✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जून 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/J1nmf8c8Wm3GzD4n/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मोटरसायकल दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••*_जागतिक संगीत दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••*_आंतरराष्ट्रीय योग दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे 'निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.**१९९९:विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.**१९९८:फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.**१९९५:पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.**१९९२:विज्ञान,तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्या डॉ.रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर**१९९१:भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.**१९६१:अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.**१९४९:राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना**१९४८:पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे**१८९८:अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.**१७८८:न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९३:डॉ.सुजाता बेलखेडे-- लेखिका* *१९८८:शीतल शांताराम पाटील-- कवयित्री* *१९८७:मुक्ती मोहन-- भारतीय हिंदी अभिनेत्री**१९८३:ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान-- भारतीय हवाई दलाचा लढाऊ पायलट आणि अधिकारी**१९८२:मारोती बिराजी आरेवार -- कवी* *१९७८:देवेंद्र घनश्याम चौधरी- मराठी हिंदी व पोवारी बोलीचे प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक* *१९७४:गौतमी कपूर-गाडगीळ-- भारतीय दुरचित्रवाहिनी तथा चित्रपट अभिनेत्री**१९७४:प्रा.संध्या महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९७१:मृणाल देव-कुलकर्णी-- ख्यातनाम अभिनेत्री,दिग्दर्शक* *१९७०:संजय धनगव्हाळ-- कवी लेखक व कलावंत* *१९६८:प्रा.वर्षा गगने-- कवयित्री,लेखिका**१९६६:मृण्मयी(मधू) शिरगांवकर- कादंबरी,कथा,विनोदी लेख संग्रह लेखन* *१९६४:बाळासाहेब सौदागर--प्रसिद्ध चित्रपट गीतकार,लेखक,अभिनेते**१९६३:विवेक शौक --भारतीय अभिनेता, विनोदकार,लेखक आणि गायक(मृत्यू:१० जानेवारी २०११)**१९६२:केशव बा.वसेकर -- लेखक**१९६१:स्वाती चांदोरकर -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९५९:रवींद्र इंगळे चावरेकर -- प्रसिद्ध कवी,लेखक,संशोधक* *१९५८:रीमा लागू-- मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री(मृत्यू:१८ मे२०१७)**१९५४:वसंत मार्तंड गायकवाड-- लेखक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५३:बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान (मृत्यू:२७ डिसेंबर २००७)**१९४९:सुरेश विठ्ठलराव जाधव-- लेखक* *१९३३:वामन गणपतराव इंगळे-- कवी, कथाकार**१९३३:वसंत गुलाबराव गिरटकर-- कथाकार, कवी,लेखक**१९३२:निगार सुलताना-- भारतीय अभिनेत्री (मृत्यू:२१ एप्रिल २०००)**१९३१:सुधा दत्तात्रेय सोमण-- कथा लेखिका, ललितगद्य लेखिका**१९२५:श्रीमती यास्मिन शेख-- मराठी लेखन मार्गदर्शिका,मराठी भाषेच्या व्याकरण-तज्ज्ञ**१९२३:सदानंद रेगे – मराठी कवी,कथाकार आणि अनुवादक (मृत्यू:२१ सप्टेंबर १९८२)**१९१६:सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू:२१ जानेवारी १९९८)**१९१२:विष्णू प्रभाकर-- प्रसिद्ध हिंदी लेखक(मृत्यू:११ एप्रिल २००९)**१९११: परशुराम लक्ष्मण वैद्य-- अनुवादक, संशोधक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९७८)**१९०५:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी,तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:१५ एप्रिल १९८०)**१८९६:देविदास लक्ष्मण महाजन- भाषातज्ज्ञ, लेखक,अनुवादक(मृत्यू:३ एप्रिल १९६७)**१८५६:रामचंद्र भिकाजी जोशी-- संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक(मृत्यू:७ सप्टेंबर १९२७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:कृष्णाबाई नारायण सुर्वे-- लेखिका (जन्म:१९३०)**२०१२:भालचंद्र दत्तात्रय खेर – प्रसिद्ध लेखक व पत्रकार (जन्म:१२ जून १९१७)**२००३:लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म:३ ऑगस्ट १९२४)**१९८४:मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक,गायक आणि हार्मोनियमवादकही होते.(जन्म:४ आक्टोबर १९३५)**१९४०:डॉ.केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म:१ एप्रिल १८८९)**१९२८:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(जन्म:३ एप्रिल १८८२)* *_ आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक योग दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*सहशालेय उपक्रम आणि योग*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे विमानतळ धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी:केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राहण्याची सोय करा:नाना पटोलेंची गृहमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे फोन करुन मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वजातीतील गोरगरीबांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवे:भाजप उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे स्पष्ट मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बाजार समित्यांचा गुलाल उधळण्यासाठी आणखी वाट पाहा; सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अरविंद केजरीवालांना एक लाखांच्या बाँडवर जामीन मंजूर, दिल्ली मद्य धोरणात मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सगळ्या जागांवर लढणार; रामदास कदमांचा भाजपला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्ड कप टी 20 मध्ये भारताने अफगाणिस्तानचा 47 धावाने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 भौतिकशास्त्र 📙 विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र.यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले.आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात.उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते.उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात.रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकांतात राहून अंतापर्यंत पोहोचण्यापेक्षा, शांत राहून निवांत राहिलेले कधीही चांगलं..*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक योग दिवस* केव्हा साजरा केला जातो ?२) खोल समुद्रातील सागरी मोहिमांची अंमलबजावणी करणारा भारत हा जगातील कितवा देश बनणार आहे ?३) भारत सासणे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील उत्कृष्ट बाल साहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे ?४) 'गणपती' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताकडे जून २०२४ पर्यंत किती अण्वस्त्रे आहेत ? *उत्तरे :-* १) २१ जून २) ६ वा ३) समशेर आणि भूत बंगला ४) गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीसुत, प्रथमेश, गणनायक, गणराज, अमेय, गजवदन, गौरीनंदन, विघ्नहर्ता ५) १७२ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 के. के. फटाले, शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड👤 धाराजी जोगदंड👤 आनंद पाटील जाधव👤 शुभम साखरे👤 राहुल पाटील👤 हणमंत जमदाडे👤 संजयकुमार मांजरमकर👤 माधव धोंडापुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• प्रेमाचे दोन शब्द बोलल्याने मनावर असलेला तणाव दूर होते, आपुलकीने विचारपूस केल्याने स्नेह वाढत जातो, अपमास्पद वागणूक दिल्याने मनात आपोआप दु:ख निर्माण होतात तसेच समोर गोड बोलून मागे कटकारस्थान रचल्याचे उघड झाल्यावर माणसावरचा विश्वास उडून जातो. या प्रकारचे वागणे व बोलण्याची पद्धत असली की, कोणासोबत बोलावे हाच प्रश्न पडत असतो. म्हणून कोणासोबत बोलताना आपल्यात तेवढीच माणुसकी ठेवावी जेणेकरून आपुलकी ही कायम राहील व एकमेकांसोबत संवाद वाढत जाईल आजच्या घडिला या प्रकारची आपुलकी व स्नेह असणे काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करडू, बोकड आणि लांडगा - अनंत दळवी एक करडू एका बोकडाबरोबर चरत असता तेथे एका लांडगा आला. करडास बोकडापासून दूर नेऊन मारून खावे, या हेतूने तो त्यास म्हणतो, ‘मुला, तू आपल्या आईस सोडून आलास, हा केवढा मूर्खपणा केलास बरे? तेथे तुला पोटभर दूध प्यावयास मिळाले असते; येथे या रानात तुझे पोट कसे भरणार?तू आपल्या आईकडे जात असलास, तर चल. मी तुझ्या सोबतीस येतो.’करडू म्हणाले, ‘माझ्या जिवास काही अपाय होऊ नये म्हणूनच आईने मला या बोकडाबरोबर पाठविले आहे: आणि तू तर त्याजपासून मला दूर नेऊन मारून खाऊ इच्छितोस, तेव्हा तुम्हा दोघांपैकी मी कोणाचा विश्वास धरावा, हे तूच सांग बरे?’•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment