✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. ● १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला. ● १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली. ● १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. ● १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले. ● १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब. ● १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. ● १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार. ● २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 💥 जन्म :- ● १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी ● १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. ● १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह  ● १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम  ● १९७८: हिंदी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख 💥 मृत्यू :-  ● १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष. ● १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. ● १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान. ● १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर  ● २०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला ● २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हिंसक आंदोलनाला आळा घाला. तसेच फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवा त्वरीत रोखा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालायने राज्यांना दिल्या आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *फडणवीस सरकारने त्यांच्या कार्यकाळात घेतलेले दोन महत्वपूर्ण निर्णय रद्द करण्यासाठी ठाकरे सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवड आणि चार प्रभाग पद्धतीचा समावेश आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रिलायन्सने २५ हजार कोटींना विकला जिओचे टॉवर रिलायन्स इंडस्ट्री जिओचे टेलिकॉम टॉवर अॅसेट्स कॅनडाच्या ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स एलपीला विकणार असल्याची घोषणा केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिकमध्ये डिझेल अभावी एसटी महामंडळाची सेवा ठप्प झालेली आहे. नाशिकच्या आगार क्रमांक 1 मध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटीच्या 100 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड २०१९ या सौंदर्य स्पर्धेचा किताब जमॅका टोनी एन सिंग हिने पटकावला आहे. लंडनमध्ये मोठ्या दिमाखात हा झगमगता सोहळा पार पडला. सौंदर्यवतींच्या या स्पर्धेत भारताची कन्या सुमन रावने सेकेन्ड रनर अप होण्याचा मान मिळवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या क्रमवारीनुसार कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली फलंदाजीत तर टीम इंडिया संघाच्या यादीत अव्वल स्थानी आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *63व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन पुण्यात होणार असून पुण्यातील बालेवाडी येथे 2 ते जानेवारी मध्ये कुस्तीच्या लढती रंगणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *एक राष्ट्र : एक रेशनकार्ड*      http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_4.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मनुष्यप्राण्याचे मूळ* 📙 ************************** प्रत्येकाला आपल्या पूर्वजांबद्दल एक गूढ आकर्षण असतेच. मग समस्त शास्त्रज्ञांना मानवजातीच्या मुळाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत राहिले, तर त्यात नवल ते काय ? पृथ्वी कशी निर्माण झाली व माणूस कसा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा कधीही व कुठेही रंगतच जाते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सध्याचे निष्कर्ष सांगतात की, पूर्व आफ्रिकेच्या भागात चाळीस लाख वर्षांपूर्वी आदिम मानवाचे वास्तव्य होते. एकूण चार विविध टप्प्यांतून सध्याच्या होमो सेपियन्स या मानवजातीची उन्नती होत गेली आहे. होमो सेपियन्स म्हणजे 'शहाणा माणूस'. ते चार टप्पे असे, १. *ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस* २. *ऑस्ट्रेलोपिथेकस रोबस्टस* ३. *होमो इरेक्ट्स* ४. *होमो सेपियन्स* अंदाजे अडीच लाख वर्षांपूर्वी सध्याचा मानवप्राणी सध्याच्या स्वरूपात उत्क्रांत झाला असावा. प्रथम आफ्रिकेत वास्तव्य असलेला मानवप्राणी हळूहळू समशीतोष्ण व थंड हवामानाकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्थलांतर करू लागला. जसजसे स्थलांतर पसरत गेले, तसतसे हवामानातील घटकांनुसार रंग, ठेवण, शरीराची जडणघडण यातही बदल होऊ लागले. उत्तरेकडे ज्या जाती पसरल्या, त्यांना 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागवण्यासाठी अधिक सूर्यप्रकाशाची गरज पडू लागली. सूर्यप्रकाश तर कमी होता. मग कातडीखालील रंगद्रव्यांची निर्मिती हळू हळू कमी होत कातडीतील काळेपणा कमी झाला. याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशाला ज्या प्रदेशात तोंड द्यावे लागते, अशा पूर्वेकडच्या लोकांची गालांचे खाडे उंचावून डोळे मिचमिचे व बारीक होत गेले. कायम बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या मंडळींना अधिक उबेची गरज असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चरबी वाढून उघड्या चेहऱ्याच्या संरक्षणाची निसर्गत: सोय झाली. बर्फाळ प्रदेशातील लोक गुबगुबीत चेहर्‍याचेच का, याचे उत्तर यामुळेच मिळते. माणसाचे स्थलांतर पृथ्वीवर कसे झाले, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशातून प्रथम उत्तरेकडील भागात, नंतर पूर्वेकडील भागात मानव हळूहळू पुढे सरकत राहिला. युरोपमधील मोजका भाग व्यापून संपल्यावर आशिया खंडांकडे त्याचा मोर्चा वळला. सैबेरियातील काही भाग त्या काळी बर्फामुळे अलास्काच्या भागास जोडलेला होता. अतिशीत अशा या भागातून उन्हाळ्याच्या काळात बहुधा अमेरिका खंडात माणसाचा चंचुप्रवेश झाला. अलास्कापासून मग खाली उतरत उतरत त्याने सर्व अमेरिका खंड व्यापले. पॅसिफिक समुद्रातील मोजकी बेटे सोडली तर मानवाने सारे जग कित्येक हजार वर्षे व्यापलेलेच आहे. या बेटांवरील वस्ती मात्र जेमतेम सात आठ हजार वर्षांतली असावी. आपण जेव्हा विविध संस्कृतींचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरची वर्षे असतात हजारांत. मानवी मूळ शोधतानाची वर्षे आहेत लाखांत, हे येथे पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. या लाखो वर्षांबद्दलचा पुरावा कुठल्याही लिखित स्वरूपात तर आपल्या हातात नाहीच. जे निरनिराळ्या अवशेषांतून हाती लागत आहे, त्यातूनच आपण उलगडा करून इतिहासाची पाने उलटत जातो. मानवी वस्ती जगभर पसरत गेली, स्थायिक होत गेली; पण प्रत्यक्ष शेतीची लागवड करण्याची सुरुवात मात्र जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वीच झाली. या लागवडीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतराची दिशा या वेळी भारत, मध्य आशिया ते युरोप व खाली उत्तर आफ्रिका अशी उलटी होती. ती लाट आफ्रिका खंडात जेव्हा पोहोचली, तेव्हा त्याआधीची कित्येक हजार वर्षे अस्तित्वात असलेली मूळ जात पुन्हा दक्षिणेकडे ढकलली गेली. सध्याची बांटू ही जात म्हणजे मूळ आफ्रिकन वास्तव्य केलेली मानवी जात समजली जाते. *"सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *प्राणवायू तयार करण्याच्या क्रियेत उत्प्रेरक म्हणून कोणता पदार्थ वापरतात ?* मॅग्नीज डायऑक्साईड 2) *PTI चे विस्तारित रूप काय ?* Press Trust of India 3) *भारताची राष्ट्रीय दूरचित्रवाणी कोणती ?* दूरदर्शन DD National 4) *भारताचे राष्ट्रीय सूचनापत्र कोणते ?* श्वेतपत्र 5) *'राजकवी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?* भा. रा. तांबे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤डॉ. सुधीर येलमे, संपादक 👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद 👤 केशव कदम 👤 नारायण मुळे, धर्माबाद 👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी 👤 दिगंबर बेतीवर, नांदेड 👤 डॉ. प्रदीप आवटे, साहित्यिक 👤 विजय होकर्णे, वृत्तपत्र छायाचित्रकार 👤 जितेंद्र वल्लाकट्टी 👤 रामचंद्र नागनाथराव पाटील बन्नाळीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण नेहमी खरं बोलावं, असं म्हणतो. मग माणसं खोटं का बोलतात? स्वार्थासाठी! स्वत:ला लपविण्यासाठी! खरं ते झाकण्यासाठी! जितकं आपण स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करू तितकं आपण केव्हा ना केव्हा तरी समाजापुढं चक्क उघडं पडु शकतो. अनेक माणसं बोलताना 'मी म्हणतो तेच खरं' असं ठासून म्हणतात; परंतु 'खरं तेच माझं' म्हणणारी माणसं फारच कमी असतात. दहा वेळा खोटं बोललं की, लोकांना ते खरं वाटतं; पण खरं तेच केव्हातरी उघडकीस येतं. आपण स्वत: जसे असाल तसे समाजपुढे दिसावे हे चांगले असते. परंतु आपण स्वत: जसे नसतो तसं समाजापुढं दिसावं हे काही चांगलं नाही.* *आपण नेहमीच खोटं बोलावं आणि समाजापुढं आपण नेहमीच खरं बोलतो असं भासवावं हे काही भल्या माणसाचं लक्षण नाही. आपण नेहमीच स्वार्थीपणानं जगावं आणि आपण नेहमी नि:स्वार्थीपणानं जगतो असं समाजापुढं भासवावं हे काही सभ्य माणसाचं लक्षण नाही. आपण एकदा का खोटं बोललो की, ते लपविण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं. खोट्याला अनेक वाटा असतात. ख-याला मात्र पर्याय नसतो. खोटं बोलणं खोट्या पैशासारखं असतं. खरं बोलणं बंध्या रूपयासारखं असतं. खरं ते खरंच असतं आणि खोटं ते खोटंच असतं, हे काळच उघडकीस आणतो. म्हणून 'सत्य' हाच आपल्या जीवन यशाचा खरा सोबती समजला पाहिजे. 'सत्य' हेच आपल्या जीवनवैभवाचं खरं रहस्य समजलं पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *चूक भूल देणे घेणे हा नियम आयुष्यात ज्यांना जमला त्यांना जीवन कळले अस मी म्हणेन.* *वाधीसाठी म्हैस मारणारी माणस अनेक बघितली पण सगळ्या चुका पोटात घालणारी आईसारखी दुसरी व्यक्ती शोधून सापडणं कठीण आहे.* *माणस समजून घ्यायला शिका.* *एक ताई बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटी कापत होती.* *अचानक तिला बटाट्याच्या वरिल बाजुला छिद्र पडलेले दिसले. तिने* *विचार केला की बटाटा खराब झाला आहे तो फेकून द्यावा. पण तिने तो फेकून न देता खराब झालेला तेव्हढा* *भाग कापून फेकून दिला.पुन्हा पाहिले असता अजून* *थोडा भाग खराब दिसला.* *तिने तो भागही कापून फेकून दिला. उरलेला बटाट्याचा अर्धा* *भाग कापून भाजीत टाकला. किती चांगली विचारसरणी आहे, 70* *पैशांचा बटाटा आपण किती ध्यान देऊन* *कापतो. जो भाग खराब आहे तो* *कापून फेकून देतो. उरलेला भाग* *स्विकारतो. खुप चांगलं आहे हे. मात्र* *दुख या गोष्टीचं आहे की,आपण माणसाबाबत एव्हढे कठोर का वागतो ? आपल्या जवळच्या एख्याद्या माणसाबाबत एक चुक दिसली तर त्याच्या पुर्ण व्यक्तीमत्वाला आपण कापून फेकून देतो.* *त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. आपण फक्त आपल्या अहंकारासाठी,मी पणासाठी त्याच्यासोबतचे प्रत्येक नाते तोडतो. मग एकच प्रश्न पडतो की,आपल्या जवळच्या माणसाची किंमत सत्तर पैशांच्या बटाट्यापेक्षाही कमी आहे का ?* *या छोट्याशा गोष्टीचा जरूर विचार करा. आणि आपल्या जवळच्या* *अमुल्य माणसांना लहान लहान चुकांसाठी जीवनातून वेगळे* *करु नका.* *माणूस म्हणुनी जन्मा आलो,माणूस* *म्हणुनी जगेल मी,हे* *तत्व अमलात आणा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निस्वार्थी दानधर्म* हजरत उमर आपल्‍या रयतेची खूप काळजी घेत असत. ते स्‍वत:ची व आपल्‍या परिवाराची चिंता नकरता जनतेचे दु:ख निवारणार्थ झोकून देत. एका प्रसंगाची गोष्‍ट आहे, काही कारणाने राजधानीत आग लागली, आग इतक्‍या वेगाने पसरली की तिने शहराचा अर्धा भाग व्‍यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले पण आग आटोक्‍यात येण्‍याची काही चिन्‍हे दिसेनात. हजारो लोकांची घरे, दारे, पिके सगळे जळून खाक झाले. मनुष्‍यहानीही मोठया प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरतच चालला. आगीचे लोळ भडकत चालले. शेकडो घरे आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडत होती. जनतेला एकाच भयाने ग्रासले होते. आग आटोक्‍यात कशी आणायची कशी, आग विझत नसल्‍याने लोकांनी हजरत उमरला उपाय विचारले, तेसुद्धा आग विझविण्‍यात तनमनधनाने व्‍यग्र होते. उमरनी लोकांना सांगितले, ''ही आग म्‍हणजे खुदाचा कोप असावा, तुम्‍ही लोकांनी आता आग विझविण्‍यासाठी पाणी टाकण्‍याचे काम सोडा, गरिबांना अन्नदान करा. कदाचित खुदा यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली सुटका करेल.'' जनतेतील लोक म्‍हणाले,''हजरत साहेब आपण धर्मादाय संस्‍‍थेचे सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले आहेत. कोणीही गरीब आमच्‍याकडे आला तर आम्‍ही त्‍याला दान करतोच. मग आमच्‍यावर तो नाराज कसा'' हजरत उमरने समजावले,''तुम्‍ही जे दान करता त्‍यामागे निष्‍काम भावना नाही. तुम्‍हाला वाटते दानाचे पुण्‍य तसे मिळत नसते. हजरत उमरच्‍या खुलाशानंतर जनतेने आपली चूक सुधारली अन आश्‍चर्य म्‍हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने खुदाचे व हजरत साहेबांचे आभार मानले. तात्‍पर्य :- नि:स्‍वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्‍या अंतरआत्‍म्‍यापर्यंत पोहोचते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment