्याचा स्फुल्लिंग मनी बाळगावा आणि आपल्या ध्येयपूर्तीची स्फूर्ती मस्तकी धारण करावी. मगच जगण्यात आनंद आहे असे वाटेल. जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमिका आहे हे समजले तरच जीवनातील 'आनंदाचे डोही आनंद तरंग' निर्माण करण्याची इच्छा बळावेल. स्वत: चंदनासारखे झिजत झिजत इतरांना सुगंधित करून सोडण्यात आपल्या जीवनाचे सार्थक आहे.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *सायंकाळी कॉटवर जरा आडवा झालो आणि कानी घेताच सकाळ स्मार्ट सोबती मधील 'चिटवूमन' या जिगरबाज लेखावर नजर गेली.* *जो हो गया उसे सोचा नही करते,* *जो मिल गया उसे खोया नही करते,* *हासिल उन्हे होती है सफलता,* *जो वक्त और हालात पर रोया नहीं करते.* *अस जन्मतःच अपंगत्व घेऊन आलेली अमेरिकेची अँमी मलिन्स हिने आपल्या मनात कुठलाही किंतु न ठेवता उत्कृष्ट मॉडेल,नावाजलेली* *अभिनेत्री, जिगरबाज खेळाडू अशी अनेक* *बिरूदे लावून सर्व अशक्य गोष्टी करून जगाला नवा संदेश दिला.* *मलिन्सच्या स्वप्नांना मर्यादाच नव्हत्या.* *वयाच्या पहिल्या वर्षीच आईबापाने तिचे गुडघ्यापासून खालचे पाय कापून टाकले कारण ते वाढणारच नव्हते. आणि मग आयुष्य कस* *जगायचं हा मोठा प्रश्न.पण शक्य नाही ही गोष्ट मलिन्सच्या कानाला आणि मनाला* *तिने कधीच शिवू दिले नाही .* *प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत राहिली.आणि* *अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवर आयडॉल बनली.* *या जगण्यावर* *सुरेश भटांच्या सुंदर ओळी..* *आठवल्याशिवाय राहत नाही---* *आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !* *रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे.!* *काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !* *उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !* *जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.* *"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,* *कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"...* *मलिन्स सारख कानाला अशक्य शब्द ऐकू देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दगडाने कधीच कुणाजवळ हट्ट केला नाही.जिथे आहे मी तिथे चांगलाच आहे.कुठेही ठेवा पायरीवर ठेवा,उंबरठ्यावर ठेवा,घराच्या मुळव्यामध्ये ठेवा, ओट्यावर ठेवा, देवाच्या पायाखाली ठेवा, मूर्तीरुपात ठेवा किंवा स्मारकात ठेवा,पण मला कसल्याही प्रकारचा कमीपणा नाही.माझा सा-यांनीच कुठे ना कुठे उपयोग केला आहे.त्यामुळे माझं अस्तित्व कुठे ना कुठे असल्यामुळे मला सा-यांनीच मान सन्मान केला असल्यामुळे मी दगड जरी असलो तरी माणसांच्या हृदयात माझं कुठं ना कुठं तरी स्थान आहे.माझी किंमत सा-यांनीच केली आहे.जर मी दगड नसलो असतो तर मला देवत्वही प्राप्त झाले नसते.मानवाच्या प्रत्येक गोष्टीसाठी हजर राहून सगळ्यांना आपलेसे झालो आहे.ज्याप्रमाणे एखादा दगडासारखा माणूस जरी असला तरी तो कुठे ना कुठे इतरांच्या मदतीला धावून जातोच.शेवटी माणूसही आपापल्या भावना ओळखून इतरांच्या मदतीला जातच असतो.दगडासारखा दगड भावनाशून्य असतानाही आपण त्याला उपयोगात आणतो तर माणूस म्हणून इतरांच्या मदतीला प्रसंगानुरूप मदतीला धावून जाणे आणि आपले जीवन कारणी लावणे हे देखील दगडाइतकेच कामाला आल्यासारखेच आहे.हा परोपकारी विचार प्रत्येकाने करायला हवा मग कुठे ना कुठे कुणाच्यातरी हृदयात आदराचे निश्चितच स्थान मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा* एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!'' तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment