*काटेरी कुंपण*
काटेरी निवडूंग असले जरी
निसर्गातील तेही वाटेकरी
मोहक फुले येती त्यासी
संरक्षण करते जणू पहारेकरी
पर्णास धारदार काटे
दिसते जरी सूईवानी
असे काटे रुततील
कर तया लागतील
पानाफुलांनी सजलेले
निवडूंग जरी काट्यातले
रक्षणकर्ते फुले बळकट
कुंपनापरी भासे मळवट
〰〰〰〰〰〰
✍ ®प्रमिला सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड
☘☘☘☘☘☘☘
No comments:
Post a Comment