✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जून 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/arsE32NVfrfnZKjc/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.**१९९४:विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.**१९७२:दुसर्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ**१८४६:अॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.**१८३८:इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९५:अस्मिता प्रदीप यंडे-- स्तंभलेखिका**१९७९:प्रा.डॉ.नवनाथ अंगद शिंदे -- लोकसाहित्य,आदिवासी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक,लेखक* *१९७६:जसपाल राणा-- भारतीय नेमबाज**१९७३:विशाल ददलानी-- गायक,गीतकार, अभिनेता आणि संगीतकार**१९७२:मंगेश देेेेसाई-- मराठी चित्रपट कलाकार* *१९७०:डॉ.माधव शोभणे -- कवी,लेखक* *१९७०:मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९६३:वासवदत्ता अग्निहोत्री -- कवयित्री* *१९६२:डॉ.चंद्रकांत वि.जोशी -- कवी,कथाकार,कादंबरीकार,समीक्षक* *१९५६:अंतोन चांगदेव त्रिभुवन -- लेखक**१९५५:डॉ.गिरीश दाबके -- सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९५३:प्रकाश रंगनाथ महामुनी -- कवी,लेखक* *१९५१:डॉ.एस.एम.कानडजे-- प्रसिद्ध समीक्षक* *१९४९:राजीव वर्मा-- भारतीय अभिनेता**१९४४:भगवानदास मूळचंद लुथरिया उर्फ सुधीर-- हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता(मृत्यू:१२ मे २०१४)**१९४०:बालाजी तांबे-- आयुर्वेद,योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ(मृत्यू:१०ऑगस्ट२०२१)**१९४०:मुहम्मद युनूस-- बांगलादेशी सामाजिक उद्योजक,बँकर,अर्थशास्त्रज्ञ आणि नागरी समाजाचे नेते* *१९३७:डॉ.गंगाधर पानतावणे – प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक(मृत्यू:२७ मार्च, २०१८)**१९३४:रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (मृत्यू:१८ जुलै २००१)**१९२८:बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक,महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू:२३ नोव्हेंबर २०००)**१९२२:भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार,कवी (मृत्यू:२८ जून १९९०)**१९२१:नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान,(मृत्यू:२३ डिसेंबर २००४)**१७१२:रुसो – फ्रेन्च विचारवंत,लेखक व संगीतकार (मृत्यू:२ जुलै १७७८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:चंद्रकांत कामत -- बनारस तबला घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय तबला वादक(जन्म:२६ नोव्हेंबर १९३३)* *२०००:विष्णू महेश्वर ऊर्फ’व्ही.एम’तथा दादासाहेब जोग –उद्योजक(जन्म:६ एप्रिल १९२७)**१९९९:रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार(जन्म:१३ फेब्रुवारी १९१३)**१९९०:भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार, कवी(जन्म:२८ जून १९२२)* *१९८७:पं.गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म:३० जानेवारी १९११)**१९७२:प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक,’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म:२९ जून १८९३)**१८३६:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१६ मार्च १७५१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वैचारिक लेख*" पालक नव्हे, मित्र बना ! "*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'इस्रो'चे पाऊल पडते पुढे..! नासाच्या पाठोपाठ आता इस्रो अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात पुढील काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर निवडणुक लढवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोलीत अभूतपूर्व उत्साहात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण:भाविकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *खासदार बनलेल्या महाराष्ट्रातील 8 आमदारांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात नावं वाचून दाखवली !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अहमदनगर आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, ACB च्या कारवाईनंतर आयुक्त पंकज जावळे फरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अरुंधती रॉय यांना ब्रिटनचा 'पेन पिंटर' पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 वर्ल्ड कप मध्ये द. आफ्रिका व भारताचा फायनल मध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 तारुण्य पीटिका (पुळ्या) का येतात ? 📙'तारूण्य पिटीका' या नावावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचा तारुण्याशी संबंध आहे. १४-१५ वर्षांच्या मुला मुलींना तारुण्यपीटिका येतात. काही जणांना त्या कायम होतच राहतात. तारुण्यपीटिका म्हणजेच त्वचेवर येणारे फोड. ते चेहऱ्यावर वा शरीरावर इतरत्र कुठेही येऊ शकतात. त्वचेत काही तैलग्रंथी असतात. त्यातील स्त्रावामुळे त्वचा स्निग्ध राहते. त्यांची रंध्रे बंद झाल्यास त्यातील स्त्राव गोळा होतो व फोड येतात. नंतर जंतुसंसर्गही होतो. या फोडांना तारुण्यपीटिका असे म्हणतात.तारूण्य पिटीका येण्याची अनेक कारणे आहेत. पौगंडावस्थेमध्ये शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) प्रमाणात होणारे बदल, त्वचेची नीट निगा न राखणे, दीर्घ मुदतीचे आजार, कुपोषण, आहारात मेदयुक्त पदार्थांचा जास्त समावेश, बद्धकोष्ठ, तसेच मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे तारूण्य पिटीका होतात. साहजिकच तारुण्यपीटिका उपचारासाठी वरील कारणांवर आधारित अनंत उपाय उपलब्ध आहेत. पण एक लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे शारीरिक अनारोग्याचे व एक वरवरचे लक्षण म्हणजे तारूण्य पिटीका. निरोगी, सुदृढ, मानसिक व शारीरिक दृष्ट्या व्यक्तीला त्याचा त्रास होत नाही. चिंता करण्याने तारुण्यपीटिका अधिकच वाढतात. शारीरिक स्वच्छता, समतोल आहार, जेवणाच्या वेळा, विश्रांती, झोपेच्या वेळा यात नियमितपणा व्यायाम आदी आरोग्यपूर्ण सवयीचा अंगीकार केल्यास या त्रासापासून आपली मुक्तता होऊ शकेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) लोकसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे ?२) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघादरम्यान होणार आहे ?३) CCTV चा full form काय आहे ?४) 'छडा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ? *उत्तरे :-* १) ओम बिर्ला २) भारत व दक्षिण आफ्रिका ३) Closed Circuit Television ४) शोध, तपास ५) १५०० फूट खोल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मार्तंड भुताळे, सेवानिवृत्त, देगलूर👤 सौ. सरिता गणेशराव यमेवार, धर्माबाद👤 अभिषेक लाडे👤 रामदास कदम, शिक्षक👤 रवी जयंते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु गोविंद दोउ खड़ेकाके लागूं पांय। बलिहारी गुरु आपनोगोविन्द दियो बताय।।(अर्थ - कबीर दास जी कहते हैं कि शिक्षक और भगवान अगर साथ में खड़े हैं तो सबसे पहलो गुरु के चरण छूने चाहिए, क्योंकि ईश्वर तक पहुंचने का रास्ता भी गुरु ही दिखाते हैं।) ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रेमाचे दोन शब्द बोलल्याने मनावर असलेला तणाव दूर होते, आपुलकीने विचारपूस केल्याने स्नेह वाढत जातो, अपमास्पद वागणूक दिल्याने मनात आपोआप दु:ख निर्माण होतात तसेच समोर गोड बोलून मागे कटकारस्थान रचल्याचे उघड झाल्यावर माणसावरचा विश्वास उडून जातो. या प्रकारचे वागणे व बोलण्याची पद्धत असली की, कोणासोबत बोलावे हाच प्रश्न पडत असतो. म्हणून कोणासोबत बोलताना आपल्यात तेवढीच माणुसकी ठेवावी जेणेकरून आपुलकी ही कायम राहील व एकमेकांसोबत संवाद वाढत जाईल आजच्या घडिला या प्रकारची आपुलकी व स्नेह असणे काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *..... विनम्रता ......*राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले. सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली.*तात्पर्य-विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment