✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८६५ - लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील. १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल. १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष. १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक. 💥 मृत्यू :- १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक. १९८९ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. १९९६ - बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे. १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जयपूर - राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूचे थैमान, महिनाभरात 72 मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर, १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी दिली प्रशासकीय मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मेळघाटात गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जळगाव : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सन 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणार, एक न्यायमूर्ती अनुपस्थित असल्याने लांबणार सुनावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : दमदार खेळ करत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेलवर मात करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे पटकावले विजेतेपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद वर चार सामन्यांची बंदी, चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कथा व्यसन* आज सगळं गाव दु:खात बुडालं होत. हळहळ व्यक्त होत होती. बापाच्या सरणाला पोराने विस्तू लावण्याऐवजी आज पोराच्या सरणाला बाप विस्तू लावीत होता हे चित्र गावातील लोकांना देखवत नव्हते. परंतु काळासमोर कोणाचे चालते, जे व्हायचं ते होऊनच राहते. अखेर आबा पाटलांच्या मुलाने पहाटे पहाटे झोपेतच दम तोडला. वर्षभर खाटल्यावरच होता, आज जाईल ................ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आर. व्यंकटरमण* माजी राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचा जन्म २५ जुलै १९१0 रोजी तामिळनाडूतील पट्टूकोट्यय येथे झाला. ते भारताचे ८ वे राष्ट्रपती होते. १९८७ ते १९९२ पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर होते. त्यांनी मद्रास विद्यापीठातून स्नातकोत्तर शिक्षण घेतले. तिथेच त्यांनी कायद्याचे शिक्षणही घेतले. मद्रास उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ते सहभागी झालेत. १९५७ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मद्रास सरकारमध्ये मंत्रीपद ग्रहण केले. त्यांनी उद्योग, समाज, परिवहन, अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले. १९६७ मध्ये त्यांना योजना आयोगाचे सदस्य नियुक्त करण्यात आले. १९७७ मध्ये ते लोकसभेत निवडून आले. इंदिरा गांधी सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री बनविण्यात आले. १९८४ मध्ये ते देशाचे उपराष्ट्रपती बनले. त्यांनी इंदिरा गांधी शांती पुरस्कार व जवाहरलाल नेहरू पुरस्कारही मिळाला. २५ जुलै १९८७ रोजी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *१) झाडांच्या किती प्रजाती नाहीशा होण्याच्या वाटेवर आहेत ?* १५०० *२) चिपको आंदोलन कुठून सुरू झालं ?* टिहरी गढवाल *३) छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत ?* ९० *४) 'द विंटर पॅलेस' कुठे आहे ?* रशिया *५) आद्य महाकाव्य कशाला म्हणतात ?* रामायण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीनिवास सितावर ● राजेश अर्गे ● अनिल सोनकांबळे ● सलीम शेख ● राम पाटील ढगे ● सोपानराव डोंगरे ● मोगलाजी मरकटवाड ● कु. चैतन्या माणिक रेड्डी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भान* योजना आखली पाहिजे योग्य भान ठेवून अन् ती राबवली पाहिजे सदा बेभान होऊन भान ठेवून आखलेली योजना सफल होईल बेभानपणे काम केल्यास कोण कसा विफल होईल शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान रतन का जतन कर , माटि का संसार | आय कबीर फिर गया , फीका है संसार || अर्थ : ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्याला हा चक्षू प्राप्त झाला त्याला कशाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. ज्ञान हे मौलिक रत्न आहे. माणूस अंगावर हिरे रत्न माणकांचे किमती ,हार घालून श्रीमंतीचं प्रदर्शन करीत असतो. या दागिण्यांमुळे मानवी शरीर काही काळासाठी झगमगून उठेलही ! सदा सर्वकाळ हे उपहार अंगावर मिरवणं सांभाळणंही कमी का जिकीरीचं असतं ! ज्ञानी मात्र कुठल्याही कृत्रिम आभुषणाशिवाय खुलून दिसतो. सदा सर्वकाळ त्याच्या जगण्यात आत्मविश्वास असतो. संपत्तीची वाटणी होवू शकते. ज्ञान प्राप्त कर्त्याची ती कायम जहागीर असते. ज्ञान अक्षय आहे. त्याला मरण नसते. कुठल्याही फसवणुकीची भीती नसते. बाकी सर्व गोष्टी मातीतून मिळणार्या व मातीशी एकरूप होणार्या नश्वर बाबी आहेत. महात्मा कबीर म्हणतात माणसाने जन्म घेतला की त्याचा मृत्यूही ठरलेलाच आहे. जीवनात ज्ञानप्राप्ती केली नाही. अज्ञानातच चाचपडत राहिला. तर 'सारा जन्म व्यर्थ घालविला.' असं होईल. 'ज्ञानाने उंचावते मान । अपमाना कारण अज्ञान । ' जीवनात काही भरीव काम केलं नाही. तर जगणंच बेचव होईल . जीवनातला आत्मिक आनंद व परमानंद गमावल्यासारखं होईल. म्हणून कार्य तत्पर राहिलं पाहिजे. कार्य प्रवणताच ज्ञानाची कायम अनुभूती देत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो. आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ? जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तल्लीन - Engrossed* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबद्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment