*माँ जिजाऊ*
🚩🚩🚩🚩🚩🚩
जाधव घराण्याची लेक
भोसले घराण्याची सून
स्वराज्य स्थापनेसाठी
झटली मनापासून...
राजमाते तुझ्या जन्मदिनी
नतमस्तक मी चरणी
तुला कोटी कोटी अभिवादन
तुझेच नाव आज मनोमनी..
राजा शिवबाची आहेस
तु माता आणि शिल्पकार
स्वातंत्र्याची जननी आणि
स्वराज्याची निर्मितीकार...
जीवनाच्या लढाईत दुःखाचे
तू चटके फार सोसीयले
शिवबाला रयतेचा राजा
तु बालपणीच बनविले..
एकच मागणी आजच्या दिनी
एकच आकांक्षा मनातूनी ..
शिवबा सारखा पुत्र यावा
प्रत्येकाच्या घरातूनी..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
✍ *श्रीमती प्रमिला सेनकुडे*
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
No comments:
Post a Comment