✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जून 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - पावसाशी गप्पा https://www.facebook.com/share/p/GTR3ARtFMno3B4cS/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.हा सन्मान मिळवणारे ते पहिले हिन्दी अभिनेता ठरले.**१९९१:सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली**१९८३:विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.**१९७५:राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.**१९७५:मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९३४:महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले.त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.**१९१८:कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:सई ताम्हनकर – मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री**१९८४:प्रा.दैवत दिनकर सावंत -- लेखक**१९८१:हरिष नवनाथ हातवटे -- कवी* *१९७८:आफताब शिवदासानी-- हिंदी चित्रपट अभिनेता**१९७६:डॉ.पूणम गणेश चव्हाण -- लेखिका* *१९७६:प्रा.डॉ.भास्कर सुभाष पाटील-- लेखक,संपादक* *१९७५पराग बेडेकर--मराठी मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते (मृत्यू:१५ डिसेंबर २०२२)**१९७४:करिश्मा कपूर – हिन्दी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री**१९७१:हिंमतराव रामभाऊ गवई -- लेखक* *१९७१:वीणा आशुतोष राराविकर -- ललित लेखिका* *१९६७:किशोरी अंबिये -- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९६२:श्रीराम पचिंद्रे--ज्येष्ठ कवी,लेखक, संपादक**१९६०:महादेवराव सु.बगाडे -- कवी,लेखक* *१९५९:सतीश दत्तात्रेय मंडलेकर -- कथा, सामाजिक,व कौटुंबिक कांदबरी लेखक* *१९५७:रघुवीर यादव -- अभिनेता* *१९५२:डॉ.सदानंद श्रीधर मोरे (देहूकर)-- प्रसिद्ध लेखक,कवी,नाटककार,समीक्षक, इतिहास संशोधक,प्रवचनकार**१९५१:श्रीरंग माधवराव थोरात-- कवी**१९५१:सतीश शाह-- भारतीय अभिनेते**१९४९:प्रा.डॉ सरिता जांभुळे-- कवयित्री, लेखिका* *१९४३:प्रा.मोरइसहाक सुलेमान शेख-- लेखक**१९४१:रत्नाकर सिताराम बोरसे-- लेखक* *१९३५:रामचंद्र बाळकृष्ण कोलारकर-- संशोधक,संपादक,अनुवादक, कथासमीक्षक,कथासंकलक**१९३४:वीरू देवगण--भारतीय स्टंट आणि अॅक्शन कोरियोग्राफर आणि बॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक(मृत्यू:२७ मे२०१९)* *१९३१:विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे माजी पंतप्रधान,केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (मृत्यू:२७ नोव्हेंबर २००८)**१९२४:मदनमोहन – प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू:१४ जुलै १९७५)**१९१९:अमरेंद्र गाडगीळ-- लेखक, दैवतकोशकार आणि बालसाहित्यकार(मृत्यू ३ जानेवारी १९९४)* *१९१४:श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे-- दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू,ज्ञानेश्वरीचे भाष्यकार आणि मराठी लेखक(मृत्यू:२१ मार्च १९९०)**१९०५:सुगंधा शेंडे --समाजसेवी लेखिका (मृत्यू:२ डिसेंबर २००४)**१९०५:यादव मुकुंद पाठक-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी 'शशीमोहन',संपादक (मृत्यू:२२ मार्च १९९१)* *१९०३:एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (मृत्यू:२१ जानेवारी १९५०)**१९००:लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल(मृत्यू:२७ ऑगस्ट १९७९)**१८९९:ना.भा.नायक-- लेखक,इतिहास संशोधक* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:मोहन रानडे-- ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक, पद्मश्री गोवा मुक्ती मोर्चाचे सेनानी (जन्म:२५ डिसेंबर १९३०)**२०१२:डॉ.मुकुंद श्रीनिवास कानडे-- लेखक, समीक्षक,कोशकार व संत साहित्याचे अभ्यासक(जन्म:३ डिसेंबर १९३१)**२००९:बेला मुखर्जी -- गायिका,निर्माती (जन्म:२९ मे १९२२)**२००९:मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक,गीतलेखक,संगीतकार,निर्माता, अभिनेता (जन्म:२९ ऑगस्ट १९५८)**२००६:डॉ.विष्णू गणेश भिडे--- भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ (जन्म:१९२५)**२०००:रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या* *१९७९:अण्णासाहेब मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष* *१९२२:सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी (जन्म: १८८२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पावसाशी मारलेल्या गप्पा*पाऊस, छत्री आणि रेनकोट यांचा अनोखा संबंध आहे. पाऊस आल्याने आनंद ही होतो आणि दुःख ही ............. ललित लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नीट परिक्षे संदर्भात आणखी दोघे जण अटकेत, 5 लाखाची डील*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानपरिषद निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, उमेदवारी अर्ज 2 जुलै पर्यंत भरता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेंशन योजना पूर्वलक्षी प्रभावाने, साडे आठ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांची एकजूट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात देखील नाही दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरोगसीद्वारे मातानाही 180 दिवसाची मातृत्व रजा नियमात केली दुरुस्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावाने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌗 *दिवस व रात्र केव्हा सामान होतात ?* 🌗 *********************हा प्रश्न सिंगापुरात कधीच विचारला जाणार नाही. विषववृत्तापासून अतिशय जवळ असल्यामुळे तिथे वर्षभर दिवस व रात्र समान असतात. उत्तर आणि दक्षिण, दोन्ही ध्रुवांजवळ हा प्रश्न विचारला जाणार नाही. कारण तिथं एक तर चोवीस तास रात्र तरी असते किंवा चोवीस तास दिवस. त्यामुळे दिवस आणि रात्र समान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरत्र मात्र दिवस आणि रात्र यांचे अवधी वर्षभरात सतत बदलत राहतात. कधी दिवस जास्त मोठे होतात तर कधी रात्र. त्यातही उत्तर गोलार्धात जेव्हा दिवस मोठे असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात रात्री मोठ्या असतात.वास्तविक दिवस आणि रात्र ही एका 'दिवसा'ची कृत्रिम विभागणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच स्वतःभोवतीही गिरकी घेत राहते. त्यामुळे पृथ्वीवरच्या कोणत्याही भागावर दिवसभर सूर्य तळपत नाही राहत नाही. म्हणूनच जोवर सूर्यप्रकाश आहे तोवर दिवस आणि सूर्यप्रकाश मिळणे बंद होऊन अंधाराचं साम्राज्य पसरलं की रात्र अशी विभागणी करण्यात आली आहे.तसंच पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे त्या दोघांमधील अंतर कमी जास्त होत राहतं. कललेल्या अासापायी सूर्याचे किरण पृथ्वीवर सरळ न पडता एका कोनातून पडतात. त्यामुळे गोलाकार पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात सूर्यप्रकाश असण्याच्या वेळात फरक पडला पडत जातो. उत्तरायणाच्या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठे असतात. तर दक्षिण गोलार्धात रात्री. जसजसा सूर्य दक्षिणायनाला प्रारंभ करतो तसतशी ही परिस्थिती उलट होत जाते. या परिस्थिती सतत उलट होण्याच्या प्रक्रियेमुळे दिवस मोठे होत जातात, कमाल पातळी गाठतात, परत लहान होत जातात, किमान पातळी गाठतात. रात्रीचीही हीच परिस्थिती असते. या उलटापालटीत दोन दिवस असे येतात की त्या दिवशी रात्र आणि दिवस यांचा कालावधी सारखाच म्हणजे बारा बारा तासांचा असतो. याला संपात म्हणतात. वसंत ऋतूची सुरुवात करणारा वसंत संपात तर शरद ऋतूची सुरुवात करणारा शरद संपात. हे दोन दिवस २१ मार्च व २३ सप्टेंबर या तारखांना येतात. म्हणजेच या दोन तारखांना दिवस व रात्र समसमान व्हायला हवेत. प्रत्यक्षात मात्र ते या दिवसांच्या आसपास होतात. याचं कारण म्हणजे सूर्य हा काही बिंदुवत नाही. त्याला निश्चित आकारमान आहे. आणि सूर्याची वरची कडा क्षितिजावर आली की दिवस सुरू होतो तर ती क्षितिजाखाली गेली की रात्र. यामुळेच दिवस व रात्र समान होण्याच्या तारखा २१ मार्च व २३ सप्टेंबरच्या आसपास येतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी माणसाच्या ओठावर नेहमी दोन गोष्टी असतात, मौन आणि हास्य*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेसाठी कोणती संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे ?२) भारतात किती ठिकाणी नोटांची छपाई केली जाते ?३) जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल कोण आहेत ?४) 'चौफेर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या माणसाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) एक पेड मेरी माँ के नाम २) चार - महाराष्ट्रात नाशिक, मध्यप्रदेशात देवास, कर्नाटकात म्हैसूर, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी ३) मनोज सिन्हा ४) चहूकडे, सर्वत्र, भोवताली ५) ड्रग लॉर्ड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ओम पालकृतवार, धर्माबाद👤 सुरेश गणपतराव कात्रे, धर्माबाद👤 योगेश गणपतराव कात्रे, धर्माबाद👤 सदाशिव जाधव, लातूर👤 संदेश कोटगिरे, धर्माबाद👤 रुपेश पांचाळ👤 नागेश पाटील👤 राजेश अलगुंडे👤 प्रल्हाद कापावार👤 श्रेयस इंगळे पाटील👤 अशोक तनमुदले, येवती👤 दीपक जायेवाड👤 सौरभ लाखे👤 नंदयप्पा स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धीरे-धीरे रे मनाधीरे सब कुछ होय। माली सींचे सौ घड़ाऋतु आए फल होय॥ (अर्थ- कबीर दास जी कहते हैं कि धैर्य रखें धीरे-धीरे सब काम पूरे हो जाते हैं, क्योंकि अगर कोई माली किसी पेड़ को सौ घड़े पानी से सींचने लगे तब भी फल तो ऋतु आने पर ही लगेगा।)।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांना त्रास देणारे शेवटपर्यंत टिकून राहत नाही आणि त्रास सहन करुन जगणारे भलेही पुढे जाऊ शकत नसतील तरी दुसऱ्यांना त्रास दिल्याने स्वतःला किती दु:ख होते याचा अनुभव त्रास सहन करणाऱ्यालाच जास्त असतो.म्हणून ती व्यक्ती त्या विकारापासून कोसोदूर राहते. माणसाचे जीवन दुसऱ्यांना त्रास देऊन जगण्यासाठी नसते तर ज्याच्या जीवनात आलेल्या संकटांना बघून, त्यातून कशाप्रकारे बाहेर काढता येईल यासाठीच असते. म्हणून माणुसकीच्या नात्याने तरी कोणालाही त्रास देऊ नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *꧁ बांबूची गोष्ट ꧂*एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोंबालाही पाणी घालत होता.दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोंबा मध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबात काही फराक दिसत नव्हता.तो माणूस आता विचार करू लागला होता की, हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून तो त्या कोंबाकडे गेला, पहातो तर काय, त्या कोंबाला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबाला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबाणे अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेंव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला, तेंव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेंव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेंव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले आणि सर्व व्यापून टाकले.तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येवून कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोंबा प्रमाणे करावा. जेंव्हा आपली क्षमता अजमावण्याची वेळ येते तेंव्हा इतर जन कदाचित मागे पडतील, पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.ही बांबूची गोष्ट वाचून काय तात्पर्य घ्याल ?इतरांशी आपली तुलना अजिबात करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवा द्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या असतील.. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही. बौद्धीक आणि शारीरीक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण**संदर्भ : Marathi Motivation*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment