✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *होळीनिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा*   *जागतिक चिमणी दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १६०२-डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १९१६-अल्बर्ट आईनस्टाईन ने सापेक्षवादाचा सिंद्धान्त प्रसिद्ध केला १७३९ - नादीरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली. १९२७-महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली. १९५६-ट्युनिशियाला फ्रांस कडून स्वातंत्र्य मिळाले. 💥 जन्म :- १७२५ - अब्दुल हमीद पहिला, ऑट्टोमन सम्राट. १९२०-वसंत कानेटकर, नाटककार १९६६-अल्का याज्ञीक ,गायिका १९८७-कंगना राणावत ,अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९२५- लॉर्ड कर्झन, ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी व्हाइसरॉय १९३४ - एम्मा, नेदरलँड्सची राणी. १९५६-बाळ सीताराम मर्ढेकर,कवी. २००४ - जुलियाना, नेदरलँड्सची राणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली नेमणूक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या प्रक्षेपणावर बंदी आणणे अशक्य; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने 76 परीक्षा पुढे ढकलल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *भंडारा - गोदिंया लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल. तर २६ जणांनी ५५ अर्जांची केली उचल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लष्कराचे जवान विजय कुमार, सीआरपीएफचे हवालदार प्रदीप कुमार पांडा यांचा होणार कीर्ती चक्रानं सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय)  आयपीएलच्या  साखळी फेरीचे वेळापत्रक केले जाहीर, त्यानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमान सात सामने खेळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डिजिटल शाळा : जबाबदारी कुणाची ...?* वरील लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/blog-post_21.html स्तंभलेखक नासा येवतीकर 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *जागतिक चिमणी दिवस*  भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.तीला भारतात तपकीर असेही म्हटले जाते. हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभरसर्वत्र आढळतो. तसेच  बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका,  म्यानमारसह इतरही देशांत आढळतो. भारतात काश्मिरी आणि वायव्यी अशा हिच्या किमान दोन उपजातीही आढळतात. माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली. त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली. चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत् चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. २० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. या काळात चिमणीची संख्या कमी होत आहे. (इंटरनेट वरून साभार )       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रार्थनेमुळे देव बदलत नाही ; तर ती प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रात गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे ?* गोदावरी 2) *सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?* पूर्व 3) *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो ?* 8 सप्टेंबर 4) *भारताचे विदेशमंत्री कोण आहेत ?* मा.सुषमा स्वराज 5) *जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करतात ?* 20 मार्च *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा, गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  योगेश राजापूरकर •  रामदयाल राऊत •  गणेश गुरूपवार •  नागेश चिंतावार •  मनोहर राखेवार •  गंगाधर अडकीने •  रमेश कोंडेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *होळी* राग लोभ मत्सराची चला होळी करू या सत्याकडे जाणारा चला सन्मार्ग धरू या राग लोभ मत्सर सारा होळीत जाळला पाहिजे जीवन जगायचे तर सन्मार्ग धरला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कित्येकदा आपण ऐकतो की, 'त्यावेळी जरा चुकलंच, मी असा निर्णय घ्यायला नको होता, पण काय करणार ? वेळ निघून गेली होती' वगैरे. निर्णयक्षमता वाढविण्यासाठी विचारक्षमता वाढली पाहिजे. मन निर्विकार हवे. तरच एखादा प्रश्न उभा राहिला तर त्याकडे त्रयस्थपणे बघता येईल. ही निर्णयक्षमता वाढणार कशी? मन काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या षडरिपूंनी ग्रासलेले आहे. परमेश्वराने मनुष्य घडवला, त्याला मन, बुद्धी दिली आणि सोबत संघर्षाची पुरचूंडी. शारीरीक क्षमतेच्या जोरावर कोणताही प्रश्न सोडवता येतो, हा भ्रम असून बुद्धीच त्यातून मार्ग काढू शकते याची समज येण्यासाठी मन शांत, कणखर आणि निर्वीकार हवं.* *षङरिपूत माणसाला उध्वस्त करण्याची ताकद असते. ते बुद्धीला जवळपासही फिरकू देत नाहीत. जेव्हा अशा उध्वस्त करणा-या घटना घडतात, त्या एका क्षणाच्या अविचाराचे परिणाम असतात. अशा निर्णायक क्षणी हमखास एखादे प्रलोभन, एखादी संधी, एखादा प्रसंग, एखादी घटना अशी घडते की निर्णय घेण्याची क्षमता चुकीच्या दिशेने वळते, आणि तो क्षण आयुष्यभराचे नुकसान करतो. शांत, धीर गंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.*      ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••              🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    कबीरा ते नर अन्ध है, गुरु को कहते और ।  हरि रूठे गुरु ठौर है,  गुरु रुठै नहीं ठौर ॥ अर्थ:         महात्मा कबीर गुरूंची महत्ती सांगताना म्हणतात की जो माणूस  गुरुचे जीवनातील महत्व  जाणत नाही , जो गुरूचा अनादर करतो. तो डोळे असूनही आंधळाच समजला पाहिजे.  कठीण समयी आपणास देव व दैवाची साथ मिळत नसली तरी आपणास  त्या कठीण व नाजूक अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरूच मदत करीत असतात. जर का गुरूनेच साथ सोडली तर मात्र भूतलावर कोणीही साथ देत नाही. कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्गच  गुरूपासून सुरू होतो, तर गुरूकडे जाण्यासाठी  ईश्वराची मदत घ्यायची गरज असतेच कुठे ?  मात्र ईश्वर जाणायचा असेल तर गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे. दाखलेच पाहायचे झाले तर  इथल्या व्यवस्थेनं ज्याचं शिक्षण नाकारलं, त्या महाभारतातील एकलव्याचं उदाहरण पहा. गुरूचा पुतळा करून त्याच्यासमोर स्वयं अध्ययनाचे धडे गिरवून सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून लौकिकास पात्र होतो. रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र दत्त ही गुरू शिष्याची जोडी पाहता विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणार्‍या नरेंद्राला अध्यात्माचा बोध देवून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे विवेकवादी भारतीय तत्त्वज्ञान जगाला  देणारा नरेंद्राचा विवेकानंंद  परमहंसानी घडवला. हे गुरूचं अदृश्य सामर्थ्य असतं. आदर्श विद्यार्थी एकलव्याचं शिक्षण नाकारणं, इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या धर्माच्या ठेकेदारांनी विवेकानंदांच्या  भाषणाला विरोध करणं ही इथल्या व्यवस्थेच्या तोकडेपणाचीच उदाहरणे  म्हणावी लागतील.        गुरू मात्र आपल्या शिष्याला मजबुतीनं उभं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हे विसरून कसं जमेल.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात सातत्याने करत असलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश हे तुमच्या मनाला समाधान देणारे आहे.प्रयत्नातून मिळालेला आनंद हा तुमच्या जीवनात अधिक महत्वाचा आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590 🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना पाविजे सर्वही सूख जेथे। अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥ विविकें कुडी कल्पना पालटिजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *चढ आणि उतार* आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.' बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते. थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले. त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...' *तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment