कथा क्रमांक ३३

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 *कथेचे बाळकडू* 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग 33📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ जे होत ते भल होते ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एकदा अकबर आणि बिरबल शिकारीला जात असतात,
 तलवार काढताना अकबराचा अंगठा कापला जातो...

अकबराला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो...
तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणूण शहरात पाठवतो...

तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो,
'' महाराज... शांत व्हा...जे होतं ते चांगल्यासाठीच होतं...''
अकबराला राग 😡येतो...
तो जास्तच चिडतो...
आणि शिपायांना सांगतो
'' जा बिरबल ला घेऊन जा...
रात्रभर उलटं टांगून ठेवा....
आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ''

 शिपाई बिरबलला  तिथून घेऊन जातात....
अकबर एकटाच जंगलात असतो....
तो एकटाच पुढे शिकार करायला जातो...!!

पुढे काही आदिवासी अकबराला पकडून घेऊन जातात,
आणि त्याला डांबून ठेवतात..

अकबराचा बळी ते देणार असतात...
त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात...
तितक्यात एका आदिवासीची नजर अकबराच्या तुटलेल्या अंगठ्याकडे जाते व तो ओरडून सर्वांना सांगतो,
'' हा अशुद्ध आहे... आपण याची बळी नाही देऊ शकत...
याचा अंगठा तुटलेला आहे...''

आदिवासी अकबराला सोडून देतात...
आणि त्याला बिरबलाचं बोलणं आठवतं,
' जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..'

तो धावत पळत त्याच्या महालात येतो, बिरबलला फाशी होणारच असते..
 तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मारतो आणि सर्व हकिकत सांगतो....
आणि म्हणतो,
'' मला माफ कर....
तुझ्यामुळे मी वाचलो...आणि बघ
माझ्यामुळे तुझी काय हालत झाली....''
बिरबल हसतो 😀आणि म्हणतो,
''नाही महाराज.😊...
जे होते ते चांगल्यासाठीच होतं...''
अकबर 😎स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं...?
तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला...
चांगलं कसं झालं ???

त्यावर बिरबल म्हणतो,
'' महाराज...
मी जर तुमच्यासोबत शिकारीला आलो असतो तर त्यांनी माझा बळी दिला असता.....
म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.... ''

तात्पर्य : आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार,
पण लक्षात ठेवा , जे होतं ते चांगल्यासाठीच होतं....
कदाचित पुढे त्याचा उपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल...!
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

बालगीत क्रमांक * 2 *


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
           🎀  *बालगीत*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🌴उंच उंच झाड तुला नाक डोळं हाय
शेंडीवाल्या फळा तुझं नाव सांग रं काय ||धृ||
      🌴आकार तुझा चेंडूवानी
          चटया दो-या विणती कोणी
पाय पुसण्यावरी तुझ्या देतील कुणी रे पाय ||१||
      🌴लग्न मुंज सणावारी
          दिसशी तु घरोघरी
मंदी मंदी काम तुझं काय रं सांग रं हाय ||२||
      🌴बर्फीची ती चव न्यारी
          काप ज्याची त्याच्यावरी
चिवड्यामंदी काप तुझा लाल लाल हाय ||३||
      🌴मंदी रंग चुन्यावाणी
          आत गोड गोड पाणी
तुला बघुनी समदी पोरं करता खाय खाय ||४||
     🌴नाव तु जरी न सांगशी
          शेंडी धरूनी आपटीन
फजीती होईल देवापुढं रडशील धाय धाय
शेंडीवाल्या फळा तुझं नाव सांग रं काय ||५||


☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘🔰

कथा. वाकडे झाड

📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝🍃


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       🎀 *वाकडे झाड* 🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एका अरण्यात* इमारतीला उपयोगी पडणा-या झाडांची लागवड केली होता.ती सगळी झाडे अगदी उंच व सरळ वाढली होता.

   त्यातील फक्त एकच झाड वाकडे होते व ते इमारतीला उपयोगी पडणारे नव्हते. त्यांच्याकडे पाहून इतर झाडे मोठ्याने हसून वेडेवाकडेपणाबद्दल त्याची चेष्टा करत.
        त्या अरण्याच्या मालकाने एकदा नविन घर बांधण्याचे ठरविले व त्यासाठी लाकडाचा उपयोग होइल अशी सगळी झाडे तोडण्याचा हुकूम नोकरांना दिला.

 त्याप्रमाणे नोकरांने ते वाकडे झाड सोडून सगळी झाडे तोडून टाकली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : *ज्या गुणामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तो गुण अंगी नसला तर त्याबद्दल वाईट वाटू नये*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    

पहीला पाऊस (गित)

*"पहिला पाऊस"*


*पहिला पाऊस पडला*
*उज्वल भविष्य पाहूया*
*चला प्रत्येकाने आज*
*एक तरी झाड लावुया*

               *प्रत्येकाला इथे तर*
               *पाहिजे असते सावली*
               *हा विचार नाही करत*
               *किती झाडे लावली*

*आज लावलेलं झाड*
*उद्याचं भविष्य असेल*
*भविष्यात दुष्काळाचं*
*कधी तोंड नाही दिसेल*

               *यावर्षीच तर दुष्काळाने*
               *हालत झाली खस्ता*
               *यापेक्षा मोठा दुष्काळ*
               *सहन होईल का दोस्ता*

*अन्नदाता बळीराजा*
*मेला व्याकुळ होऊन*
*त्यासाठी करू काही*
*ऋण त्याचे उतरवून*

               *विचार ही करवत नाही*
               *कसा असेल भाविष्यकाल*
               *पाण्या अभावी होऊ नये*
               *पुढच्या पिढींचे हाल*

*चला आता सर्व मिळून*
*निर्धार पक्का करूया*
*पहिल्या पावसात आज*
*एक तरी झाड पेरूया*
 🌳🌳झाडे लावा झाडे जगवा🌳🌳

कथाः लग्न

📝🍃📝🍃📝🍃📝🍃
                🎀 *लग्न*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*उंदरामुळे जाळ्यातून*सुटलेला सिंह खुष होऊन त्या उंदराला म्हणाला,' अरे,तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय  हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.

 'ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, 'महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहीजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भिती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी.

' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्यासाठी तुला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली.ती तरूण मुलगी मोठ्या डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य*: *जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे नाहीतर भलतेच मागणे मागीतल्यामुळे संकट निर्माण होईल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 
      ✍

अभंग

!! जय शिवराय !!              !! जय तुकोबाराय !!

        ⛳ तुकाराम महाराजांची गाथा ⛳

              || अभंग - ३१४ ||

मी तों दीनाहूनि दीन ।
माझा तूज अभिमान ॥1॥

मी तों आलों शरणागत ।
माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥

दिनानाथा कृपाळुवा।
सांभाळावें आपुल्या नांवा ॥2॥

तुका ह्मणे आतां ।
भलें नव्हे मोकलितां ॥3॥

           "थोडक्यात अर्थ"

हे पांडुरंगा मि दिनापेक्षा ही दिन आहे. तरी देखील तुला माझा अभिमान वाटतो.

मी तुला शरण आलो आहे. माझे हीत आता तुच करु शकतोस.

तु दिनांचा नाथ आहेस, तु कृपाळु आहेस. तुच तुझी ही किर्ती सांभाळ.

म्हणून तुकोबाराय म्हणतात हे देवा तु जर मला असेच उपेक्षित ठेवलेस तर ते तुला शोभनार नाही.

🙏🙏🙏🙏🙏

नाती जपुन ठेवा

🌹नाती जपून ठेवा स्वार्थ खूप झाला ,थोडी प्रीत पेरा गोफ सैल झाला.🌹

मित्रांनो , माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे . फुलण्यासाठी रोपांना जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते . अनेक पाकळ्या जेव्हा एकसंघ फुलतात तेव्हा एक सुंदर फूल उमलतं . पण त्यातल्या काही पाकळ्या मिटल्या , कोमेजल्या वा गळून पडल्या तर फूल सौंदर्यविहीन , मूल्यहीन होतं . त्याचा जगण्याचा अर्थही संपतो . आपल्या जीवनाचं पुष्पही असंच नात्याच्या पाकळ्यांनी बहरत असतं . त्याची प्रत्येक पाकळी अनमोल असते .

मी पाहिलेली , अनुभवलेली नात्यांची विलोभनीय उत्कटता शब्दांच्या कँमेरातून टिपण्याचा इथं प्रयत्न करतो आहे .

      ||   आई- वडील  ||
सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं
आपल्या घराची जीवित दैवतं
तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर

    || गुरुजन ||
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत

    || आजी - आजोबा ||
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती

  || सासू - सासरे ||
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती
आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप

    || काका - मावशी ||
आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी

     || आत्या - मामा ||
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती

      || मामा ||
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा
आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार

     || मामी ||
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती

     || दाजी ||
आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक

     || बहिण ||
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका
मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका
कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका

     || भाऊ ||
आपल्या हिमतीच्या धमन्या
आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं
आपल्या आवाजातील निनाद

    ||  साडू ||
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं
इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ

     || साली / मेहुणी ||
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी

    || मावस भाऊ बहीण ||
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय

     || मेव्हण भाऊ बहीण ||
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी
थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग

      || भाचे भाची ||
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं

     || पुत्र ||
भविष्याचा प्रकाश
अस्तित्वाचा अर्थ
वंशाचा कुलदीपक
कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी

      || पुत्री ||
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा
जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती

    || नातवंडे ||
 दुधावरली साय
आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट

   || मित्र मैत्री ||
ईश्वरी वरदान
रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं
विश्वासाची आधारशीला
स्वतःचेच प्रतिरुप

   || शेजार धर्म ||
मानवी मूल्यांचा ओझोन
संस्कृतीचा संधीप्रकाश
आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन

    || शिष्य ||
आपल्या कर्तृत्वाचा कळस
आपल्या कौशल्याची किरणं

खरंच , नातं न जोपासणारा माणूस जणू पिसारा गमावलेला मोरच ! नाही का ?